mahaDBT  ऑनलाईन पोर्टल आणि ई पीक पाहणी एप्स – mahaDBT and E-Peek Pahani information

mahaDBT  ऑनलाईन पोर्टल  – mahaDBT and E-Peek Pahani information

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागामार्फत महाडीबीटी ही संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी खालील योजना तत्त्वावर राबविण्यात येत आहेत. योजनेच्या लाभाची रक्कम त्यांचे बँक खात्यावर वर्ग करण्यात येते. यासाठी महाडिबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली जाऊन खालीलप्रमाणे दिलेल्या विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकरी अर्ज करु शकतात.

यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सामूहिक सुविधा केंद्र किंवा महासेतू केंद्रावर जाऊन नोंदणी करून इच्छुक लाभाच्या घटकासाठी अर्ज करावा.

 

  • पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जाची कृषी विभागामार्फत संगणकीय सोडत काढण्यात येते व सोडती मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) पूर्वसूचना दिली जाते.

 

  • यानंतर शेतकर्‍यांना आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात. शेतकऱ्यांकडून सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी कृषी विभागामार्फत करण्यात येऊन छाननी मध्ये पात्र झालेल्या लाभाथ्यांना पूर्वसंमती दिली जाते.

 

  • पूर्वसंमती दिल्यानंतर शेतक-यांनी घटकांची खरेदी करून खरेदीची देयके तसेच आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावे लागतात.

 

  • महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन, बियाणे, औषधे व खते तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गतील शेतकऱ्यांसाठी विशेष योजनेंतर्गत समाविष्ट बाबींचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो.

 

  • आजअखेर पोर्टलवर १७ लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदगी केली असून आत्तापर्यंत ३८ लाखांपेक्षा अधिक लाभाच्या घटकांसाठी अर्ज प्रात आहेत. कृषी विभागाच्या सन २०२१- २२ अंतर्गत विविध योजनांकरिता महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया २४ तास सुरू असते.

 

महाडीबीटी mahaDBT FARMER नावाचे अँप

 

  1. शेतकऱ्यांना सामूहिक सुविधा केंद्रे किंवा महासेतू या ठिकाणी जाऊन कागदपत्रे अपलोड करणे काही कारणामुळे शक्य होत नाही यासा त्यांची गॅरसोय दूर व्हावी म्हणून कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महाडीबीटी mahaDBT FARMER नावाचे अँप उपलब्ध करून दिले आहे॰
  2. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी प्रलंबित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अँप गुगल प्ले-स्टोअर वरून डाउनलोड करून घ्यावे.
  3. लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाल्यावर, तसेच औजारे खरेदी केल्यावर बिल अथवा देयक अपलोड करण्याकरिता सदर APP च उपयोग शेतकऱ्यांना होईल.
  4. सद्यस्थितीतीत ५० हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सदर अँय डाउनलोड केले असून त्याचा लाभ शेतकरी कागदपत्रे/ देयक अपलोड करण्यासाठी घेत आहेत.
  5. तरी सर्व शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवरील विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याकरिता पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करण्याचे तसेच अँप डाउनलोड करून वापर करण्याचे कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
See also  क्यु आर कोड स्कॅम म्हणजे काय ? | QR Code Scam information In Marathi

ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु

शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकांची नोंद स्वतः करण्याच्या ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे.

ई पीक पाहणी प्रकल्प महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला असून या ई-पीक पाहणी मोबाईल अँपला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात दिनांक २३ सप्टेंबर २०२१ अखेर ५५ लक्ष ९० हजार खातेदार शेतकरी यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अँपचा वापर केला आहे .

mahaDBT and E-Peek Pahani information

ई-पीक पाहणी प्रकल्पाचे फायदे

  • पिकाच्या नोंदी घेण्यासाठी शेतकऱ्यांचा थेट सहमाग त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची पीक पाहणी स्वतः करण्याचा अधिकार मिळाला आहे.
  • आता खातेनिहाय पीक पाहणी नोंद होणार.
  • गावनिहाय पिकपाहणीचा संकलित करण्यासाठी अतिशय उपयुक्‍त.
  • राज्यस्तरावर पिकांची यादी व संकेतांक एकसमान असल्याने माहितीचे संस्करण सोपे होणार.
  • शेतात पीक उभे असतानाच पीक पाहणीच्या नोंदी होणार असल्याने तात्काळ ७/१२ अद्ययावत होणार.
  • बागायती पिकांची माहिती, फळ पिकांची माहिती, नगदी पिकांची खातेदार निहाय यादी मिळू शकणार.
  • महाडीबीटी, पोकरा सारख्या थेट लाभाच्या योजनांसाठी अचूक माहिती उपलब्ध होणार.
  • कृषी विभाग, जलसंपदा विभाग, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, साखर आयुक्‍त कार्यालय यांना आवश्यक माहिती अचूकपणे संकलित होणार.
  • आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्री सुलभीकरण करण्यासाठी उपयुक्‍त.
  • पीक विमा योजना किंवा आधारभूत किमतीवर धान खरेदी / कापूस खरेदीसाठी, साखर कारखान्याचे ऊस तोडणी नियोजन साठी अचूक माहिती उपलब्ध होणार.
  • राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर कृषी उत्पन्न, संभाव्य उत्पादन, बाजारपेठा व साठवणूक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी अचूक माहिती संकलित होणार.
  • तलाठी यांच्या कामाचा बोजा कमी करण्यास मदत.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई आ णि योग्य प्रकारे मदतीसाठी व पीक विमा आणि पिकाच्या नुकसानीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभीकरणास मदत.
  • कृषी गणना कामात माहिती संकलनासाठी उपयुक्त.
  • कृषी पणन व्यवस्थापन करण्यास उपयुक्‍त.

 

See also  What is a Philanthropist? - परोपकारी म्हणजे काय - दानशूरता

संदर्भ – शेतकरी मासिक महाराष्ट्र शासन