Mission Majnu review in Marathi

Mission Majnu review in Marathi

मिशन मजनू हा एक प्रेक्षकांच्या हृदयाला भावेल तसेच भावनिक स्पर्श करेल असा भावनिक देशभक्तीपर आधारित चित्रपट आहे.

मिशन मजनु ह्या चित्रपटामध्ये चित्रपटाच्या प्रमुख नायकाचे एक मिशन आहे जे त्याला पाकिस्तान मध्ये वास्तव्यास राहुन पुर्ण करायचे आहे हे आपणास चित्रपटाच्या नावावरून चटकन लक्षात येते.

हे मिशन काय आहे हे आधीच चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये सुदधा दाखविण्यात आले आहे.चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये काही पाकिस्तानी पात्रे देखील दाखवण्यात आली होती.ज्यामुळे हा चित्रपट पाकिस्तान देशात ट्रोल केला जात होता.

ट्रेलर मध्ये सिद्धार्थ याने सुरमा अणि टोपी परीधान केल्याचे दाखवण्यात आले होते.

चिञपटाचा थोडक्यात परिचय –

भारता विरूद्ध १९७१ च्या युद्धात पराभुत झाल्यानंतर पाकिस्तान हा देश अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीस लागला आहे.

अणि अलीकडे भारत देश सुदधा पाकिस्तानच्या ह्या मिशनला सक्सेसफुल करण्याच्या प्रयत्नांना यशस्वी होऊ न देण्याच्या तयारीस लागला आहे.

पाकिस्तान देशाचा हा वाईट मनसुबा यशस्वी होऊ न देण्याची प्रमुख जबाबदारी भारताच्या वतीने चित्रपटाचा प्रमुख नायक राॅ एजंट सिद्धार्थ मल्होत्रा पार पाडताना दिसुन येत आहे.

जो पाकिस्तान ह्या देशात शिंपी अणि भारताचा राॅ एजंट अशा दोन भुमिका साकारत वास्तव्यास आहे.एका खास मोहीमेवर सिद्धार्थ पाकिस्तान देशात गेलेला आहे.

चित्रपटाचा नायक सिद्धार्थ याचे पाकिस्तान मध्ये एका आंधळया मुलीशी लग्न होते अणि ह्या आंधळ्या मुलीच्या भुमीकेमध्ये आपणास साऊथची अभिनेत्री रशमिका मंदाना दिसुन येणार आहे.

पाकिस्तान आपल्या मिशनमध्ये यशस्वी होते की नाही? चित्रपटाचा नायक सिद्धार्थ पाकिस्तानच्या ह्या मिशनला कसा अयशस्वी करतो त्यासाठी तो काय करेल हे आपणास ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपट कधी रिलीज होणार आहे?

हा देशभक्तीपर आधारित चित्रपट भारतीय चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिकस ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आजपासुन म्हणजेच २० जानेवारी पासून पाहायला मिळणार आहे.

See also  आरटीई मोफत प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या आपल्या तालुका जिल्ह्यातील शाळांची यादी कशी अणि कुठे बघायची? RTE school list how to find ?

चित्रपटात मुख्य भुमिकेत कोण कोणते कलाकार दिसुन येतील?

● सिद्धार्थ मल्होत्रा-नायक

● रशमिका मंदाना -नायिका

● शारीब हाशमी

● परमीत सेठी

● कुमुद मिश्रा

● शिशिर शर्मा

चित्रपट दिग्दर्शक – शांतनु बागची

चित्रपट निर्मिती -अमित बुटुला,गरीमा मेहता,रोनी स्क्रुव्ह वाला

मिशन मजनु चित्रपट कोणाला अधिक आवडेल?

ज्यांना देशभक्तीपर अणि जासुसीवर,सिक्रेट मिशनवर आधारित चित्रपट पाहायला आवडते अशा व्यक्तींना हा चित्रपट पाहायला फार आवडेल.टविटर वर देखील प्रेक्षकांकडुन ह्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसुन येत आहे.

प्रेक्षकांच्या वतीने हा चित्रपट थिएटर मध्ये आणण्यात यावा अशी मागणी सुदधा केली जात आहे.ह्या चित्रपटाचा एकुण कालावधी १२९ मिनिटे इतका आहे.अणि चित्रपटाची भाषा हिंदी आहे.

चित्रपटातील गाणे-

● रबबा जानदा

● माती को माॅ कहते है