क्रेडिट नोट अणि डेबीट नोट म्हणजे काय?तसेच या दोघांमधील फरक Meaning and Difference between credit note and debit note in Marathi
मित्रांनो आजच्या लेखात आपण डेबिट नोट अणि क्रेडिट नोट या दोघे संकल्पणांचा अर्थ जाणुन घेणार आहे.सोबतच या दोघांमध्ये काय फरक असतो हे देखील आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डेबिट नोट -debit note
● जेव्हा आपण उधारीत एखाद्या दुकानदाराकडुन माल विकत घेतो अणि विकत घेतलेल्या मालामधील काही माल हा खराब असल्याने दुकानदारास रिटर्न करतो किंवा आपण जेवढा माल आँडर केला आहे त्यापेक्षा अधिक माल पोहोच करण्यात आल्यानंतर आपण त्या मालासोबत एक महत्वपूर्ण डाँक्युमेंट अटँच करून दूकानदारास पाठवत असतो.ज्याला डेबिट नोट असे म्हटले जाते.
● डेबिट नोटमध्ये त्या सर्व मालाविषयी माहीती देण्यात आलेली असते जो आपण दुकानदाराला परत केला आहे.
● डेबिट नोट हे ग्राहक तयार करत असतो अणि दुकानदाराला पाठवत असतो.
Credit note -क्रेडिट नोट
● क्रेडिट नोट हे एक दुकानदार म्हणजेच वस्तुची विक्री करणारा त्याच्या ग्राहकास म्हणजे वस्तुची खरेदी करणारयास पाठवत असतो.
● आपण ज्या व्यक्तीला आपला माल विकला होता त्या व्यक्तीने काही कारणास्तव आपल्याकडुन घेतलेल्या मालापैकी काही माल परत केला.मग जितका किंमतीचा माल समोरच्या व्यक्तीने आपणास रिटर्न केला आहे त्याची इंट्री करण्यासाठी जो मेमो आपल्याकडुन तयार केला जात असतो.त्यालाच आपण क्रेडिट नोट असे म्हणत असतात.
● क्रेडिट नोट तयार केल्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीकडुन त्याने आपणास जो माल रिटर्न केला आहे त्याची किंमत घेऊ शकत नसतो.
क्रेडिट नोट अणि डेबीट नोट संकल्पणा स्पष्टीकरण Credit note debit note concept
डेबिट नोट हे एकुण दोन प्रकारचे असतात ज्यात एकाला इंग्रजीत पर्चेस रिटर्न असे म्हणतात.
पर्चेस रिटर्न म्हणजे काय?Purchase return meaning in Marathi
एखादा खरेदी केलेला माल परत करणे याला पर्चेस रिटर्न असे म्हणतात.
पर्चेस रिटर्न मध्ये आपण दुकानदाराकडुन एखादा खरेदी केलेला माल त्याला रिटर्न पाठवत असतो.जेव्हा आपण एखाद्या पार्टीकडुन मालाची खरेदी करत असतो तेव्हा पार्टीकडुन आपल्याला खरेदीचे बील मिळत असते.ज्याची इंट्री आपण खरेदीच्या व्हाऊचरमध्ये करत असतो.
खरेदीची इंट्री करून झाल्यानंतर ज्याच्याकडुन आपण माल खरेदी केला त्याचे खाते तेवढया अमाऊंटने क्रेडिट करत असतो.म्हणजे यात आपण अशी नोंद करतो की सदर पार्टीला आपणास इतके पैसे द्यायचे आहेत.
हे आपण उदाहरणासहित समजुन घेऊया.
समजा मी एखाद्या कंपनीकडुन दहा हजाराचा माल खरेदी केला आहे.म्हणजे आपण त्या कंपनीचे दहा हजाराचे डेबिटर झालो अणि ती कंपनी आपली क्रेडिटर झाली.
पण आपण जो दहा हजाराचा माल विकत घेतला आहे त्यापैकी काही तीन चार हजाराचा माल त्या कंपनीला माल खराब आहे किंवा आपण आँडर केला त्यापेक्षा खुप जास्त माल कंपनीने पाठविला आहे अशा काहीही कारणास्तव आपण कंपनीचा माल कंपनीकडे वापस पाठवतो आहे.
