मुंबई जिल्हा पोलिस भरती परीक्षा २०२३ साठी चालू घडामोडीवर आधारीत काही महत्वाचे प्रश्न
७ मे २०२३ रोजी होत असलेल्या मुंबई जिल्हा पोलिस भरती करीता चालू घडामोडीवर आधारीत काही महत्वाचे प्रश्न तसेच मुद्द्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत.
१) अप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
२) भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद ह्या शहरांना जोडणार आहे.
३) भारत देशाचे सध्याचे ५० वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आहेत.
४) एम एस आरटीसी महिलांना तिकिट दरामध्ये ५० टक्के इतकी सुट दिली आहे.
५) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस आहेत.
६) महिला आयपीएल २०२३ चा किताब मुंबई इंडियन्स ह्या संघाने जिंकलेला आहे.महिला आयपीएलचे २०२३ मध्ये हे पहिले संस्करण होते.
७) आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी अमरावती आहे.
८) भारतातील बारा चित्ते दक्षिण आफ्रिका ह्या देशातुन आले आहेत.
९) जीटवेंटी बैठकीचे २०२३ मधील घोषवाक्य वसुधैव कुटुंबकम आहे.जीटवेंटीचे २०२३ मधील अध्यक्षपद भारत देशाकडे देण्यात आले आहे.
१०) रविंद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती होते.१९१३ मध्ये रविंद्र नाथ टागोरांना नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.
११) जागतिक व्यापार संघटनेचे,डबलयु टीओचे मुख्यालय स्वीत्झर्लड देशातील जिनिव्हा ह्या शहरात आहे.हया मुख्यालयाची स्थापणा १ जानेवारी १९९५ रोजी करण्यात आली होती.
१२)सांगली येथील प्रतीक्षा बगाडी हीने पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा वैष्णवी पाटील हिला पराभूत करत जिंकली आहे.
१३) ट्रीपल आर हा चित्रपट तेलगु ह्या प्रादेशिक भाषेतील आहे.ट्रीपल आर चित्रपटातील नाटु नाटु ह्या गाण्याला आॅस्कर देऊन सन्मानित देखील करण्यात आले आहे.
१४) २०२३ मध्ये होणारया क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारत देशाकडे आहे.
१५) सौदी अरेबिया ह्या देशात मुस्लिम धर्मातील लोकांचे पवित्र तीर्थ स्थळ मक्का हे आहे.
१६) महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये पाचवा क्रमांक आहे.यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे अरूणाचल प्रदेश दुसरया क्रमांकावर आहे.छततीसगड तिसरया क्रमांकावर आहे अणि ओडिसा चौथ्या क्रमांकावर आहे.
१७) जी ट्वेंटी देशांची अठरावी शिखर परिषद नवी दिल्ली ह्या शहरात होणार आहे.
१८) २०२३ हे वर्ष भारत देशाने मिलेटस इयर म्हणजे बाजरीचे वर्ष म्हणुन घोषित केले आहे.२०२४ हे वर्ष कॅमल इयर उंट वर्ष म्हणुन घोषित करण्यात आले आहे.
१९) नाबार्डचे मुख्यालय मुंबई येथे आहे.नाबार्डचा फुलफाॅम हा national bank for agriculture and rural development असा होतो.
२०) जय जय महाराष्ट्र माझा ह्या गीताला महाराष्ट्राच्या राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला आहे.हे गीत कविवर्य राजा नीळकंठ बढे यांनी लिहिलेले आहे.अणि हे शाहीर साबळे यांनी गायलेले आहे.
२१) इजिप्त ह्या देशातील अध्यक्ष अब्दुल फताह अल सिसी यांना २६ जानेवारी २०२३ साठी मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते.
२२) १४ डिसेंबर रोजी उर्जा संरक्षण दिवस साजरा केला जातो.
२३) महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग नागपुर गोवा द्रुतगती मार्ग ७६१ किमी लांबीचा सहा पदरी द्रुतगती मार्ग हा नागपुर ते गोवा पर्यंत असणार आहे.
२४) २०२३ मध्ये सुरू असलेली इंडियन प्रीमियर लीगची सोळावी आवृत्ती सुरु झाली आहे.ज्यात पहिला सामना सीएसके जीटी मध्ये झाला आहे.
२५) २०२३ मधील वुमन इंडियन प्रीमियर लीगची पहिली आवृत्ती झाली आहे.ज्यात विजेता संघ मुंबई इंडियन्स आहे अणि उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स हा आहे.
२६) वंदे भारत एक्स्प्रेस ह्या भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव आहे.सध्या आॅपरेशन कंडिशन मध्ये एकुण दहा ट्रेन वेगवेगळ्या मार्गावर धावत आहेत.
२७) महाराष्ट्र दिवस १ मे रोजी दरवर्षी साजरा केला जातो.१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती.
२८) फिफा विश्वचषक २०२२ चा विजेता संघ अर्जेंटिना आहे अणि उपविजेता संघ फ्रान्स आहे.
