१५०महत्वपूर्ण मराठी म्हणीआणि त्यांचाअर्थ – Marathi mhani ani taynchya arth

१५० महत्वपूर्ण मराठी  म्हणी आणि त्यांचा अर्थ

) अन्नछत्री जेवणे अणि मिरपुड मागणे

दुसरयाकडुन आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची.त्या शिवाय आणखी काही गोष्टी मागुन मिजास दाखवणे.

२) अडला हरी गाढवाचे पाय धरी

एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या काळात एखाद्या मुर्ख दुर्जन व्यक्तीच्या विनवण्या कराव्या लागतात.

३) अंगावरचे लेणे जन्मभर देणे

दागिन्यांकरीता कर्ज करून ठेवायचे आणि आयुष्यभर ते फेडत बसायचे.

४) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ

दुर्जन व्यक्तीच्या संगतीत राहिल्यास प्रसंगी आपल्या जिवितास धोका निर्माण होतो.

५) अति शहाणा त्याचा बैल रिकामा

जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे काम अजिबात होत नाही.

६) अवशी खाई तुप अणि सकाळी पाही रूप

अतिशय उतावीळपणाची कृती करणे.

७) अती तेथे माती

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नुकसान दायी ठरतो.

८) अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज

गरजवंतास अक्कल नसते.

९) असतील शिते तर जमतील भूते

एखाद्या व्यक्तीपासुन आपला फायदा होणार असला तेव्हाच माणसे त्याच्याभोवती गोळा होऊ लागतात.

१०) अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण

मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेची वेदना अधिक दुखदायक असते.

११) अंधारात केले पण उजेडात आले

कुठलीही गोष्ट कितीही गुप्तपणे केली तरी ती एक ना एक दिवस सर्वांसमोर येतेच.

१२)अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे

नाव मोठे लक्षण खोटे.

१३) अति परिचयात अवाज्ञा

एखाद्या व्यक्तीच्या सोबत जास्त जवळीकता वाढली की अपमान होत असतो.

Marathi mhani ani taynchya arth
Marathi mhani ani taynchya arth

१४) अति झाले अणि आसु आले

एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुखदायी ठरते.

१५) अती झाले गावचे अणि पोट फुगले देवाचे

कृत्य एकाचे अणि त्रास होतो दुसरयालाच.

१६) अन्नाचा येते वास,कोरीचा घेते घास

अन्न न खाणे पण त्यात मन असणे.

१७) अघटीत वार्ता कोल्हे गेले तीर्था

अशक्य कोटीतील गोष्ट.

१८) हपापाचा माल गपागपा

लोकांचा तळतळाट घेऊन प्राप्त केलेले धन झपाट्याने नष्ट होत असते.

१९) अर्थी दान महापुण्य

गरजु माणसाला दान दिल्याने आपणास पुण्य प्राप्त होते.

२०) आईची माया अणि पोर जाईल वाया

फार लाड केल्याने पोर बिघडतात.

२१) आधी पोटोबा मग विठोबा

आधी पोटाची सोय करणे मग देवधर्म करणे.

२२) आपलेच दात आपलेच ओठ

आपल्याच माणसाने चुक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

२३) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

मुळातच आळशी असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.

२४) आंधळ्या बहिरयाची गाठ

एकमेकाला मदत करण्यास असमर्थ असलेल्या दोन व्यक्तींची गाठ पडणे

२५) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन

अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे अपेक्षेपेक्षा जास्त लाभ प्राप्त होणे.

२६) आपण हसे लोकाला शेंबुड आपल्या नाकाला

ज्या दोषाबददल दुर्गुणाबददल आपण दुसरयाला हसतो तो दुर्गुण आपल्याच अंगी असणे.

२७) आंधळ दळत नी कुत्र पीठ खात

एकाने काम करायचे दुसरयाने त्याचा फायदा घ्यायचा.

२८) आयत्या बिळात नागोबा

एखाद्याने त्याच्या फायदयाकरीता केलेल्या गोष्टींचा स्वता करीता फायदा घेण्याची वृत्ती असणे.

२९) अग अग म्हशी मला कुठे नेशी

चुक स्वता करायची अणि ती मान्य न करता दुसर्याच्या माथी मारून मोकळे होणे.

३०) अडली गाय फटके खाय

एखादा माणुस अडचणीत सापडल्यावर त्याला हैराण केले जाते.

३१) असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा

अनुकुलता असल्यावर चेनचंगळ करणे अणि नसल्यावर उपवास करण्याची वेळ येणे.

३२) अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का?

कोणत्याही गोष्टीला एक ठाराविक मर्यादा असते.

३३) आपला हात जगन्नाथ

आपली प्रगती उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते.

३४) अति खाणे म्हसणात जाणे

अति खाणे नुकसान दायक असते.

