६५ हजार जागांसाठी शिक्षक पदासाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू – Maha TAIT Exam 2023- शिक्षक अभियोग्यता जाहिरात .
ज्या उमेदवारांचे डी एड तसेच बीएड झालेले आहे तसेच सीटेट उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांकरीता एक अत्यंत महत्वाची बातमी आहे राज्यात ३० हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
३१/१/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडुन शिक्षक भरती संदर्भात एक अधिसुचना देण्यात आली आहे.या अधिसुचनेत असे दिले आहे की
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापन असलेल्या शाळेत पवित्र ह्या संगणक प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धीमत्ता चाचणी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
अणि याकरीता आॅनलाईन सिस्टम द्वारे अर्ज मागविणे देखील सुरू झाले आहे.
Maha TAIT Exam 2023 ऑनलाईन अर्ज सादर करायची तारीख –
सदर परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज सादर करायला सुरुवात ही ३१/१/२०२३ पासुन होणार आहे.हया परीक्षेसाठी उमेदवार ८/२/२०२३ पर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात.
Maha TAIT Exam 2023 ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबलिंक –
परीक्षेसाठी आँनलाईन अर्ज सादर करण्याची वेबलिंक ही ibpsonline.ibps.in ही आहे.
https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/
- उमेदवाराला आॅनलाईन अर्ज सादर करत असताना 200*300 पिक्झेल 20 केबी ते 50 केबी साईज असलेला पासपोर्ट साईज फोटो,
- 20 केबी ते 50 केबी इतका डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा द्यायचा आहे.
- 140 ते 60 पिक्सेल 10 केबी ते 20 केबी सही देखील अपलोड करायची आहे.
Maha TAIT Exam 2023 ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची तारीख –
- सर्व उमेदवारांना ८/२/२०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत आपले ठरविण्यात आलेले निर्धारीत परीक्षा शुल्क भरायचे आहे.
- परीक्षेचे हाॅलतिकिट ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी –
- परीक्षेचे हाॅलतिकिट उमेदवारांना १५/२/२०२३ पासुन ऑनलाईन पदधतीने प्राप्त होणार आहे.
Maha TAIT Exam 2023 आॅनलाईन परीक्षा तारीख –
सर्व उमेदवारांची परीक्षा ही २२/२/२०२३ ते ३/३/२०२३ ह्या कालावधी दरम्यान घेतली जाणार आहे.
Maha TAIT Exam 2023 पात्रतेच्या अटी –
- उमेदवार भारतीय नागरीक असावा.
- Maha TAIT Exam 2023 उपलब्ध पदसंख्या-
- राज्यातील शिक्षक सेवकांच्या तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांची माहीती विषय,प्रवर्ग माध्यम बिंदु नामावलीनुसार पवित्र ह्या संगणक प्रणाली वर प्रसारीत केली जाणार आहे.
Maha TAIT Exam 2023 परीक्षेचे माध्यम स्वरूप-
- ह्या आॅनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी तसेच उर्दु भाषा असणार आहे.
- भाषिक क्षमता मराठी,भाषिक क्षमता इंग्रजी इतर सर्व प्रश्न हे द्विभाषिक असणार आहे.म्हणुन अर्ज भरत असताना उमेदवारांनी मराठी इंग्रजी किंवा उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज करताना निवडायचे आहे.
- परीक्षा एकुण २०० मार्काची असणार आहे.यात दोन घटक समाविष्ट असतील पहिला घटक आहे अभियोग्यता अणि दुसरा आहे बुद्धीमत्ता.
- घटक १ याचे शेकडा प्रमाण ६० टक्के इतके असेल एकुण गुण १२० असतील अणि प्रश्न देखील १२० असणार आहे.
- बुद्धिमत्ता हया दुसऱ्या घटकासाठी शेकडा प्रमाण ४० टक्के इतके असेल एकुण गुण ८० अणि प्रश्न देखील ८० असणार आहे.
- दोघे घटक मिळुन एकुण शेकडा प्रमाण १०० टक्के असेल ज्यात एकुण गुण २०० अणि प्रश्न देखील २०० असणार आहे.
- २०० गुणांसाठी एकुण १२० मिनिटे इतका कालावधी दिला जाणार आहे.
घटक 1 -अभियोग्यता :
अभियोग्यता मध्ये आपणास गणितीय क्षमता,वेग अचुकता, भाषिक क्षमता मराठी, भाषिक क्षमता इंग्रजी,अवकाशीय क्षमता, समायोजन व्यक्तीमत्व हे घटक समाविष्ट असणार आहे.
घटक 2 – बुद्धीमत्ता :
बुद्धीमत्ता या घटकामध्ये आकलन, वर्गीकरण,समसंब़ंध,श्रमश्रेणी, तर्क अनुमान,कुट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक समाविष्ट असणार आहे.
सदर परीक्षा ही कुठल्याही विषय ज्ञानावर नसेल त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासक्रमाकरीता विशिष्ट स्तर मर्यादा नसेल.
Maha TAIT Exam 2023 निवडप्रक्रिया –
परीक्षेत प्राप्त झालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील भरतीकरीता ग्राह्य धरण्यात येणार आहे.शिक्षण सेवक पदासाठी सर्व उमेदवारांची निवड ही मेरिट आधारावर केली जाणार आहे.
सर्व उमेदवारांना स्वहस्ताक्षरामध्ये लिखित प्रतिज्ञापत्र देखील सादर करायचे आहे.
परीक्षा शुल्क :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 950 रूपये इतके शुल्क आकारले जाईल अणि मागासवर्गीय राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 850 रूपये इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.
परीक्षा शुल्क नाॅन रिफंडेबल असणार आहे.परीक्षा शुल्क व्यतीरीक्त बॅक चार्जेस त्यावरील देय कर हे अतिरीक्त असणार आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भरतीची नोटीफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यायची आहे.