महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना २०२३ विषयी माहिती
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता हे काय आहे?
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता ही एक योजना आहे जी महाराष्ट्र शासनाने खास सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सुरु केली आहे.
ह्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जेवढेही सुशिक्षित तसेच बेरोजगार तरूण आहेत त्यांना शासनाच्या वतीने बेरोजगार भत्ता दिला जातो.
ह्या बेरोजगार भत्तामुळे महाराष्ट्र राज्यातील जेवढेही सुशिक्षित बेरोजगार तरूण आहेत त्यांना अल्पशा प्रमाणात का होईना एक प्रकारची आर्थिक मदत मिळणार आहे.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत तरूणांना किती रक्कम दिली जाणार आहे?
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आर्थिक साहाय्य म्हणून दरमहा पाच हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
राज्यातील जेवढेही सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत ज्यांच्याकडे सध्या कुठलाही रोजगार नाहीये तसेच सध्या कुठलेही रोजगाराचे साधन सुदधा जवळ उपलब्ध नाहीये अणि घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना घरात पैसे देणे देखील आवश्यक आहे.
अशा आर्थिक दृष्ट्या कमकुवत तरूणांना घरखर्च भागविण्यासाठी सरकारकडून थोडीफार आर्थिक मदत प्राप्त व्हावी म्हणून सरकारने ही महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते?
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रात राहणारे सर्व सुशिक्षित बेरोजगार तरूण घेऊ शकणार आहेत.
पण एकदा रोजगार तसेच नोकरी प्राप्त झाल्यानंतर आपणास ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची तरूणांनी नोंद घ्यावी कारण ही योजना बेरोजगारांना आपल्या बेसिक गरजा भागविण्यासाठी आर्थिक मदत प्राप्त व्हावी म्हणून राबविली जात आहे.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचा फायदा काय आहे?
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेमुळे जेवढेही तरूण नोकरी न प्राप्त झाल्यामुळे बेरोजगार होऊन बसले आहेत त्यांना नोकरी प्राप्त होईपर्यंत महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेमुळे छोटीशी आर्थिक मदत प्राप्त होणार आहे.
याने त्यांची आर्थिक अडचण कमी होण्यास मदत होणार आहे.
योजनेच्या अंतर्गत जी काही रक्कम तरूणांना प्राप्त होईल त्यात ते आपल्या दैनंदिन जीवनातील किमान मुलभुत गरजा तसेच सरकारी नोकरी साठी फाॅम भरण्यासाठी येणारा बेसिक खर्च पुर्ण करू शकणार आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरूणांना महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी काय करावे लागेल?
ज्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ प्राप्त करायचा आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ह्या योजनेत आपले नाव नोंदवावे लागणार आहे.त्यानंतरच ते ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत?
● महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी आपले नाव नोंदवणारया तरूणाचे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
● अर्जदाराचे बँक अकाऊंट देखील असणे आवश्यक आहे अणि अर्जदाराचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक केलेले असावे कारण यात दिली जात असलेली भत्ताची रक्कम ही थेट अर्जदाराच्या बँक अकाऊंट मध्ये आँनलाईन ट्रान्स्फर केली जाणार आहे.
● आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असायला हवे.
● अर्जदार व्यक्तीचे वय २१ ते ३५ च्या आत असणे आवश्यक आहे.
● योजनेचा लाभ प्राप्त करणारया लाभार्थी व्यक्तीकडे कुठलेही असे प्रोफेशनल डिग्री सर्टिफिकेट नसावे ज्याने त्याला जाॅब प्राप्त होईल.असे आढळुन आल्यास त्याला ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेची आॅफिशिअल वेबसाईट कोणती आहे?
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेची आॅफिशिअल वेबसाईट rojgar mahaswayam.in ही आहे.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत?
● अर्जदार व्यक्तींचे आधार कार्ड,पॅनकार्ड मतदान कार्ड,
● रहिवासी प्रमाणपत्र
● उत्पन्नाचे प्रमाण
● जन्म प्रमाण
● अर्जदार बारावी उत्तीर्ण असल्याचे शैक्षणिक सर्टिफिकेट
याचसोबत दोन पासपोर्ट साईज फोटो, संपर्कासाठी मोबाईल नंबर,इमेल आयडी देखील असायला हवे.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी आॅनलाईन अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेच्या आॅफिशिअल वेबसाईट वर जायचे.
योजनेच्या वेबसाईटवर गेल्यावर आपणास जाॅब सिकर लाॅग इन नावाचे एक आॅप्शन दिसुन येईल.त्याच्याखाली आपणास रेजिस्टर नावाचे आॅप्शन दिसुन येईल.त्यावर क्लिक करायचे.
रेजिस्टर वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल जिथे आपणास एक लाॅग इन फाॅम भरायचा आहे.
लाॅग इन फाॅम मध्ये आपणास पहिले नाव,शेवटचे नाव, मध्यम नाव,आपला मोबाईल नंबर,जेंडर,आधार आयडी नंबर,डेट आॅफ बर्थ ही सर्व माहीती व्यवस्थीत टाकायची आहे.
यानंतर तिथे दिलेला कॅपच्या देखील जसाच्या तसा फिल करायचा आहे.यानंतर खाली दिलेल्या नेक्स्ट बटणवर क्लीक करायचे आहे.
मग फाॅम मध्ये आपण जो मोबाईल नंबर टाकला आहे त्यावर एक ओटीपी सेंड केला जाईल.हा ओटीपी इंटर करून आपण शेवटी भरलेल्या लाॅग इन फाॅम ला एकदा चेक करून सबमिट करून द्यायचे आहे.
यानंतर आपणास लाॅग इन करून योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
लाॅग इन करण्यासाठी आपणास सर्वप्रथम होमपेजवर जाऊन लाॅग इन आॅप्शन वर क्लिक करायचे आहे.अणि आयडी पासवर्ड टाकुन लाॅग इन करून घ्यायचे आहे.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना कधी कधी सुरू करण्यात आली होती?
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती.