म्हाडा लॉटरी 2023 विषयी माहिती mhada lottery 2023 information in Marathi
म्हाडाचा फुलफाॅम काय होतो?
म्हाडाचा फुलफाॅम maharashtra housing and area development authority असा होतो.
म्हाडा लॉटरी काय आहे?
म्हाडा लॉटरी ही एक स्कीम आहे जिच्याअंतर्गत २०२३ मध्ये पाच हजार नऊशे नव्वद इतक्या घरांची लॉटरी काढली जात आहे.
या लॉटरी अंतर्गत आपणास पुणे शहरात वास्तव्यास राहण्याकरीता चांगली घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
म्हाडा लॉटरीसाठी कोण अर्ज करू शकते?
म्हाडा लॉटरी साठी महाराष्ट्र राज्यातील वास्तव्यास असलेला कुठलाही प्रमुख गरजु लाभार्थी व्यक्ती ज्याला स्वताचे घर घ्यायचे आहे तो अर्ज करू शकतो.
म्हाडा लॉटरी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?
म्हाडा लॉटरी २०२३ ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार
lottery.mhada.gov.in ह्या आॅनलाईन पोर्टलवर जाऊन आॅनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे.
अर्ज करण्यासाठी आपणास सर्वप्रथम lottery.mhada.gov.in वर जावे लागेल.
यानंतर होम पेज वर दिलेल्या रजिस्ट्रेशन आॅप्शन वर क्लिक करावे लागेल.
यानंतर आपणास अर्जदाराचा रेजिस्ट्रेशन फाॅम उपलब्ध होईल.हा फाॅम आपणास एकुण तीन टप्प्यांत भरायचा असतो.
पहिल्या टप्प्यात रेजिस्ट्रेशन मध्ये आपणास आपली विचारलेली सर्व महत्वपूर्ण माहिती भरायची आहे.नंतर आपला मोबाईल नंबर टाकुन ईमेलवर ओटीटी प्राप्त करायचा आहे.अणि तिथे सबमिट करायचा आहे.
लॉटरी मध्ये सुद्धा आपल्याला विचारलेली सर्व माहीती व्यवस्थीत भरायची आहे.सोबत आवश्यक ते कागदपत्र अपलोड करायचे आहे.
यानंतर अर्जाची फी भरायची आहे.अणि आपला भरलेला फाॅम सबमीट करून द्यायचा आहे.
म्हाडा लॉटरी काढण्यामागचा शासनाचा प्रमुख हेतू काय आहे?
सर्वसामान्य गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबातील गरीब व्यक्तीला देखील त्याला परवडेल अशा वाजवी दरात पुण्या सारख्या शहरात स्वताचे हक्काचे घर घेता यावे याकरीता महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हाडा लॉटरी काढण्यात येत असते.
म्हणजेच राज्यातील बेघर व्यक्तींना त्यांना परवडेल अशा स्वस्त दरात घर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.
म्हाडा लॉटरी २०२३ कोणी लाँच केली आहे?
म्हाडा लॉटरी ही महाराष्ट शासन अंतर्गत येत असलेल्या गृहनिर्माण अणि क्षेत्र विकास प्राधिकरणाकडुन लाँच करण्यात आली आहे.
म्हाडा लॉटरी २०२३ अंतर्गत कोणाला घरे उपलब्ध करून दिली जातील?
म्हाडा लॉटरी २०२३ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरीब आर्थिक दृष्ट्या कमकुवत नागरीकांना,ज्यांचे उत्पन्न फार कमी आहे अशा अल्प उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना तसेच गरीब मध्यमवर्गीय लोकांना परवडेल अशा वाजवी दरात घर उपलब्ध करून दिले जाते.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ह्या योजनेअंतर्गत गरीब अल्प उत्पन्न तसेच उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती सुदधा पुणे तसेच इतर विविध शहरात स्वताचे हक्काचे घर घेऊ शकणार आहे.
म्हाडा लॉटरी योजना २०२३ चे स्वरूप –
म्हाडा लॉटरी २०२३ ह्या योजनेच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व गरजु बेघर व्यक्तींना परवडेल अशा दरात पुणे तसेच इतर विविध शहरात घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
म्हाडा लॉटरी योजनेच्या सोडती मध्ये सर्व घटक जसे की गरीब मागासवर्गीय अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती,मध्यम वर्गीय व्यक्ती तसेच उच्च उत्पन्न गटासाठी व्यक्ती यांना आपापल्या उत्पन्नाच्या अनुसार म्हाडा लॉटरी अंतर्गत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
म्हाडा लॉटरी योजना २०२३ अंतर्गत ईडबल्युएस कॅटॅगरी मधील व्यक्तींना २० लाखापेक्षा कमी किंमतीत घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना २० लाखापर्यंत घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना ३५ ते ६० लाखापर्यंत घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ह्या लॉटरी योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न असलेल्या गटातील व्यक्तीला साठ लाखापासुन पाच करोड इतक्या किंमतीत घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
म्हाडा लॉटरी २०२३ अंतर्गत तीस लाखांपेक्षा अधिक घरे बांधली जाणार आहे.
म्हाडा लॉटरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?
● अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नागरीक असायला हवा.
● अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षांपेक्षा अधिक असायला हवे.
● ज्या अर्जदाराचे महिन्याचे उत्पन्न तसेच सॅलरी २५ ते ५० हजार इतकी आहे.त्यांना कमी उत्पन्न श्रेणी अंतर्गत ह्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
● ज्या अर्जदाराचे महिन्याचे उत्पन्न तसेच सॅलरी ५० ते ८० हजार इतकी आहे.त्यांना मध्यम उत्पन्न श्रेणी अंतर्गत ह्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
● ज्या अर्जदाराचे महिन्याचे उत्पन्न तसेच सॅलरी ८० हजार ते एक लाख इतकी आहे.त्यांना उच्च उत्पन्न श्रेणी अंतर्गत ह्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
म्हाडा योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी काही महत्वाची कागदपत्रे –
● अर्जदाराचे आधार कार्ड
● अर्जदाराचे पॅन कार्ड
● बॅकेचे पासबुक
● अर्जदाराचे महाराष्ट्र रहिवासी असलेले तसेच जन्म प्रमाण
● अर्जदाराचा मोबाईल नंबर
● पासपोर्ट साईज दोन फोटो
● अर्जदाराचा ईमेल आयडी
म्हाडा लॉटरी करीता आॅनलाईन अर्ज तसेच नोंदणी करण्याची तारीख काय आहे?
म्हाडा लॉटरी करीता आॅनलाईन अर्ज तसेच नोंदणी करण्याची सुरूवात ५/१/२०२३ दुपारी बारा वाजेपासून सुरू झाली आहे.
म्हाडा लॉटरी करीता आॅनलाईन अर्ज तसेच नोंदणी करण्याची अखेरची तारीख काय आहे?
म्हाडा लॉटरी करीता आॅनलाईन अर्ज तसेच नोंदणी करण्याची अखेरची तारीख काय ६/२/२०२३ सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे.
सोडतीसाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख काय असणार आहे?
सोडतीसाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख ७/२/२०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे.
आॅनलाईन पेमेंट स्वीकृतीची अंतिम तारीख काय असणार आहे?
ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची अंतिम तारीख ८/२/२०२३ रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे.
म्हाडा लॉटरी विषयीच्या इतर महत्त्वाच्या बाबी-
● आरटी जी एस अणि एन एफटी द्वारे बँकेत अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख ९/२/२०२३ ही आहे.अणि रक्कम भरण्याची वेळ संब़धित बँकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेपर्यंत असेल.
● सोडती करीता स्वीकृत केलेल्या अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्धी १६/२/२०२३ रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होईल.
● सोडती करीता स्वीकृत केलेल्या अर्जाची शेवटच्या यादीची प्रसिद्धी २०/२/२०२३ रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होईल.
● सोडतीची तारीख २४/२/२०२३ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत ही असेल
● सोडती मधल्या यशस्वी अणि प्रतिक्षा यादीमधल्या अर्जदार व्यक्तींची नावे म्हाडाच्या आॅफिशिअल वेबसाईट वर २४/२/२०२३ रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जातील.
● सोडतीचे ठिकाण: गृहनिर्माण भवन आगरकर भवन म्हाडा आॅफिस पुणे हे असणार आहे.