३५) अठरा नखी खेटरे राखी वीस नखी घर राखी

मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते.

३६) अवचित पडे नि दंडवत घडे

See also  महाराष्ट्र दिन कोट्स मराठीत । Maharashtra Day Quotes In Marathi

स्वताची चुक झाकण्याचा प्रयत्न करणे.

३७) अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे

एकमेकींच्या अगदी विरुद्ध दिशेने बाजुने.

३८) अंथरूण पाहून पाय पसरावे

आपली ऐपत बघुन कुठलीही गोष्ट करावी.

३९) अंगापेक्षा बोंगा मोठा

मुळ गोष्टींपेक्षा तिच्या अनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.

४०) आपला तो बाब्या अणि दुसरयाचे ते कारटे

स्वताच्या बाबतीत असलेले चांगले विचार दुसर्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती.

४१) आपली पाठ आपणास दिसत नाही

स्वताचे दोष दुर्गुण स्वताला दिसत नसतात.

४२) आजा मेला नातू झाला

एखादे नुकसान झाले असता त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणे.

४३) आत्याबाईला जर मिशा असत्या तर

नेहमी एखाद्या कामात जर तर अशा शक्यतांचा विचार करत राहणे.

४४) आपल्याच पोळीवर तूप ओढणे

फक्त स्वताचाच फायदा करून घेणे.

४५) आलिया भोगासी असावे सादर

कुठलीही तक्रार कुरकुर न करता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणे.

४६) आवळा देऊन कोहळा काढणे

आपले स्वार्थ साध्य करण्यासाठी एखाद्याला लहान वस्तु देऊन मोठी वस्तु प्राप्त करणे.

४७) स्वता मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही.

४८) आपले नाक कापुन दुसरयास अपशकुन

दुसरयाचे नुकसान करण्यासाठी प्रथमतः स्वताचेच नुकसान करून घेणे.

४९) आधीच तारे त्यात गेले वारे

विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी गोष्ट घडणे.

५०) आधीच मर्कट तशातही मद्य प्याला

आधीच करामती त्यातच मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होणे.

५१) अडक्याची अंबा अणि गोंधळाला रूपये बारा

मुख्य गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे.

५२) आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी

रोग एकीकडे उपाय भलतीकडे.

५३) आयजीच्या जीवावर बायजी उदार

दुसरयाचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.

५४) आग खाईल तो कोळसे ओकेल

जशी करणी तसे फळ.

५५) आठ पुरभय्ये नौ चौबे

खुप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुदधीमान लोक पुरेसे.

५६) आधणातले रडतात आणि सुपातले रडतात

संकटात असतानाही दुसरयाचे दुःख पाहुन हसु येणे.

५७) इकडे आड तिकडे विहीर

दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची परिस्थिती निर्माण होणे.

५८) इच्छी परा ते येई घरा

आपण जे दुसर्याच्या बाबतीत चिततो ते आपल्या अंगी येणे.

५९) इच्छिलेले घडले तर भिक्षुकही राजे होते

इच्छेप्रमाणे सारे घडले असते तर सर्वच लोक धनवान झाले असते.

६०) इन मीन साडेतीन

एखाद्या कारणासाठी एकदम कमीत कमी लोक हजर असणे.

६१) ईश्वर जन्माला घालतो त्याचे पदरी शेर बांधतो

जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच.

६२) उथळ पाण्याला खळखळाट फार

अंगी थोडासा गुण असणारा व्यक्ती जास्त बढाई मारतो.

६३) उंदराला मांजर साक्ष

ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टी विषयी विचारणे व्यर्थ असते/ एखादे वाईट कृत्य करताना एकमेकांना दुजोरा देणे.

६४) उचलली जीभ लावली टाळ्याला

दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे.

६५) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.

६६) उठता लाथ बसता बुक्की

प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.

६७) उडत्या पाखराची पिसे मोजणे

अगदी सहज चालता बोलता एखाद्या गोष्टीचे परीक्षण करणे.

६८) उतावळी बावरी म्हतारयाची नवरी

अतिउताविळपणा नुकसादायक असतो.

६९) उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी

जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.

७०) उंबर पिकले अणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आलेफायद्याची वेळ येणे पण लाभ घेता न येणे.

७१) उराचे खुराडे चुलीचे तुणतुणे

अतिशय हालाखीची परिस्थिती असणे.

७२) उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी

प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

७३) उकराल माती तर पिकतील मोती

मशागत केल्यावर चांगले पीक येते.

७४) उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?

एखादे काम हातात घेतल्यावर त्यासाठी करायच्या श्रमाचा विचार करायचा नसतो.

७५) उचल पत्रावळी म्हणे जेवणार किती?

