महालाभार्थी पोर्टल -MahaLabharthi portal

मित्रांनो, MahaLabharthi portal- महालाभार्थी’ ह्या वेबपोर्टल बद्दल आपण माहिती करून घेवूयात

MahaLabharthi portal- महालाभार्थी’ पोर्टल वर , महाराष्ट्र सरकार आपल्या नागरिकांसाठी बर्‍याच कल्याणकारी  योजना जाहीर करत असते ,परंतु नागरिकांना ह्याची माहिती च नसते किंवा माहीत असले तरी  पात्रतेचे निकष, अर्ज कुठे व कसा करावा ह्या बाबत माहिती नसते आणि माहिती नीट आणि वेळेवर मिळाली नाही म्हणून नागरिकांना ह्या योजनांचा लाभ घेता येत नाही .

महालाभार्थी’ पोर्टल चे वर आपण भरून दिलेल्या महिती नुसार सर्व योजनांची माहिती आपल्याला समोर कॉमप्यूटर वर दिसते आणि आपण ऑनलाइन अर्ज करू शकता.

शासनाच्या न पोहोचलेल्या योजनांची योग्य माहिती व त्यांचे लाभ व्यक्तिगतरीत्या पोहोचवण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा संकल्प नागरिकांसाठि खूप च फायदेशीर आहे.

अर्ज कसं करता येतो -महालाभार्थी पोर्टल

  • आपण आपल्या घरी कॉमप्यूटर किंवा स्मार्ट फोन वर महालाभार्थी पोर्टल
  •  MahaLabharthi portal website ओपन करून किंवा जवळ MS-CIT केंद्रात असेल तर तिथ जाऊन ‘महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
  • आपल्याला कॉमप्यूटर ज्ञान नसलयास MS-CIT केंद्रावर सुलभकाच्या (Facilitator) मदतीने ‘महालाभार्थी’ या वेबपोर्टलची सेवा घेवू शकतात.
  • महालाभार्थी’ ही सुविधा मोबाईल अ‍ॅप द्वारे सुद्धा उपलब्ध झालेली आहे. गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर

  • जाऊन MahaLabharthi असा शोध (search) घेतला असता हे अ‍ॅप दिसू लागेल. ते अ‍ॅप नागरिक आपल्या अँड्रॉईड मोबाईल वर डाउनलोड करून इंस्टॉल करू शकतात.
  • ऑनलाइन पोर्टल वर माहिती भरण्यापूर्वी हा एक अर्ज आपण भरून ठेवल्यास, ऑनलाइन माहिती भरणे खूप सोपे होते, ह्या अर्जातील माहितीची गरज  आपल्याला ऑनलाइन पोर्टल वर फॉर्म टाइप करणताना होते. आधीच सर्व माहिती सोबत असेल तर वेळ वाचतो.  
See also  पालक दिन महत्व,कोट्स,संदेश,शुभेच्छा - Parent day quotes,message,wishes in Marathi

महालाभार्थी पोर्टल -MahaLabharthi portal- आपण आपल्या नावाची नोंदणी काशी कराल –

  • स्वतः कंप्यूटर किंवा मोबाईलवरून महालाभार्थी पोर्टलला भेट देऊन. किंवा
  • एम केसी एल ची MS-CIT केंद्रात जावून –

खाली फोटोत दाखवल्या प्रमाणे आपण ह्या  लिंक वर क्लिक करावे 

-https://www.mahalabharthi.in/login/#/

  • नंतर आपला मोबाईल क्रमांक, संपूर्ण नाव, जन्मदिनांक, इ-मेल आयडी (असेल तर नसला तरी ठीक ) ही माहिती भरून नोंदणी करावी.
  • यावेळी आपल्याला एक verify करा म्हणून मोबाईलवर एक ६ अंकी One Time Password (OTP) येईल.
  • तो verify केल्यानंतर, नवीन पासवर्ड टाकून तसेच नियम आणि अटी मान्य करून नोंदणी पूर्ण होईल.
  • नोंदणी झाल्यावर नागरिकांना नोंदणीकृत मोबाईलवर तसा संदेश येईल. त्यामध्ये त्यांचा १२ अंकी लॉगीन आयडी दिलेला असेल.
  • हा लॉगीन आयडी आणि तयार केलेला पासवर्ड पुढील सर्व प्रक्रियेसाठी महत्वाचा आहे त्यामुळे तो सांभाळून ठेवा .
  • पासवर्ड गोपनीय ठेवायचा , किंवा कुणाला देऊ नये.

