छोटी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पुढचे २४ तास खूप महत्वाचे
छोटी बचत करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पुढचे २४ तास महत्वाचे असणार आहे , वित्त मंत्रालयाने लाँच केलेल्या नोटिफिकेशन नुसार ,जर गुंतवणूक करनाऱ्या खात्यामध्ये आपले आधार कार्ड लिंक नसेल ,तर आपले पैसे अडकु देखील शकतात. Deadline to link adhaar to KYC for investors
आपल्या भारत देशातील काही लोक व्यवसाय करतात तर ,काही लोक नोकरी करतात.परंतु कुठे ना कुठे गुंतवणूक सगळेच करतात.ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ,ते मोठी गुंतवणुक करतात आणि ज्यांच्याकडे कमी पैसा आहे ,त्या आपल्या पैश्या नुसार गुंतवणूक करतात.
अशातच वित्त मंत्रालयाने लाँच केलेल्या जाहिराती वरून ,छोटी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पुढचे २४ तास महत्वाचे असणार आहेत.वित्त मंत्रालयाने लाँच केलेल्या नोटीफिकेशन नुसार जर आपण वित्त मंत्रालयाने नोटीफिकेशन मध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन केले नाही ,तर आपले गुंतवणुकीचे खाते बंद देखील पडू शकते.
ज्यांनी खाते उघडताना आपला आधार नंबर देऊन KYC केली नसेल ,त्यांचे खाते सरकार १ ऑक्टोंबर पासून फ्रीज करणार आहे.ज्यांनी २०२४ च्या आधी खाते उघडले आहे आणि ज्यांनी २०२४ नंतर खाते उघडनार आहेत ,त्या सर्वांना KYC करताना आधार लिंक केले पाहिजे ,नाहीतर त्यांचे खाते फ्रीज देखील होऊ शकते.
तुम्ही तुमचे खाते KYC करताना आधार नंबर लिंक केला नसेल तर तुम्ही पण ३० सप्टेंबर च्या आत खाते आधार नंबर ला लिंक करून घ्या ,नाहीतर १ ऑक्टोंबर नंतर तुमचे खाते फ्रीज होऊ शकते.
PPF, सुकन्या समृद्धि योजना, पोस्ट ऑफिस स्कीम, सीनियर सिटीजंस सेविंग स्कीम यांसारख्या छोट्या गुंतवणुकीच्या खात्यामध्ये जर KYC करताना आपण आधार नंबर लिंक केला नसेल तर १ ऑक्टोंबर पासून आपले खाते बंद पडू शकते.सरकारने या वर्षीच्या ३१ मार्च ला एक नोटीफिकेशन लाँच केले की ,”३० सप्टेंबर पर्यंत सर्वांनी आपल्या सर्व छोट्या खात्यामध्ये ,ज्यामध्ये आपण गुंतवणूक करणार आहे ,त्याच्या KYC मध्ये आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य असणार आहे “.या नोटीफिकेशन नुसार , कोणीही वीणा आधार नंबर लिंक करता ,कुठेही गुंतवणूक करू शकणार नाही.
तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर इनरोलमेंट नंबर देऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता / if you don’t have adhar number then you will link inrollement number
छोट्या गुंतवणुकीच्या खात्यामध्ये KYC करताना सरकारने आधार नंबर लिंक करणे अनिवार्य केले आहे.जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही इनरोलमेंट नंबर च्या साहाय्याने छोट्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करू शकता.
कोणत्या गुंवणूकदारांसाठी आधार लिंक करणे गरजेचे असणार आहे ? / adhar card linking is necessary for which investors ?
ज्या गुंतवणूकदारांनी छोट्या गुंवणूकीमध्ये गुंतवणुक केली आहे ,अशा गुंतवणूकदारांना आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य असणार आहे ,तुम्ही जर छोट्या गुंतवणुक स्कीम चे खाते उघडले असेल आणि खाते उघडुन ६ महिने पेक्षा जास्त कालावधी झाला असेल ,तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड त्या स्कीम साठी लिंक करणे गरजेचे आहे.तुम्ही जर असे नाही केले ,तर तुमचे ते खाते १ ऑक्टोंबर नंतर फ्रीज होऊ शकते.
पॅन कार्ड लिंक नसेल तरीही खाते फ्रीज होऊ शकते ? Can account will be freez even if there is no PAN card link?
सरकारच्या वित्त मंत्रालयाने लाँच केलेल्या जाहिराती नुसार जर तुम्ही छोट्या गुंतवणुकीचे खाते उघडले आहे आणि त्या खात्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड लिंक केले नाही , तर दोन महिन्यामध्ये तुमचे खाते फ्रीज होऊ शकते आणि तुम्ही जेव्हा परत त्या खात्यामध्ये पॅन कार्ड लिंक कराल ,तेव्हा तुमचे ते खाते परत सुरू होईल
सरकारने कोणकोणत्या छोट्या गुंतवणुकीसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे ?/ Govt has made Aadhar card link necessary for which small investments ?
सरकारने खालील छोट्या गुंतवणुकीसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे.
१) पोस्ट ऑफिस एफ डी
२) सुकन्या समृध्दी योजना
३) पोस्ट ऑफिस टी डी
४) पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF)
५) किसान विकास पत्र (KVP)
आजच्या लेखामध्ये आपण सरकारच्या वित्त मंत्रालयाने लाँच केलेल्या छोट्या गुंतवणुकिदार संबंधी महत्वाच्या नोटिफीकेशन विषयी माहिती पाहिली.