जळगाव – महावितरण कंपनीत दहावी बारावी तसेच आयटीया उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू – Mahavitaran recruitment 2023 in Marathi

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत दहावी बारावी तसेच आयटीया उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू mahavitaran recruitment 2023 in Marathi

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.अंतर्गत जळगाव येथे इलेक्ट्रीशिअन,वायरमन तसेच कोपा इत्यादी पदांसाठी भरती केली जात आहे.

या भरतीविषयी आॅफिशिअल नोटीफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.

जे उमेदवार पात्र तसेच इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या पत्यावर आॅफलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

ज्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल त्यांना जळगाव महाराष्ट्र येथे नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मंडळ कार्यालय विद्युत भवन एम आय डीसी जळगाव -४२५००३

एकुण रिक्त जागा -१४०

भरती केल्या जात असलेल्या पदांचे नाव –

१)इलेक्ट्रीशिअन

एकुण जागा -८८

२) वायरमन/लायनमन

एकुण जागा -३५

३) संगणक चालक/कोपा

एकुण जागा -१७

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख –

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२३ ही आहे.

महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ –

www.madiscom.in

वेतन –

सर्व निवड झालेल्या उमेदवारांना वेतन नियमानुसार दिले जाणार आहे.

परीक्षा शुल्क –

सदर भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवारांना कुठल्याही प्रकारची परीक्षा फी भरावी लागणार नाहीये.

वयाची अट –

सर्व उमेदवारांना १८ ते ३० वर्ष इतकी वयाची अट ठेवण्यात आली आहे.

वयातील सुट –

सर्व मागासवर्गीय एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे इतकी वयात सुट देण्यात आली आहे.

See also  एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेड मध्ये १६६ जागांसाठी भरती सुरू - AIATSL Bharti 2023 in Marathi

शैक्षणिक पात्रतेची अट –

उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटी आय इलेकट्रीशिअन वायरमन संगणक चालक कोपा

मागील तीन शैक्षणिक वर्षात २०१९-२०२०,२०२०-२०२१,२०२१-२०२२ वर्षांमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ओपन कॅटॅगरी मधील उमेदवारांना किमान ६५ टक्के अणि मागासवर्गीयांसाठी ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

अर्ज कोण करू शकते?

सदर भरतीसाठी जळगाव जिल्ह्यातील कुठलाही रहिवासी उमेदवार अर्ज करू शकतो.

उमेदवाराने दिलेल्या कालावधीमध्ये आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे आॅनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म,एस एस सी गुणपत्रक,एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र,आय टी आय गुणपत्रक आयटी आय बोर्ड प्रमाणपत्र,जातीचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला,अदयावत आधार कार्ड एक छायांकित स्वयंम स्वाक्षरी केलेली प्रत घेऊन दिलेल्या पत्यावर वेळापत्रकानुसार जमा करायचे आहे.

जाहीरातीत जाहीरातीच्या एखाद्या भागात शिकाऊ उमेदवारांच्या नमुद केलेल्या संख्येत अंशत बदल करण्याचा तसेच संपूर्ण जाहीरात रद्द करण्याचा कंपनीकडे राखीव असणार आहे.सदर निर्णय उमेदवारास कळविला जाणार नाही.

वेळापत्रक-

कागदपत्रे जमा करण्याची वेळ अणि कालावधी –

२०/२/२०२३ ते २४/२/२०२३ सकाळी १०.३० ते १७.३० पर्यंत

वरील दिलेल्या वेळात आलेल्या उमेदवारांच्याच कागदपत्रांचा स्वीकार केला जाईल २४/२/२०२३ नंतर आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांचा कुठलाही विचार केला जाणार नाही.