Maharashtra Day Quotes In Marathi
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”
या जयघोषातच दरवर्षी महाराष्ट्रात १ मे या दिवसाची सुरूवात होते. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीसाठीदेखील ओळखला जातो. महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
“शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
“पैठणचे प्रेम अमित देश कोकणा… पंढरीस ये विदर्भ देवदर्शना… अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
जागतिक कामगार दिन का साजरा केला जातो? जागतिक कामगार दिनाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे?
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी !! जय शिवाजी !!
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
“महाराष्ट्र दिनाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा हे महाराष्ट्र दिवस शुभेच्छा.”
“बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
“पैठणचे प्रेम अमित देश कोकणा… पंढरीस ये विदर्भ देवदर्शना… अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
“आजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी महाराष्ट्र दिन.”
“जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
“महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे. माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे. इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे. महाराष्ट्र दिन २०२३ च्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.”
“महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
“गर्जा महाराष्ट्र माझा…. जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.”
“ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा… महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.”