पीयु सीचा फुलफाँर्म काय होत असतो – PUC full form in Marathi

Table of Contents

पीयु सीचा फुलफाँर्म काय होत असतो PUC full form in Marathi

पीयुसीचा फुलफाँर्म pollution under control असा होत असतो.

पीयुसी म्हणजे काय?Puc meaning in Marathi

नवीन मोटार वाहन अँक्ट २०१९ लागु केल्यानंतर जे वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळणार नाहीत त्यांना आता दंड शुल्क भरावा लागणार आहे.

अशा परिस्थिति मध्ये वाहन विमा डाईव्हींग लायसन,आरसी याव्यतीरीक्त अजुन एक महत्वपूर्ण डाँक्युमेंटची गरज पडणार आहे ते म्हणजे पीयुसी प्रमाणपत्र.

पीयुसीचा अर्थ प्रदूषण नियंत्रणामध्ये,नियंत्रणात आहे असा होत असतो.हे एक प्रमाणचिन्ह आहे जे अशा वाहनांना दिले जाते जे पीयुसी परीक्षणात यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत असतात.

पीयुसी प्रमाणपत्र म्हणजे काय असते हे कोणत्या वाहनांसाठी अनिवार्य असते?

कुठल्याही वाहनाची तपासणी करून झाल्यानंतर त्या वाहनाच्या धुरामुळे किती प्रदुषण होते आहे याची तपासणी केली जाते.अणि ह्या तपासणीनंतर वाहन चालकाला जे प्रमाणपत्र दिले जाते त्याला पीयुसी प्रमाणपत्र असे म्हणतात.

पीयुसी प्रमाणपत्र सर्व इंजिन मोटार वाहन वाहतुक रहदारी साठी वापरल्या जाणारया दुचाकी तसेच चारचाकी व्यावसायिक वाहनांसाठी अनिवार्य असते.

See also  गूगल ले ऑफ म्हणजे काय?Google layoff meaning in Marathi

वाहनामुळ होत असलेल्या प्रदुषणाची तपासणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र वाहनचालकास दिले जात असते.

वाहनांमधुन जो धुर निघत असतो तो पर्यावरणासाठी अत्यंत हानीकारक असतो.म्हणुन पर्यावरणाच्या सुरक्षेकरीता काही मानके प्रदुषणाबाबद निश्चित करण्यात आली आहे.

वाहन चालकाकडे पीयुसी प्रमाणपत्र नसल्यास त्याला किती दंड भरावा लागु शकतो?

वाहन चालकाने पीयु सी प्रमाणपत्र न काढल्यास त्याला आठ ते दहा हजार रूपयांपर्यत दंड भरावा लागु शकतो.ही दंडाची रक्कम प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी असु शकते.

पीयुसी प्रमाणपत्र किती कालावधीसाठी वैध ठरवले जाते?

आपण जेव्हा वाहन खरेदी करतो तेव्हा त्या वाहनासोबत आपल्याला पीयुसी सर्टिफिकेट पण देण्यात येत असते.

साधारणत पीयुसी सर्टिफिकेटची वैधता किमान सहा महिने तसेच एक वर्ष इतक्या कालावधीसाठी असते.यानंतर पुन्हा आपणास वाहनाची तपासणी करून नवीन पीयुसी सर्टिफिकेट बनवावे लागते.

दर वर्षी ठाराविक कालावधीनंतर आपणास वाहनाची तपासणी करून हे सर्टिफिकेट बनवावे लागत असते.

पीयुसी सर्टिफिकेटसाठी वाहनचालकांना किती रूपये खर्च करावे लागतात?

ज्या वाहन चालकांचे वाहन पेट्रोलवर चालत असेल अशा वाहन चालकांना पीयुसी सर्टिफिकेट साठी किमान ३० ते ३५ रूपये इतका खर्च करावा लागु शकतो.

अणि ज्यांचे वाहन डिझेलवर चालते अशा वाहन चालकांना ५० ते ६० रूपये इतका खर्च पीयुसी सर्टिफिकेट साठी करावा लागु शकतो.ही खर्चाची किंमत देखील प्रत्येक राज्यात वेगवेगळी असु शकते.

ज्यांचे वाहन कुठल्याही प्रकारचे प्रदुषण करत नाहीये अणि त्यांच्याकडे पीयुसी सर्टिफिकेट नाहीये किंवा त्याची मुदत संपलेली असेल अशा व्यक्तींला देखील चलान दिले जाऊ शकते.म्हणुन पीयूसी सर्टिफिकेट आपल्याकडे असणे फार गरजेचे असते.

पीयुसी प्रमाणपत्र कसे बनवायचे?

पीयुसी प्रमाणपत्र आपण आँफलाईन ह्या पदधतींचा वापर करून बनवू शकतो.आँनलाईन फक्त आपण आपले बनवलेले अणि नजरचुकीने आपल्याकडुन हरवलेले पीयुसी सर्टिफिकेट पुन्हा डाउनलोड करू शकतो.

पीयु सी प्रमाणपत्र आँफलाईन पदधतीने बनवण्यासाठी आपल्याला आपल्या शहरातील वाहन पडताळणी केंद्रात जावे लागेल.

See also  जागतिक बौदधिक संपदा दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? - World intellectual property day info Marathi

तिथे गेल्यावर वाहन तपासणी केंद्राच्या अधिकारींकडुन आपल्या वाहनाची तपासणी करण्यात येते.मग आपल्या वाहनातुन किती धुर निघतो आहे हे चेक करून आपले पीयुसी सर्टिफिकेट तयार करण्यात येते.

अणि समजा तपासणी दरम्यान वाहनातील प्रदुषणाचे प्रमाण ठाराविक प्रमाणापेक्षा जास्त आढळुन आले तर प्रदुषण चाचणी केंद्रास संबंधित अधिकारीला रेजिस्ट्रेशन नंबर द्यावा लागत असतो.

यानंतर अधिकारीकडुन पुन्हा वाहनाची तपासणी केली जाते.यानंतर देखील वाहनातुन विहित प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषण होत असेल तर अधिकारीकडुन कारवाई देखील केली जात असते.

नवीन पीयुसी सर्टिफिकेट आपणास आँनलाईन पदधतीने का बनवता येत नही?

पीयुसी प्रमाणपत्र देण्याबरोबर प्रत्यक्षात त्या वाहनाची तपासणी केली जाते.

वाहनाची प्रदुषण चाचणी करताना गाडीच्या सायलेन्सरमध्ये गँस अँनलाईजर बसवण्यात येतो.हा गँस अँनलाईजर कंप्यूटर सोबत कनेक्टेड असतो.

हा गँस अँनलाईजर आपल्या वाहनातुन किती प्रमाणात धुर निघतो आहे याने वातावरणात किती प्रदुषण निर्माण होईल याची तपासणी करतो.अणि मग याचा सर्व डेटा कंप्यूटर वर सेंड केला जात असतो.

याचसोबत यात कँमेराच्या साहाय्याने आपल्या वाहनाच्या नंबर फ्लेटचा फोटो देखील काढला जातो.यानंतर मग सर्व तपासणी करून झाल्यानंतर पीयुसी सर्टिफिकेट जारी करण्यात येते.

हरवलेले पीयुसी सर्टिफिकेट आँनलाईन डाउनलोड कसे करायचे?

पीयुसी सर्टिफिकेट आँनलाईन डाउनलोड करण्यासाठी आपणास parivahan.gov.in ह्या वेबसाइट वर जावे लागेल.

यानंतर मेन्यु लिस्टमध्ये online services वर क्लीक करावे लागेल.त्यात पीयुसी आँप्शनची निवड करावी लागेल.

यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात आपण puc certificate वर क्लीक करायचे.

यानंतर आपला रेजिस्टेशन नंबर चेसिस नंबर टाकायचा.सोबतच इमेजमध्ये एक कोड दिसुन येईल तो enter security code मध्ये टाकायचा.

यानंतर शेवटी खाली दिलेल्या puc details option वर क्लीक करायचे.यानंतर आपल्या समोर आपले puc certificate येईल.ह्या सर्टिफिकेटची आपण प्रिंट पण काढु शकतो.

पीयु सी सर्टिफिकेट डाउनलोड करताना आपणास आपला व्हेईकल रेजिस्ट्रेशन नंबर अणि चेसिस नंबर टाकावा लागतो.हे दोघेही नंबर आपल्या वाहनाच्या आरसी सर्टिफिकेट वर दिलेले असतात.

See also  जैविक कीडनाशके -जैविक खत प्रयोगशाळा-Organic Bio fertilizers

पेट्रोल अणि डिझेल गाडीची प्रदुषण चेक करण्याची प्रक्रिया सारखी असते का?

पेट्रोल गाडीचे प्रदुषण चेक करण्यासाठी गाडीचे एक्सलेटर न दाबता एक वेळेसच रीडींग घेतली जाते.अणि डिझेल गाडीचे प्रदुषण चेक करण्यासाठी चार ते पाच वेळा एक्सलेटर दाबले जाते.

पीयुसी सर्टिफिकेट मध्ये वाहनाविषयी कोणकोणती माहीती दिलेली असती?

पीयुसी सर्टिफिकेट मध्ये आपल्या वाहनाचा रेजिस्ट्रेशन नंबर,चेसिस नंबर,इंजिन नंबर, वाहनाचे माँडेल कोणते आहे?वाहनचा मालक कोण आहे हे सर्व दिलेले असते.

ह्याच सर्टिफिकेट मध्ये वाहनाची प्रदुषण तसासणी विषयीची सर्व माहीती जसे की इंधन निर्धारीत करण्यात आलेले मानक अणि हे सर्टिफिकेट किती दिवहांकरीता वैध आहे ही माहीती देखील उजव्या बाजुला दिलेली असते.

नवीन पीयुसी सर्टिफिकेट बनविताना कशाकशाची आवश्यकता असते?

नवीन पीयुसी सर्टिफिकेट बनवायला आपणास आपल्या गाडीचा आरसी,अणि आधीचे पीयुसी सर्टिफिकेट लागत असते.

पीयु सी सर्टिफिकेट बनविण्यासाठी आपल्याकडे एक मोबाइल असायला हवा.कारण पीयुसी सर्टिफिकेट बनवण्यासाठी आधी आपल्याला मोबाइल नंबर वर एक ओटीपी पाठवला जात असतो.जो आपणास तिथे सांगावा लागतो.

नवीन पीयुसी सर्टिफिकेट बनवायला दिरंगाई केल्यास काय होते?

आपले जुने पीयुसी सर्टिफिकेट जर कालबाहय झाले आहे तर आपण त्वरीत नवीन पीयुसी सर्टिफिकेट बनवून घ्यायला हवे.नाहीतर आपल्यावर पावती फाडुन दंड भरण्याची वेळ येऊ शकते.

PUC चे other full form –

Pre university course –

Personal unlock code –