MSF – नवीन प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी सूचना- एम एस एफ भरती नवीन अपडेट – MSF bharti 2022 new update

MSF – नवीन प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी सूचना- एम एस एफ भरती नवीन अपडेट – MSF bharti 2022 new update

प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येणारया उमेदवारांसाठी महत्वाची सुचना –

महामंडळा मार्फत राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमधील दिनांक ८/९/२०२२ रोजी प्रसिदध करण्यात आलेल्या अंतिम यादीमधील सात हजार उमेदवारांपैकी ४५०० पर्यतच्या शेवटच्या यादीमधील उमेदवारांना पहिल्या टप्प्यात वेगवेगळया प्रक्षिक्षण केंद्रावर पाठविले जाण्याबाबतचे हे प्रस्तावित आहे.

म्हणुन उमेदवारांना विविध प्रक्षिक्षण केंद्रावर नेमुन देण्यात आलेल्या प्रक्षिक्षण केंद्रावर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे हे सांगण्यास संदेश पाठविले जाणार आहेत.

आपापल्या नेमून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रावर हजर होत असताना उमेदवारांनी काही बाबींची पुर्तता करणे अनिवार्य आहे.यासाठी उमेदवाराला काही महत्वपूर्ण सर्टीफिकेट देखील सादर करावी लागु शकतात.याची सर्व उमेदवारांनी विशेष नोंद घ्यायची आहे.

१)वैद्यकीय प्रमाणपत्र –

उमेदवार हा शारीरीक दृष्टया प्रक्षिक्षणासाठी सक्षम आहे.याचे वैद्यकीय प्रमाणपत्र उमेदवारास द्यावे लागणार आहे.

हे सर्टिफिकेट आपण शल्य चिकित्सकाकडुन,जिल्हा शासकीय रूग्णालयातून अथवा सिव्हील हाँस्पिटलमधुन आणले तरी चालेल.

२)प्रशिक्षणासाठी हजर होणारया उमेदवाराने कोविड नाईंण्टीचे दोन डोस घेतले आहे याचे प्रमाण देखील आणने आवश्यक असणार आहे.अणि समजा उमेदवाराने हे दोन डोस घेतलेले नसतील तर त्यांनी ट्रेनिंगला हजर राहण्याच्या तारखेच्या आधी ४८ तास अगोदर कोविड नाईण्टीची आरटी पीसीआर चाचणी निगेटिव्ह आहे असे सर्टिफिकेट हजर होताना सोबत आणावे.

३) प्रक्षिक्षणासाठी हजर होत असलेल्या उमेदवाराने संबंधित जिल्हा पोलिस अधिक्षक किंवा आयुक्त यांचेकडुन चारित्रय पडताळणी अहवाल प्राप्त करणे देखील गरजेचे आहे.प्रमाणपत्र मिळायला उशिर होत असेल तर चारित्रय पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे याची पावती प्रशिक्षण केंद्रावर उमेदवाराने सादर करावी.

४) सर्व उमेदवारांना ट्रेनिंगसाठी हजर होत असताना सिक्युरीटी डिपाँझिट म्हणुन दहा हजार भरणा करणे आवश्यक असणार आहे.यातील पाच हजार उमेदवाराला परत मिळतील अणि उरलेले पाच हजार नाँन रिफंडेबल असतील म्हणजे ते उमेदवाराला पुन्हा वापस करण्यात येणार नाही.सदर रक्कम उमेदवाराला प्रशिक्षण केंदावर रोख तसेच आँनलाईन देखील जमा करता येणार आहे.

See also  न्युट्रीशिअन अणि डायटेशिअन मधील फरक | Difference between nutrition and dietitian in Marathi

५) प्रशिक्षणासाठी उपस्थित होत असताना काही महत्वपूर्ण कागदपत्रे तसेच साहित्य घेऊन उमेदवारांनी हजर राहणे आवश्यक आहे.ज्यात पँन कार्ड, आधार कार्ड दोन झेराँक्स,दोन फोटो पासपोर्ट साईज,देनंदिन वापराचे कपडे,स्वखर्चाकरीता पैसे,जेवणाकरीता ताट वाटी ग्लास,अंघोळी करीता बादली मग वगैरे खाकी रंग असलेली कँप इतर रोजचे वापराचे स्वच्छतेचे सामान

६) प्रशिक्षणाकरीता केंद्रावर उपस्थित झाल्यानंतर प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना काही पीटीचे सामान खरेदी करावे लागणार आहे.यासाठी महामंडळाने ठरवलेला पीटी किट भत्ता १४५० हा उमेदवाराला महामंडळाकडून नेमणुक केली गेल्यानंतर त्याच्या वेतन खात्यात दिला जाईल

  • खाकी हाफ पँट दोन नग
  • दोन नग पांढरया रंगाचा पीटी टीशर्ट
  • ब्लँक साँक्सचे दोन जोड
  • एक जोड काळया रंगाचा पीटी शुज
  • एक नग नायलाँनचा ब्लँक रंगाचा बेल्ट

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाइट लिंक

अधिक माहिती PDF फाईल

http://mahasecurity.gov.in/recruitment.php

 

एम एस एफ भरती २०२२ मेडिकल टेस्ट तसेच कँरेक्टर सर्टिफिकेट विषयी माहीती MSF bharti 2022 medical test,character certificate in Marathi

 

4 thoughts on “MSF – नवीन प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी सूचना- एम एस एफ भरती नवीन अपडेट – MSF bharti 2022 new update”

Comments are closed.