मॅनीफेस्टेशन अणि मॅनिफेसटींग म्हणजे काय?Manifestation,and manifesting meaning
मॅनीफेस्टेशन हा एक मार्ग तसेच पद्धत आहे जिच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला,शरीराला अणि आत्म्याला कुठलेही कार्य करण्यासाठी तसेच आपले जीवनातील निर्धारित ध्येय प्राप्त करण्यासाठी तयार करत असतो.
जेव्हा आपले शरीर,मन आणि आत्मा आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी एकत्रित होऊन पुर्णपणे तयार होत असते तेव्हा आपले मॅनीफेस्टेशन पुर्ण होत असते.
मॅनीफेस्टेशन ची एक संपुर्ण प्रक्रिया असते.मॅनीफेस्टेशन करण्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या जर आपण केल्या तर आपली कृती देखील आपल्या ध्येयाशी संबंधित योग्य दिशेने कार्य करत असते.
अणि योग्य दिशेने कार्य केल्याने आपण लवकर आपले ध्येय गाठण्यात यशस्वी होतो.
जेव्हा आपल्या मनात एखादी गोष्ट प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते.आपल्याला एखादे ध्येय गाठायचे असेल तर आपण त्याच्याशी संबंधित उर्जा फिल करण्याचा प्रयत्न असतो.
उदा, समजा आपल्याला एखाद्या काॅलेजात अॅडमिशन घ्यायचे असते तेव्हा आपण तिथे अॅडमिशन घेण्यासाठी फी किती लागेल वगैरे इत्यादी त्या काॅलेज विषयी माहिती काॅलेज मध्ये प्रत्यक्ष जाऊन काढत असतो.
इंटरनेटवर त्या काॅलेज विषयी माहिती सर्च करत असतो.त्या काॅलेजच्या अवती भवती फिरत असतो.त्या काॅलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलत असतो.थोडक्यात आपण काॅलेजच्या एनर्जीला आतुन फिल करत असतो.
आपण त्या काॅलेज मधीलच विद्यार्थी आहोत असे आपण फिल करण्याचा प्रयत्न करत असतो.आपण त्या काॅलेजला गेल्यावर किती धमाल करू आपले किती मित्र मैत्रिणी होतील.अशा वेगवेगळ्या कल्पणा आपण करू लागतो.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपण नकळतपणे स्वताला ह्या सर्व गोष्टी सांगत बोलत असतो.एकप्रकारे आपण त्या गोष्टीसाठी स्वयंघोषणा करीत असतो.
स्वताला त्यात कल्पणा करून पाहण्याचा प्रयत्न करत असतो.आपण त्या विशिष्ट गोष्टीला मेनिफिस्ट करत असतो.त्या विशिष्ट गोष्टीच्या फ्रिकवेन्सी मध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो.
पण समजा आपण असा नकारात्मक विचार केला की ते काॅलेज खुप हायफाय काॅलेज आहे.तिथे मला अॅडमिशन मिळु शकत नाही.
म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे आपल्याला मिळवायची आहे पण स्वताच्या विषयी आपला एक नकारात्मक माईंडसेंट आहे.की आपण ती गोष्ट मिळवु शकत नाही.आपल्याला ती गोष्ट कधीच मिळणार नाही आपण आपले ध्येय गाठु शकत नाही.
तर अशा परिस्थितीत आपण ती गोष्ट मेनिफिस्ट म्हणजे चुंबकाप्रमाणे स्वताकडे आकर्षित करू शकत नसतो.
कारण law of attraction मध्ये असे सांगितले गेले आहे आपण ज्या गोष्टी स्वताकडे आकर्षित करतो त्याच गोष्टी आपल्याला मिळत असतात.आपल्या जीवनात घडत असतात.
आपण आपला माईंडसेंट विचारशैली सकारात्मक ठेवली तर आपल्याला जे काही मिळवायचे असेल ते सर्व आपण स्वताकडे आकर्षित करून प्राप्त करू शकतो.
पण याचठिकाणी आपला माईंड सेट एखाद्या गोष्टी विषयी नकारात्मक असेल तर आपण नकारात्मक विचार करू अणि त्याच नकारात्मक गोष्टींना आपण चुंबकाप्रमाणे स्वताकडे आकर्षित करू.
उदा,मी भरपुर पैसा कमवू शकत नाही,मी विशिष्ट कार्य करू शकत नाही, मला विशिष्ट ध्येय गाठता येणार नाही.ह्या नकारात्मक गोष्टी आहेत ज्या आपण स्वताकडे आकर्षित करत असतो.
मॅनीफेस्टेशन कशाला म्हणतात?Manifestation meaning in Marathi
मॅनीफेस्टेशन म्हणजे प्रकटीकरण,प्रात्यक्षिक करणे,घोषणा करणे अभिव्यक्त होणे म्हणजे एखादी गोष्ट स्वताला बोलणे सांगणे होय.
मेनिफिस्ट म्हणजे काय?Manifest meaning in Marathi
मेनिफिस्ट म्हणजे एखादी गोष्ट स्वताला सांगणे बोलणे,स्पष्ट करणे,तिचे प्रदर्शन करणे प्रकटीकरण करणे,एखाद्या गोष्टीची घोषणा करणे होय.
मेनिफिस्टींग म्हणजे काय?Manifesting meaning in Marathi
मेनिफिस्टींग म्हणजे प्रकटीकरण करणे,एखादी गोष्ट स्वताला बोलणे सांगणे, घोषणा करणे.
मेनिफिसटो म्हणजे काय?Manifestos meaning in Marathi
मेनिफिसटो म्हणजे जाहीरनामा.घोषणापत्र