महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनात तीन लाख रुपयांची वाढ
शिंदे फडणवीस सरकारने नुकताच आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नागरिकांना मिळणार आहेत. खरं पाहता आत्तापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात होते.
मात्र आता यामध्ये तीन लाख रुपयांची वाढ झाली असून आता पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील काही शासकीय रुग्णालयात आणि काही खाजगी रुग्णालयात उपचार दिले जाणार आहेत. शासनाने निवडून दिलेल्या रुग्णालयातच मात्र मोफत उपचार या ठिकाणी मिळणार आहेत. दरम्यान आज आपण या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना काय आहे?
२०१७ पर्यंत, हा कार्यक्रम राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून ओळखला जात होता. यानंतर भाजप सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेला अधिकृत नाव दिले. आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी हा कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. सुमारे १२०९ रोगांसाठी, या कार्यक्रमाद्वारे मोफत शस्त्रक्रिया आणि थेरपी दिली जाते. या योजनेत पूर्वी २ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार होते, परंतु आता ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील. निःसंशयपणे आशा आहे की यामुळे लोकसंख्येला खूप मदत होईल.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कोण घेऊ शकता?
ही योजना आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठी सुरू झाली आहे. राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक नागरिकांना या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत घेता येणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत ज्या रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात त्या रुग्णालयात या योजनेचे आरोग्य मित्र नियुक्त केलेले असतात. हे आरोग्य मित्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यास मदत करतात.