जे काम करायचे ते सोडुन दुसरी भलतीच चौकशी करणे.

See also  लिओनार्डो द विंची कोण होते? - Leonardo da Vinci

७६) उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक

एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते.

७७) उधारीचे पोते सव्वा हात रिते

उधारीने भरलेला माल नेहमीच कमी भरतो.

७८) उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे

श्रीमंती आली की तिच्या मागे हाजी हाजी करणारे येतातच.

७९) उभ्याने यावे अणि ओणव्याने जावे

येताना ताठ मान करून येणे अणि जाताना मान खाली घालून जाणे.

८०) उसाच्या पोटी कापूस

सदगुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती.

८१) उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये

कोणत्याही चांगल्या गोष्टींचा तसेच चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.

८२) एका माळेचे मणी

दोन सारख्या स्वभावाचे व्यक्ती.

८३) एका हाताने टाळी वाजत नाही

दोघांच्या भांडणात फक्त एकाचीच चुकी नसते.

८४) एक ना धड भाराभर चिंध्या

एकाच वेळी अनेक काम करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट राहुन जाणे.एकही काम धड पुर्ण न होणे

८५) ऐकावे जनाचे करावे मनाचे

लोकांचे ऐकावे पण आपल्या मनाला योग्य वाटेल तेच करावे.

८६) एकाची जळती दाढी दुसरा त्यावर पेटवू बघतो विडी

दुसर्याच्या अडचणींचा विचार न करता स्वताचा फायदा बघण्याची दृष्टी ठेवणे.

८७) एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये

दुसरयाने केलेल्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून स्वता केलेल्या वाईट गोष्टींचे समर्थन करू नये.

८८) एका पिसाने मोरथोडयाशा यशाने हुरळून जाणे

८९) एका खांब्यावर दारका -सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे.

९०) एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला

एका व्यक्ती पासुन अनेक ठिकाणी उपद्रव होणे.

९१) एका कानावर पगडी घरी बाईल उघडीबाहेर बडजाव पण घरी उपद्रव

९२) एका म्यानात दोन तलवारी राहत नाही

दोन तेजस्वी माणसे एकत्रपणे गुण्यागोविंदाने राहु शकत नाही.

९३) ऐंशी तेथे पंचाऐंशी

अतिशय उधळेपणाची कृती.

९४) ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार

मोठ्या व्यक्तीला यातनाही मोठ्या सहन कराव्या लागतात.

९५) ओळखीचा चोर जीवे सोडी

ओळखीचा शत्रु अनोळखी शत्रुपेक्षा भयंकर असतो.

९६) ओठ फूटो किंवा खोकाळ फुटो/शेंडी तुटो की तारंबी तुटो

कोणत्याही परिस्थिती मध्ये काम तडीस नेणे.

९७) ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे

सांगितलेले काम सोडुन नसत्या चौकशा करणे.

९८) औटघटकेचे राज्य

अल्प काळ टिकणारी गोष्ट.

९९) करावे तसे भरावे

जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळणे.

१००) कर नाही त्याला डर कशाला

ज्याने काही वाईट गोष्ट तसेच गुन्हा केला नाही त्याला शिक्षा होण्याची कसली भीती.

१०१) करीन ते पुर्व

मी करेन ते योग्य मी म्हणेल तो बरोबर अशा रीतीने वागणे.

१०२) करवतीची धार पुढे सरली तरी कापते अणि मागे सरली तरी कापते

काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते अणि नाही केल्या तरी नुकसानच होते.

१०३) करून करुन भागला देवध्यानी लागला

भरपुर वाईट कामे करून मग देवपुजेला लागणे.

१०४) कणगीत दाणा अणि भील उताणा

गरजेपुरता जवळ असले की लोक काम करत नाही कोणाची पर्वा करत नाही.

१०५) कधी तुपाशी तर कधी उपाशी

सांसारीक स्थिती कधी सारखी राहत नाही.

१०६)कशात काय नि फाटक्यात पाय

वाईटात आणखी वाईट घडणे

१०७) काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही

रक्ताचे नाते तोडु म्हणता तुटत नाही.

१०८) काडीचोर तो माडीचोर

एखाद्या व्यक्तीने शुल्लक अपराध केला असेल तर त्याच्या अपराधाचा एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.

१०९) काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती

क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्या पुरताच असतो.

११०) कागबाई रोड तर म्हणे गावाची ओढ

निरर्थक गोष्टींची काळजी करणे.

१११)कानात बुगडी गावात फुगडी

आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे.

११२) काल मेला अणि आज पित्तर झाला

अतिशय उतावीळपणाची कृती.

११३) काकडीची चोरी फाशीची शिक्षा

See also  आंबा पिकावरील कीड - Mango pest management.

