एसटी प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!एसटी बस प्रवाशांनो सावधान!! -स्मार्ट कार्ड शिवाय एसटी बसमधून सवलतीमध्ये प्रवास करता येणार नाही -MSRTC smart card

एसटी प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!एसटी बस प्रवाशांनो सावधान!!

MSRCT smart card

१ एप्रिल २०२३ पासुन स्मार्ट कार्ड शिवाय एसटी बसमधून सवलतीमध्ये प्रवास करता येणार नाही

जे ज्येष्ठ नागरीक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधुन नियमितपणे तिकिट सवलतीमध्ये प्रवास करता आहे अशा प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे.

जे प्रवासी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस मधुन विविध तिकिट सवलतीमध्ये नियमितपणे रोज प्रवास करत आहेत अशा प्रवाशांना १ एप्रिल २०२३ पासुन स्मार्ट कार्ड बंधनकारक केले जाणार आहे.

३१मार्च २०२३ ही स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी दिलेली शेवटची मुदत आहे.यानंतर प्रवाशांना स्मार्ट कार्ड काढता येणार नाहीये.

म्हणुन एसटी बसमधून विविध सवलती दरामध्ये प्रवास करणारया नागरीकांनी यापुढेही त्यांना सवलतीमध्ये एसटी बस मधुन प्रवास करता यावा यासाठी लवकरात लवकर ३१ मार्च २०२३ अगोदर स्मार्ट कार्ड बनवून घ्यायचे आहे.

कारण आता हे एसटी बस मधुन सवलती दरामध्ये प्रवास करणारया प्रत्येक नागरिकाला बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना म्हणजेच एसटी बस मधुन प्रवास करणारया विविध प्रवर्ग गटातील नागरीकांना किमान ३३ टक्के ते १०० टक्के इतक्या सवलतीमध्ये एसटी बस मधुन सवलतीच्या दरात प्रवास करण्याची सवलत दिली जाते.

एसटी महामंडळाकडुन कोणा कोणाला एसटी बस मधुन सवलतीच्या दरात प्रवास करण्याची सवलत दिली जाते?

साठ वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक वर्ग,पत्रकार लोक,शाळा काॅलेज मध्ये जाण्यासाठी बसने प्रवास करणारे विद्यार्थी, दिव्यांग, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, कर्करोग तसेच इतर दुर्धर आजाराने पीडीत व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक, बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना लाभार्थी, बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती,महिला वर्ग इत्यादींना एसटी बस मध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्याची संधी दिली जाते.

पण आता केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे ज्यात असे ठरविण्यात आले आहे की ज्या एसटी बस प्रवाशांना नियमितप्रमाणे १ एप्रिल २०२३ पासुन सवलतीच्या दरात प्रवास करायचे असेल त्यांना स्मार्ट कार्ड काढावे लागणार आहे.

See also  आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस २०२३ । International Day of Zero Waste 2023 In Marathi

याशिवाय एसटी बस प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही.

म्हणुन सवलतीच्या दरात एसटी बस मधुन प्रवास करणारया सर्व नागरीकांनी ३१ मार्च २०२३ अगोदर कुठल्याही परिस्थितीत आपल्या शहरातील एसटी बस स्थानकावर जाऊन आपले स्मार्ट कार्ड बनवून घ्यायचे आहे.

आम्ही दिलेली माहिती आवडली तर एसटी बस मधुन सवलतीच्या दरात प्रवास करणारया आपल्या इतर सहप्रवासी नागरीकांना मित्र मैत्रिणी सहकारी यांना देखील ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा लाभ घेता येईल.

स्मार्ट कार्ड काय असते हे कसे काढायचे? कुठून बनवायचे असते याचे फायदे काय असतात?याविषयी अधिक सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी आपण आमचे वेबसाईटवर दिलेले स्मार्ट कार्ड विषयीचे आर्टिकल वाचु शकतात.त्यात आम्ही याविषयी सर्व माहिती दिली आहे.