महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? – Maharashtra Din
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली होती म्हणून आजचा दिवस संपुर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जात असतो.
मुंबई हे शहर आपल्या भारत देशातील महत्वाचे बंदर म्हणून ब्रिटिशांच्या निगराणी देखरेखीखाली होते.१९१७ मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात यावी अशी कल्पणा प्राध्यापक विठठल वामन ताम्हणकर यांनी लोकशिक्षण ह्या मासिकातुन मांडली.
ह्या कल्पणेत मुंबई प्रांत,मध्य वरहाड हैदराबाद शहरामध्ये विखुरलेल्या मराठी भाषिक लोकांना एकत्रित केले जावे अणि महाराष्ट्राची निर्मिती केली जावी असे मत मांडले गेले होते.
यानंतर १२ मे १९४६ रोजी संयुक्त राष्ट्र संबंधिचा हा ठराव एका साहित्य संमेलनामध्ये मांडण्यात आला होता.या मागणीला चालना प्राप्त व्हावी म्हणून शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली एक एकीकरण परिषद देखील भरवण्यात आली होती.
पण भाषावार प्रांतरचना करणे देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने अयोग्य असल्याने दार अणि जेव्ही पी समिती कडुन ही मागणी फेटाळण्यात आली होती.
राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीस काही मराठी अणि गुजराती भाषिकांकडुन विरोध केला जात होता हा विरोध थांबवण्यासाठी मोडुन काढायला १ नोव्हेंबर १९५५ रोजी काॅग्रेस कार्यकारिणी कडुन त्रिराज्य सुत्राचा उपाय सुचविण्यात आला होता.
राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्र राज्यास मुंबई देण्यास नकार दिल्याने येथील मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.
यानंतर इतर कम्युनिस्ट पक्ष,प्रजा समाजवादी पक्ष,सोशॅलिस्ट इत्यादींनी संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा आपल्या हातात घेण्याचे ठरवले.
ह्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे सेनापती बापट, आचार्य अत्रे,एस एम जोशी,श्रीपाद डांगे,शाहीर अमर शेख, इत्यादी महत्वाच्या नेत्यांचा समावेश होता.
लोकशाहीर म्हणून ओळखले जाणारे अण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख,शाहीर गव्हाणकर ह्या सर्वांनी आपल्या कलाविष्कारातुन मराठी अस्मिता जागृत ठेवण्याचे काम केले.
१६ जानेवारी १९५६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अशी घोषणा केली की मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असणार आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतलेल्या निर्णयावर आक्षेप व्यक्त करण्यासाठी याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी कामगारांचा एक भव्य पलोरा फाऊंटन समोर येईल असे ठरविण्यात आले.
यानंतर जमलेला सर्व समुदाय एका बाजुने चर्च गेट स्थानकाकडुन अणि दुसरया बाजुने बोरी बंदरकडुन घोषणा देत फ्लोरा फाऊंटन येथे जमला.
ह्या आंदोलनात मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात यावी अशा घोषणा केल्या गेल्या.हा मोर्चा उधळुन लावण्यासाठी पोलिसांकडुन लाठीमार देखील करण्यात आला होता.
पण अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांना हा मोर्चा उधळुन लावण्यास अपयश आले.
आंदोलकांना आटोक्यात आणण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश देखील तेव्हाचे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना दिला होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या ह्या संघर्षामध्ये तब्बल १०५ आंदोलकांना शहीद होत आपले प्राण गमवावे लागले होते.
ह्या सर्व मराठी माणसांच्या तीव्र आंदोलन अणि आंदोलनात शहीद हुतात्म्यांच्या दिलेल्या बलिदानामुळेच शासनाला नमते घ्यावे लागले अणि १ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली होती.
संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याच्या चळवळीत शहीद झालेल्या अनेक हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच आज १ मे हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.लहान मुले शाळेत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने भाषणे देखील करतात.शाळा तसेच कार्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्र राज्याचा इतिहास –
जेव्हा आपल्या भारत देशाला स्वतंत्र प्राप्त झाले तेव्हा भारताची प्रादेशिक घटना फार भिन्न प्रकारची होती.शेकडो राज्ये ह्यामुळे एकवटली गेली होती तेव्हा देशाच्या कारभाराकरीता राज्य व्यवस्था स्थापण करणे आवश्यक झाले होते.
मग १९५६ मध्ये राज्य पुनर्गठन अधिनियम नुसार भाषेच्या आधारावर भारतातील राज्यांच्या मर्यादा निश्चित करण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती का अणि कशी झाली?
आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्यांचे मुंबईत विलीनीकरण करण्यात आले होते.मुंबई हया प्रांतांमध्ये मराठी सोबत गुजराती बोलणारे भाषिक देखील वास्तव्यास होते.
म्हणुन भाषिक सुलभतेसाठी भाषावार प्रांतरचना करण्यात यावी अशी मोठ्या प्रमाणात मागणी केली जाऊ लागली.अशातच मराठी भाषिक अणि गुजराती भाषिक यांना देखील आपले स्वताचे वेगळे राज्य हवे होते.
या मागणीसाठी आंदोलन करण्यात आली याच आंदोलनाचे परिणाम स्वरुप १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र अणि गुजरात हया दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली होती.
ह्या कायद्याची अंमलबजावणी १ मे १९६० रोजी करण्यात आली होती.