२९) सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आहेत.भारत देशाचे सध्याचे गृहमंत्री अमित शहा हे आहेत.
३०) आॅपरेशन सर्द हवा हे भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या वतीने राबविले जात असते.भारतीय सीमा सुरक्षा दलाची स्थापना १९६५ मध्ये करण्यात आली होती.
३१) २०२३ मधील प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये उत्तराखंड राज्याच्या चित्ररथास पहिला क्रमांक देण्यात आला आहे.
३२) नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून कर्तव्य पथ असे ठेवण्यात आले आहे.
३३) २०२२ मधील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना अर्जटिना विरूद्ध फ्रान्स असा झाला होता.हा सामना कतार येथे झाला होता ज्यात अर्जेंटिना विजेता ठरला होता.
३४) रूद्राक्ष पाटील हा खेळाडु नेमबाजी ह्या खेळाशी संबंधित आहे.अलिकडेच त्याने वलड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
३५) २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली होती.
३६) अग्नीशमन नळ कांडयांमध्ये कार्बन डायऑक्साइड हा वायु असतो.
३७) २८ फेब्रुवारी हा दिवस सीव्ही रमण यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.
३८) द्रौपदी मुर्मु भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत.द्रोपदी मुर्मु ह्या स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत.हया पहिल्या ट्रायबल कम्युनिटी मधील राष्ट्रपती आहेत.
३९) समृद्धी महामार्ग नागपुर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद नाशिक अहमदनगर ठाणे ह्या दहा जिल्हयातुन जातो.
४०) उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करून आता ह्या जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे.
४१) औरंगाबाद जिल्ह्यांचे नामांतरण करून ह्या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजी नगर ठेवण्यात आले आहे.
४२) एच थ्री एन टु ह्या विषाणुमुळे बर्ड फ्ल्यू होत असतो.
४३) महाराष्ट्र राज्यातील पहिला इलेक्ट्रॉनिक मॅनयुफॅक्चरींग क्लस्टर रांजणगाव पुणे येथे तयार होणार आहे.
४४) महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन पुणे जेलपासुन सुरू करण्यात आले आहे.
४५) महाराष्ट्र राज्यात जेल मधील कैद्यांना कर्ज देणारी जिव्हाळा योजना सुरू करण्यात आली आहे.
४६) राज्यघटना अनुच्छेद कलम ४४ मध्ये समान नागरी संहिता याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.
४७) सन २०२३ टी टवेंटी विश्वचषक आॅस्ट्रेलियाने जिंकलेला आहे.ही महिला टी टवेंटी विश्वचषकाची आठव्या क्रमांकाची आवृत्ती होती.दक्षिण आफ्रिका ह्या देशात हे विश्वचषक आयोजित करण्यात आले होते.
४८) शशिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत.
४९) १० डिसेंबर रोजी मानवाधिकार दिवस साजरा केला जात असतो.
५०) एन के सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत.
५१) ओपेक ही संस्था खनिज तेलाच्या संदर्भात काम करते.
५२) २२ व्या फिफा वलड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बुट अवाॅर्ड कायलियन एम बपपे यांना मिळाला आहे.
५३) हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी स्वरुपात तयार केलेली कोविड नायंटी लस को वॅकसिन
५४) २०२४ मध्ये आॅल्मपिक स्पर्धा पॅरिस येथे होणार आहे.
५५) २०२० मध्ये झालेल्या आॅल्मपिक स्पर्धा टोकियो इथे झाल्या होत्या.२०२६ मधील अमेरिका मध्ये होणार आहे अणि २०३२ मधील ब्रिस्बेन आॅस्ट्रेलिया येथे हर होणार आहे.
५६) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी झारखंड राज्यातील पहिली महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.द्रोपदी मुर्मु ह्या झारखंड मधील नवव्या क्रमांकाच्या राज्यपाल आहेत.
५७) महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला एस आर पीएफ गटाचे ठिकाण नागपुर काटोल आहे.
५८) महाराष्ट्र पोलीस दलामध्ये २ जानेवारी रोजी ध्वज प्रधान दिवस साजरा केला जात असतो.
५९) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर हाताचा पंजा हे अभयनिर्देशक चित्र आहे.
६०) दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष रीत्या तयार करण्यात आलेल्या यंत्रणेचे नाव एन आय ए national investigation agency असे आहे.
६१) भारत अणि चीन दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा रेषेचे नाव मॅकमोहन रेषा असे आहे.
६२) आफ्रिका मधून भारत देशात आणलेले चित्ते मध्य प्रदेश मधील कुणो राष्ट्रीय उद्यानात ठेवले आहे.
६३) स्टॅचयु आॅफ इक्वालिटीच्या रुपात समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्य यांचा पुतळा हैदराबाद तेलंगणा येथे बसविण्यात आला आहे याची उंची २१६ फुट इतकी आहे.
