d2m direct to mobile-मोबाईल धारकांसाठी आनंदाची बातमी!
मोबाईल वापरकर्त्याना आता इंटरनेट कनेक्शन शिवाय व्हिडिओ,चित्रपट,मालिका आपल्या मोबाईल वर लाईव्ह बघता येणार
जे व्यक्ती चित्रपट,मालिका वेबसीरीज तसेच इत्यादी व्हिडिओ मल्टिमीडिया बघण्यासाठी नियमित मोबाईल इंटरनेटचा वापर करता त्यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
मोबाईल वापरकर्त्याना आता इंटरनेट कनेक्शन शिवाय देखील आपल्या मोबाईल वर कुठलाही चित्रपट,मालिका, वेबसीरीज क्रिकेटचा सामना इत्यादी करमणुकीचे व्हिडिओ मल्टिमीडिया थेट बघता येणार आहे.
केंद सरकारच्या डीओटी department of telecommunication म्हणजेच दूरसंचार विभागाकडुन एका नवीन टेक्नॉलॉजी वर काम केले जाते आहे.ह्या नवीन टेक्नॉलॉजीचे नाव d2m direct to mobile असे आहे.
या नवीन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने मोबाईल वापरकर्त्याना आपल्या मोबाईल मध्ये इंटरनेटचा बॅलन्स नसताना देखील आॅनलाईन जाऊन चित्रपट,मालिका,वेबसीरीज, क्रिकेट मॅच व्हिडिओ अशा करमणुकीच्या विविध माध्यमांचा उपयोग करता येणार आहे.
म्हणजेच आता मोबाईल मध्ये इंटरनेट डेटा उपलब्ध नसताना देखील मोबाईल वापरकर्त्याना आॅनलाईन जाऊन कुठलाही चित्रपट मालिका वेबसीरीज अशा करमणुकीच्या मल्टिमीडिया माध्यमांचा वापर करता येणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की सध्या केंद्र सरकारकडुन एका नव्या टेक्नॉलॉजी वर काम केले जाते आहे.
यात जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडीया हया नेटवर्कला बायपास करून नेटफ्लिक्स अॅमेझाॅन प्राईम वरील प्राईम व्हिडिओचे स्ट्रिमिंग थेट मोबाईल वापरकर्त्याच्या मोबाईल वर केले जाणार आहे.
म्हणजेच ह्या प्रकल्पातुन आता मोबाईलला देखील व्हिडिओ स्ट्रिमिंग फ्लॅट फाॅर्म नेटफ्लिक्स,अॅमेझाॅन प्राईम
सोबत कुठल्याही इंटरनेट कनेक्शन शिवाय डायरेक्ट कनेक्ट केले जाणार आहे.यासाठी मोबाईल वापरकर्त्याना इंटरनेट बॅलन्स ची कुठलीही आवश्यकता भासणार नाहीये.
कशा पद्धतीने काम करणार ही डिटु एम टेक्नॉलॉजी-
डी टु एम direct to mobile टेक्नॉलॉजी मध्ये व्हिडिओ तसेच कुठलीही इंटरनेट सेवा साठी दुरसंचार विभागाकडुन एका निश्चित स्पेक्ट्रम बॅडवर जोडली जाणार आहे.
स्पेक्ट्रम बॅडच्या मदतीने ब्राॅडकास्ट सर्विस ही मोबाईल वापरकर्त्याना थेट मोबाईल वर देण्यात येणार आहे.
प्रसार भारतीने डायरेक्ट टु मोबाईल ह्या नवीन टेक्नॉलॉजीच्या चाचणीकरीता आय आयटी कानपुर सोबत पार्टनर शिप केली असल्याचे देखील सांगितले जाते आहे.यावर दोघे मिळून काम देखील सुरू केले आहे.
आय आयटी कानपुर सोबत केलेल्या ह्या पार्टनरशिप मध्ये ठरवले होते की ५२६-५८६ मेगा हर्टज बॅड वापरले जाईल.
दुरसंचार विभागाकडुन याकरीता एक विशेष समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे असे सांगितले जाते आहे.
सध्याच्या ह्या डिजीटल युगात आता सर्व काही डिजीटल होत चालले आहे.पेपर वाचण्यापासुन टिव्ही वरील मालिका चित्रपट बघणे सर्व काही आता आॅनलाईन होऊन गेले आहे.
पण सरकारच्या ह्या नवीन टेक्नॉलॉजी मुळे लवकरच आपणास टीव्ही वरील मालिका चित्रपट व्हिडिओ हे आपल्या मोबाईल वर कुठल्याही इंटरनेट कनेक्शन शिवाय बघता येणार आहे.
याने मोबाईल वापरकर्त्याना मोबाईल वर लाईव्ह टिव्ही बघण्यासाठी ओटीटी फ्लॅट फाॅर्मवर जो सबस्क्राईब करण्याचा चार्जचा खर्च करावा लागत होता.मोबाईल वर इंटरनेटच्या माध्यमातून लाईव्ह टिव्ही बघण्यासाठी बॅलन्स साठी जो खर्च करावा लागत होता तो वाचणार आहे.
ह्या नवीन टेक्नॉलॉजी मुळे इंटरनेट कनेक्शन शिवाय आपणास ओटीटी फ्लॅट फाॅर्मवरील व्हिडिओला अॅक्सेस करता येणार आहे.
ही रेडिओ फ्रिक्वेन्सी वर आधारलेली टेक्नॉलॉजी मोबाईल वापरकर्त्याना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यायला दोन तीन वर्षे इतका कालावधी लागण्याची शक्यता सध्या बाजारात वर्तवली जात आहे.