एम पीन म्हणजे काय? -Mpin meaning in Marathi

एम पीन म्हणजे काय? -Mpin meaning in Marathi

आपण आपल्या मोबाईल बँकिंग दवारे पैशांची आॉनलाईन देवाणघेवाण करत असताना पासवर्ड म्हणुन आपण एक चार ते सहा अंकी कोड वापरत असतो.

जेणेकरून‌ आपली पैशांची देवाणघेवाण सुरक्षित पद्धतीने व्हावी.त्या पासवर्ड तसेच कोडलाच एम पीन असे म्हटले जाते.

आपण डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्ड दवारे पैशांची देवाणघेवाण करताना जसे चार ते सहा अंकी नंबरचा कोडचा वापर करत असतो एकदम त्याचप्रमाणे एम पीन सुदधा एक कोड तसेच पीन असतो.

मोबाईल दवारे जेव्हा आपण पैशांची आँनलाईन देवाणघेवाण करत असतो तेव्हा एमपीन तिथे पासवर्ड प्रमाणे कार्य करत असतो.

एम पीनचा फुलफॉर्म काय होतो?mpin full form in Marathi

एम पीनचा फुलफॉर्म mobile banking personal identification number असा होत असतो.

एम पीनचा वापर कुठे केला जातो?

एम पीनचा वापर हा मोबाईल बँकिंग मध्ये आँनलाईन पैशांची देवाणघेवाण करत असताना केला जात असतो.

याचसोबत युपीआय अॅप,आयव्हीआर्,एस एम एस बँकिंग आय एम पी एस,युएस एसडी बँकिंग इत्यादी ठिकाणी एम पीनचा वापर केला जात असतो.

काही बँकेत एम पीन हा सहा अंकी अणि काही बँकेत हा चार अंकी असतो.

एम पीनचे महत्त्व काय असते?

जेव्हा आपण मोबाईल बँकिंग द्वारे लाॉग इन करून पैशांची आँनलाईन देवाणघेवाण करत असतो तेव्हा आपल्याला पाठवायची असलेली रक्कम सेंड करण्याआधी हा कोड टाकावा लागतो.तेव्हाच आपले पैसे समोरच्या व्यक्तीला सेंड होत असतात.

म्हणुन मोबाईल बँकिंग दवारे पैशांची देवाणघेवाण करत असताना आपण आपला एम पीन लक्षात ठेवणे फार गरजेचे असते.अणि एम पीन आपण असाच टाकायला हवा जो नेहमी आपल्या लक्षात राहील अणि आपल्याशिवाय इतर कोणालाही माहीत नसेल.

आपण आपला एम पीन कसा अणि कुठुन मिळवायचा?

आपल्याला आपला एम पीन प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम आपले ज्या बँकेत खाते आहे.त्या बँकेचे मोबाईल बँकिंगचे आॉफिशिअल अ्ॅपलीकेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून ओपन करावे लागेल.

See also  राष्टीय सीए दिन विषयी माहीती - National CA Day Information In Marathi

अॅप वर जाऊन आपण आपले रजिस्ट्रेशन करुन घ्यायचे.आपले रजिस्ट्रेशन करुन झाल्यावर आपल्याला आपला एक युझर आयडी आणि एम पीन नंबर दिला जातो.

मोबाईल बँकिंगच्या अँपवर रजिस्ट्रेशन केल्यावर देखील आपणास आपला युझर आयडी आणि एम पीन नंबर अॅपमध्ये दिसुन जात असतो.

एम पीनचा फायदा काय आहे?

● एम पीन शिवाय आपल्या खात्यातून कुठेही पैसे ट्रान्स्फर केले जाऊ शकत नाही म्हणजे समजा आपला मोबाईल हरवला किंवा कोणाच्या हातात आपण दिला त्यात आपले मोबाईल बँकिंग आहे तरी तो व्यक्ती आपल्या खात्यातून दुसरया खात्यात पैसे ट्रान्स्फर करू शकत नाही कारण मोबाईल बँकिंग मध्ये एम पीन शिवाय पैसे ट्रान्स्फर होतच नसतात.

एम पीनचा तोटा काय आहे?

समजा आपण आपला एम पीन नंबर विसरलो तर जोपर्यंत आपल्याला आपला एम पीन नंबर आठवत नाही तोपर्यंत आपण आपल्या मोबाईल बँकिंग वरून कोणालाही पैसे ट्रान्स्फर करू शकणार नाही हा एक तोटा याचा आहे.आपले सर्व व्यवहार ठप्प पडु शकतात म्हणुन आपण एम पीन नेहमी लक्षात राहील असाच ठेवायला हवा.

एम पीन विषयी लक्षात घ्यायच्या इतर महत्त्वाच्या बाबी-

● एम पीन हा एक सेसेंटिव्ह कोड असतो हा आपण इतर कोणासोबतही शेअर करू नये अन्यथा कोणीही आपल्या मोबाईल मध्ये एम पीन नंबर इंटर करून सहज आपल्या खात्यातून त्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करू शकते अणि आपले खाते झटक्यात रिकामे करू शकते.

● आपण आपला एम पीन स्वता देखील युपीआय अॅपचा वापर करून तयार करू शकतो.