१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता सरकारी नोकरी – SSC MTS notification 2023 in Marathi
ज्या विद्यार्थ्यांना दहावी पासच्या बेसवर पर्मनंट सरकारी नोकरी हवी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची सुचना आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन गवर्मेंट आॅफ इंडिया कडुन १८ जानेवारी २०२३ रोजी एक अपडेट आले आहे.
मल्टी टास्किंग नाॅन टेक्नीकल स्टाफ अणि हवालदार अशा विविध पदांकरीता भरती करण्यात येत आहे.
आजच्या लेखात आपण याभरती विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
स्टाफ सिलेक्शन कमिशन गवर्मेंट आॅफ इंडिया कडुन कोणत्या पदांसाठी भरती करण्यात येत आहे?
यात मल्टीटास्किंग स्टाफच्या एकूण १० हजार ८८० जागा भरल्या जाणार आहे अणि हवालदार पदाच्या ५२९ पदांची भरती करण्यात येत आहे.
सर्व पदांमध्ये अंध तसेच अपंगांसाठी देखील राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.
सर्व जागांसाठी १८/१/२०२३ पासुन आँनलाईन फाॅम भरायला सुरुवात देखील झाली आहे.
SSC MTS आँनलाईन फाॉम भरण्याची शेवटची तारीख –
सर्व जागांसाठी आपण १७/२/२०२३ पर्यंत फाॅम भरू शकतो.
आॅनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख –
आॅनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख देखील १७/२/२०२३ हीच आहे.पेमेंट हे लेव्हल वन पासुन सेव्हन पर्यंतचे इथे असणार आहे.
SSC MTS परीक्षेचे स्वरूप कसे असेल?
सर्वप्रथम यात विद्यार्थ्यांना कंप्युटर वर आधारित परीक्षा द्यावी लागणार आहे.ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाईल.ज्यांचे इंग्रजी हिंदी पक्के नाहीये असे विद्यार्थी ही कंप्युटर बेझ्ड परीक्षा आपली मातृभाषा मराठी भाषेत सुदधा देऊ शकतात.
याव्यतिरिक्त सुदधा अनेक भाषा इथे आपणास पर्याय म्हणून देण्यात आलेल्या आहेत.
परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल फक्त पहिल्या सेशनला निगेटिव्ह मार्किंग नसेल दुसऱ्या सेशनला असेल म्हणजे एक चुकीचे उत्तर दिल्यावर एक निगेटिव्ह मार्किंग दिली जाईल याची परीक्षा देणारया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
फक्त हवालदार पदासाठी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजेच शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे.यात पंधरा मिनिटांमध्ये सोळाशे मीटर इतके चालावे लागणार आहे.अणि महिलांना वीस मिनिटात एक किलो मीटर चालायचे आहे.
SSC MTS पात्रतेच्या अटी कोणत्या ठेवण्यात आल्या आहेत?
● जो विद्यार्थी भारताचा नागरिक आहे तोच इथे भरतीसाठी फाॅम भरू शकणार आहे.
● जो विद्यार्थी उमेदवार १७/२/२०२३ च्या आधी दहावी उत्तीर्ण झालेला आहे तो ह्या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे.
SSC MTS – वयाची अट तसेच मर्यादा काय ठेवण्यात आली आहे?
१/१/२०२३ रोजी आपले वय यात कॅल्क्युलेट केले जाणार आहे.
● जे विद्यार्थी एम टी एस पदासाठी अर्ज करता आहे त्यांचे वय १८ ते २५ च्या मध्ये असणे आवश्यक आहे.
● अणि जे विद्यार्थी हवालदार पदासाठी अर्ज करता आहे त्यांचे वय १८ ते २७ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
● जे विद्यार्थी एस सी एस टी कॅटॅगरी मध्ये येतात त्यांना वयामध्ये पाच वर्षे सुट दिली आहे.अणि ओबीसी मध्ये येतात त्यांना तीन वर्षांची सुट दिली आहे.
● पीडबलयु बीडी मध्ये अराखीव गटात येणारया विद्यार्थ्यांना १० वर्षे इतकी सुट प्राप्त होईल.
● पीडबलयू बीडी ओबीसी मध्ये येणारया विद्यार्थ्यांना तेरा वर्षांची सुट देण्यात आली आहे.
● पीडबलयू बीडी एस सी एस टी मध्ये येणारया विद्यार्थ्यांना पंधरा वर्षांची सुट दिली जात आहे.
SSC MTS अर्ज कुठे अणि कसा करायचा?
सर्वप्रथम एस एससीच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपले नाव रेजिस्टर करायचे आहे.जर आपले नाव आधीपासून रेजिस्टर असेल तर आपण युझर नेम पासवर्ड टाकुन लाॅग इन देखील करू शकतो.
SSC MTS अर्ज करण्यासाठी फी किती लागणार आहे?
अर्ज करण्याची फी शंभर रुपये आहे.फक्त महिलांना तसेच एससी एसटी पीडबलयू डी कॅटगरी मधील महिलांना इथे कुठलीही फी द्यावा लागणार नाहीये.
SSC MTS परीक्षा केंद्र कुठे कुठे असणार आहे?
महाराष्ट्रातील मुंबई, जळगाव, नागपुर, औरंगाबाद, कोल्हापूर नांदेड नाशिक पुणे अशा विविध ठिकाणी परीक्षा होणार आहे.
परीक्षा किती तास असणार आहे परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल ही इत्यादी माहीती आपण पीडीएफ मध्ये बघु शकतात.
फिजिकल स्टँडर्ड टेस्ट करीता पुरूष अणि महिला यांचे वजन अणि उंची किती हवी फाॅम भरायला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशन कसे केले जाईल ह्या इत्यादी महत्वाच्या बाबी आपण नोटीफिकेशन पीडीएफ मध्ये जाऊन सविस्तर वाचु शकतात.
downloads