गुन्हा लहान पण त्यावर खुप मोठी शिक्षा होणे.

११४) काडीची सत्ता अणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही

जे काम पैशाने होत नाही ते थोडयाशा अधिकाराने होते संपत्ती पेक्षा सत्ता महत्वाची असते.

११५) कावीळ झालेल्या व्यक्तीला सर्व पिवळे दिसते

पुर्वगृह दुषित दृष्टी असणे.

११६) काशीत मल्हारी माहात्म्यनको तिथे नको ती गोष्ट करणे

११७) कानामागुन आली अणि तिखट झाली

श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणुस वरचढ ठरणे.

११८) कामापुरता मामा

आपले काम करून घेईपर्यंत गोडगोड बोलणे.

११९) कावळा बसला अणि फांदी तुटली

परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडुन येणे.

१२०) काखेत कळसा गावाला वळसा

जवळ असलेल्या वस्तुला शोधायला दुर जाणे.

१२१) काप गेले नि भोके राहीली

वैभव गेले अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या.

१२२) कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

क्षुद्र माणसाच्या केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही.

१२३) काळ आला पण वेळ आली नव्हती

नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.

१२४) कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात

चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करणे.

१२५) कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा

दुसर्याच्या स्वाधीन झालेला व्यक्ती आपली मते विसरतो.आपल्या ताब्यात आलेल्या वस्तुवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.

१२६) कुशी तशी फोडी

देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार प्राप्त होणे.

१२७) कुर्हाडीचा दांडा गोतास काळ

स्वार्थासाठी शत्रुला केवळ दुरदृष्टीने मदत करून आपल्याच माणसाची हानी करून घेणे.

१२८) केळीला नारळी अणि घर चंद्र मौळी

अत्यंत दारिद्र्याची अवस्था असणे.

१२९) आधी शिदोरी मग जेजुरी

आधी भोजन मग देवाची पूजा.

१३०) आचार भ्रष्टी सदा कष्टी

ज्या व्यक्तीचे आचार विचार चांगले नाही तो व्यक्ती नेहमी दुखीच राहत असतो.

१३१) आठ हात लाकुड अणि नऊ हात ढिपली

मुर्खपणाची अतिशयोक्ती करणे.

१३२) आईचा काळ बायकोचा मवाळ

आपल्या आईकडे दुर्लक्ष करीत पत्नीची काळजी घेणारा

१३३) अचाट खाणे म्हसणात जाणे

खाण्या पिण्याच्या बाबतीत अतिरेक केला तर याचा परिणाम वाईट होतो.

१३४) आधी बुदधी जाते मग लक्ष्मी जाते

आधी माणसाचे आचरण बिघडत असते मग त्याची दशा बदलत असते.

१३५) अफी मिळी गुप चिळी

रहस्य उघडकीस येऊ नये यासाठी सर्वांनी मुग गिळुन बसण

१३६) अहो रूपम अहो ध्वनी

एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलट खोट्या स्तुती करणे.

१३७) इच्छा तिथे मार्ग

एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर ती गोष्ट करायला मार्ग देखील मिळतोच.

१३८) इकडे आड तिकडे विहीर

दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.

१३९) कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी

कधी दारिद्र्य येणे कधी श्रीमंती येणे.

१४०) कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी ते कडुच

आपण कितीही प्रयत्न तरी माणसाचा मुळ स्वभाव बदलत नसतो.

१४१) कुत्र्याचे शेपूट कितीही नळीत घाला शेवटी ते वाकडे ते वाकडेच असणार

कितीही केले तरी काही लोकांचा मुळस्वभाव बदलत नाही.

१४२) कुंपणाने शेत खाल्ले तर दाद मागावी कोणाकडे

रखवालदारानेच विश्वास घात करून चोरी करणे.

१४३) कोल्हा काकडीला राजी

क्षुद्र व्यक्ती क्षुद्र गोष्टींनी देखील खुश होत असते.

१४४) कोरड्या बरोबर ओले भी जळते

निरपराध व्यक्तीची अपराधी सोबत गणना करणे

१४५) कोंबडे झाकले म्हणून तांबड फुटायच राहत नाही

जी घटना घडणे अटळ आहे ती कितीही प्रयत्न करून टाळता येत नाही.

१४६) खाण तशी माती

आईवडिलांप्रमाणेच मुलाचे देखील वर्तन असते.

१४७) खरयाला मरण नाही

सत्य हे कधीही लपत नसते.

१४८) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी

परिस्थितीशी जुळवून न घेता हटटीपणाने वागणे

१४९) गरज सरो वैद्य मरोआपले काम झाल्यावर उपकार करत्याची पर्वा न करणे

१५०) गाढवाला गुळाची चव काय

मुर्खाला चांगल्या गोष्टींची किंमत नसते.