मग ती कंपनी आपल्याला आपण त्यांचा जेवढा माल रिटर्न केला आहे त्याचा एक मेमो तयार करून देत असते.ज्याला आपण डेबिट नोट किंवा पर्चेस रिटर्न असे देखील म्हणत असतात.
ही एक अशी इंट्री असते ज्याने हे सिदध होत असते की सदर कंपनीस आपण त्यांनी पाठवलेल्या मालापैकी किती तारखेला किती रूपयाचा माल एकुण रिटर्न पाठवला होता.
डेबिट नोटची इंट्री केल्याने आपणास फायदा हा होतो की समजा आपण दहा हजाराचा माल कंपनी कडुन खरेदी केला होता ज्यात आपण तीन हजाराचा माल कंपनीला वापस पाठविला म्हणुन कंपनी आपल्याकडुन दहा हजार मागु शकत नाही कंपनी फक्त आपल्याकडुन सातच हजार मागु शकते कारण तीन हजाराचा माल आपण कंपनीला रिटर्न केला आहे अशी डेबिट नोट मध्ये नोंद करण्यात आली आहे.
डेबिट नोटच्या दुसरया प्रकारात एखादी कंपनी आपणास अशी आँफर देते की तुम्ही जर आमच्याकडुन इतका माल खरेदी केला तर आम्ही त्यावर तुम्हाला इतका डिस्काउंट देऊ.अणि समजा आपण कंपनीची स्कीम आँफर स्वीकारली अणि त्यांनी अट घातली आहे तेवढा माल त्यांच्याकडुन खरेदी केला अणि कंपनीने आश्वासन दिल्याप्रमाणे आपणास काही ठाराविक डिस्काउंट देखील दिला.
मग ह्या डिस्काउंट करीता कंपनी आपणास एक मेमो तयार करून देत असते ज्याला सुदधा डेबिट नोट असेच म्हटले जाते.अणि मग ह्या डेबिट नोटची इंट्री केल्यावर ठरलेल्या प्रमाणे कंपनीकडुन आपणास खरेदी केलेल्या एकुण मालावर ठरलेला डिस्काउंट दिला जात असतो.
क्रेडिट नोटमध्ये सुदधा आपणास दोन पदधतीने इंट्री करता येत असते.ज्यात एक पदधत असते सेल्स रिटर्न.
सेल्स रिटर्न म्हणजे काय?Sales return meaning in Marathi
विकलेला माल परत मिळणे याला सेल्स रिटर्न असे म्हटले जाते.
समजा आपण एका व्यक्तीला पाच हजाराचा माल विकला होता पण काही कारणास्तव त्या व्यक्तीने दोन हजाराचा माल आपल्याला परत केला.मग जो एक हजाराचा माल समोरच्या व्यक्तीने आपणास रिटर्न केला आहे त्याची इंट्री करण्यासाठी जो मेमो तयार केला जात असतो.त्यालाच आपण क्रेडिट नोट असे म्हणत असतो.
क्रेडिट नोट बनवल्यानंतर आपणास समोरच्या व्यक्तीकडुन फक्त तीनच हजार मालाच्या विक्रीचे घेता येत असतात.
क्रेडिट नोटचा अजून एक प्रकार असतो ज्यात आपण एखाद्याला आँफर देतो की समजा तु माझ्याकडुन इतका माल जर खरेदी केला तर मी तुला त्या मालाच्या खरेदीवर इतका डिस्काउंट देईल.
अणि समोरच्याने आँफर मध्ये आपण सांगितल्यानुसार तेवढाच माल आपल्याकडुन जर खरेदी केला तर ठरलेल्या प्रमाणे आपणास त्याला त्या मालाच्या खरेदीवर डिस्काउंट देणे अनिवार्य असते.ज्यासाठी आपणास समोरील माल खरेदी करणारया व्यक्तीच्या नावाने एक क्रेडिट नोट बनवावे लागेल.याने त्या व्यक्तीला ठरलेल्या प्रमाणे आपणास डिस्काउंट देता येईल.
easily explain