आता नोंदणी केल्यानंतरची पुढे -महालाभार्थी पोर्टल

अर्ज कसं करावा,

एकतर  तुमी स्व:ता करू शकता किंवा पुनः MS-CIT कर्मचार्‍याची मदत घेवू शकता

  • सर्वात आधी महालाभार्थी पोर्टल वर लॉगीन आयडी आणि पासवर्ड च वापर करून लॉगीन कराव.-                                
  •      https://www.mahalabharthi.in/login/#/
  • आवश्यक असेलेली सर्व माहिती , मुख्य पानावर उजव्या बाजूला ‘स्वत:ची माहिती भरा’ असे दिसेल त्यात भरावी,ही माहिती काळजीपूर्वक भरावी. आपला आधार क्रमांक भरू शकता पण नाही भरला तरी ठीक.
  • नंतर स्वत: च्या शिक्षणासंदर्भात माहिती भरावी,विद्यार्थी नि जास्त काळजी घ्यावी कारण त्यावरूनच बऱ्याच शैक्षणिक योजनांची पात्रता ठरणार असते  
  • पुढे पोर्टल वर आपल्याला  अनेक योजना ज्या समजतील अश्या चित्र आणि लिखित स्वरुपात ‘ माझ्या गरजा / मी कोण’ ह्या भागात दिसेल
  • त्यावर  क्लिक केल्यानंतर काही पर्याय चित्ररूपात दाखविले जातील,
  • जसे की, घर, अर्थसहाय्य, खते, बियाणे, रोजगार, शेततळे, विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण इत्यादि गरजा दिसतील.
  • किंवा ‘भूमिका निवडा’ या बटणावर क्लिक करून नागरिक आपण कोण आहोत हे निवडू शकतील जसे की, शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार, इत्यादी.
  • येथे नागरिक एकापेक्षा अधिक पर्याय निवडू शकतात.
  • नागरिकांनी निवडलेल्या गरजा अथवा भूमिकांच्या नुसार विविध शासकीय योजनांमध्ये मिळणाऱ्या लाभांची माहिती पोर्टलवर चित्ररुपात दिसेल.
  • निवडलेल्या भूमिकांनुसार विविध योजना त्यांच्या विभागाप्रमाणे आपल्या समोर येतील.
  • प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला काय लाभ मिळू शकतील हे लिहिलेले आहे.
  • चित्रावर क्लिक केल्यास आपल्याला संबंधित योजनेचा थोडक्यात तपशील मिळेल. येथे आपल्याला योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक विहित नमुन्यातील अर्ज मिळतील
  • अधिक माहितीसाठी शासकीय निर्णय डाऊनलोड करण्याचीही सुविधा आहे, विविध विभागांकडून ते जसजसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे येथे वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.
  • ज्या योजनांच्या लाभांसाठी आपण इच्छुक असाल
    • त्या लाभांखाली आपणास टिक (✔) करावी लागेल.
    • ज्यावर आपण अशी (✘) खूण केली त्या आपल्याला नकोत असे समजले जाते.
    • योजनांसाठीची आपण पात्र आहे का तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, ज्याची आपणास होय किंवा नाही मध्ये उत्तरे द्यायची आहेत.
See also  भारतीय स़ंविधानाची मुलभूत कर्तव्ये - प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये कोणती? - Fundamental Duties of Indian Constitution

महालाभार्थी पोर्टल -MahaLabharthi portal- संभाव्य पात्रता सिद्ध झालेल्या योजनांची सर्व माहिती बघणे:

  • सर्व माहिती भरल्यावर व आवश्यक तेथे प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आपणास पात्र असलेल्या योजना, त्यामध्ये मिळणारे लाभ, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्या योजनांसाठी कुठे संपर्क करायचा इत्यादी मिळेल.
  • शेवटी नागरिकास संभाव्य पात्रता सिद्ध झालेल्या योजनांच्या प्रिंट-आउट मिळेल.
  • त्यामध्ये योजनेचे नाव, त्यामध्ये मिळणारे लाभ
  • ते लाभ मिळविण्यासाठी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे आणि
  • कुणाला भेटावे याचा तपशील असेल.
  • ह्यात एक संदर्भ क्रमांक दिलेला असून त्याच्या सहाय्याने आपल्याला संबंधित योजनांचे त्या त्या विभागांकडून लाभ मिळविण्यात काही अडचण आल्यास पाठपुरावा करण्यास मदत होईल.
  • आपण ज्या योजनांसाठी संभाव्य पात्र आहात अशा योजनांच्या खाली आपणास ‘अर्ज करा’ असा पर्याय असेल,
  • त्यावर क्लिक केल्यास, नागरिकांनी वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे महालाभार्थी वेबपोर्टल स्वत: नागरिकांचा विहित नमुन्यातील अर्ज भरून देईल.
  • अर्जाच्या विहित नमुन्यामध्ये आवश्यक असलेल्या ज्या माहितीची नोंद वेबपोर्टलवर नाही ती माहिती नागरिक तेथेच ऑनलाईन भरतील.
  • नंतर नागरिकांचा हा अर्ज संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे जमा होईल.
  • अर्ज केल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे वेबपोर्टलवरच अपलोड करण्याची सोय केलेली आहे.
  • यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना योजनेचे लाभ मिळवून देणे सोपे जाईल.
  • सध्या ज्या योजनांसाठी विहित नमुना अर्ज उपलब्ध आहे अश्या काही योजनां फक्त सुरू करण्यात आल्या आहेत.
  • ज्या योजनांसाठी वेगळ्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो अशा योजनांसाठी ‘अर्ज करा’ ह्या बटन वर क्लिक केल्यास त्या वेबसाईटशी जोडून दिले जाईल..