६४) हाॅकी विश्वचषक स्पर्धा २०२३ चे आयोजन ओडिसा राज्यामध्ये करण्यात आले होते.याची ही पंधरावी आवृत्ती होती जर्मनी यात विजेता अणि बेल्जियम उपविजेता ठरला होता.
६५) सुर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह ज्युपिटर बृहस्पती आहे.अणि सुर्यकुलातील सर्वात छोटा ग्रह मर्कुरी बुध हा आहे.
६६) महाराष्ट्र राज्यात लोकसभेवर निवडुन येणारया खासदारांची संख्या ४८ आहे.यात १९ राज्यसभा सदस्य म्हणून निवडले जातात.
६७) मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना १८६२ रोजी करण्यात आली होती.मुंबईचे ह्या वर्षीचे मुख्य न्यायाधीश एस व्ही गंगापुरवाला असे आहे.
६८) काॅरबेट नॅशनल पार्क उत्तराखंड राज्यात आहे.
६९) अंदमान बेट समुहातील ज्वालामुखी निर्मित बेट बॅरेन आइसलँड आहे.
७०) ब्लु माॅरमन हे महाराष्ट्र राज्यातील फुलपाखरू आहे.
७१) ट्विटर ही सोशल मिडिया कंपनी इलाॅन मस्कने खरेदी केली आहे इलाॅन मस्क हा टेस्ला कंपनीचा संस्थापक आहे.
७२) संविधान १०१ दुरूस्ती कायदा जीएसटी सेवा कराराशी संबंधित आहे.
७३) २८ डिसेंबर १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती.
७४) काळा घोडा उत्सव मुंबई शहरामध्ये साजरा केला जात असतो.
७५) जागतिक महिला दिवस ८ मार्च रोजी साजरा केला जात असतो.
७६) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते.सध्या वर्तमान काळात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत.
७७) भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली होती.
७८) भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद होते.
७९) मणिपूर राज्यातील लोकटक सरोवर हे ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
८०) छत्रपती संभाजी नगर येथे महिला २० ची बैठक संपन्न झाली होती.
८१) भारत देशाने अंधांचा टी टवेंटी विश्वचषक जिंकला आहे.
८२) गरूड शक्ती हा सराव भारताचा इंडोनेशिया ह्या देशासोबत आहे.
८३) बहरीन ग्रांड पिक्स २०२३ ही स्पर्धा मॅक्स वरसटपे ह्या खेळाडुने जिंकलेली आहे.
८४) आंतरराष्ट्रीय बौदधिक संपदा निर्देशांक मध्ये भारताचा ४२ वा क्रमांक लागतो.
८५) स्मृती मंधाना ही महिला प्रिमियम लीगमधील सर्वात महागडी खेळाडु ठरलेली आहे.आरसीबीने स्मृती मंधाना हिला ३.४ कोटी मध्ये खरेदी केले आहे.
८६) लडाखचे नवीन उपराज्यपाल बीडी मिश्रा आहेत.
८७) काॅप २८ हवामान शिखर परिषदचे आयोजन यूए ई मध्ये झाले आहे.
८८) भारत देशाने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोल मध्ये मिळण्याचे ध्येय ठेवले आहे.
८९) भारताचे दुसरे क्रमांकाचे सीडीएस म्हणून अनिल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे अणि भारताचे पहिल्या क्रमांकाचे सीडीएस बीपीन रावत होते.
९०) महाराष्ट्र राज्यात सर्वोत्कृष्ट पोलिस युनिट पुरस्कार जालना पोलिस अणि नागपूर पोलिसांच्या युनिटला देण्यात आला आहे.
९१) इस्रोने पीएस एलव्ही ह्या उपग्रह दवारे सिंगापूर देशाच्या दोन उपग्रहाचे पृथ्वीच्या कक्षेत यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
९२) इस्रोने प्रक्षेपित केलेल्या सिंगापुरच्या दोन उपग्रहांची उंची ४४.४ मीटर इतकी आहे.
९३) सुभाष साळुंखे यांची महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
९४) डी आर डीओ अणि भारतीय नौदेलाने ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवरून आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.
९५) आॅस्ट्रेलिया देशाच्या समुद्रात बुडालेल्या जहाजाचे अवशेष ८१ वर्षांनंतर फिलिपाईन्स देशाच्या लुडाॅन बेटाजवळ सापडले आहेत.
९६) महाराष्ट्र सरकारने गावातील भुजल पातळी वाढविण्यासाठी भुजल समृद्ध ग्राम स्पर्धा जाहीर केली आहे.
९७) सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.अणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
९८) महाराष्ट्र सरकारच्या भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक कोटी रूपये असणार आहे.
९९) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती वेननमने क़ोलंबिया देशाच्या सारा लोपेझचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले आहे.
१००) सर्वोच्च न्यायालयाच्या काॅलेजिअमने रमेश धनुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्ती पदासाठी शिफारस केली आहे.