नमो ११ कलमी कार्यक्रम- महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसनिमित्त केले ११ योजनांची घोषणा – NAMO 11 KALAMI KARYKRAM

NAMO 11 KALAMI KARYKRAM -जाणून घ्या कोणकोणत्या लोकांना या योजनांचा लाभ होणार आहे-


महाराष्ट्रातील मराठवाडा परिसरात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४५,००० करोड रुपयांची मदत केली , त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे भारताचे माननीय पंतप्रधान यांच्या वाढदिवसा दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात नवीन ११ योजना अंमलात आणण्याची घोषणा केली ,ज्यात नमो महिला सशक्तीकरण योजना देखील शामील आहे ,ज्याचे लक्ष्य आहे की ,”भारत देशातील ७३ लाख महिलांना भारत सरकारच्या योजनांचा फायदा व्हावा “.

असा असेल राज्य सरकारचा ११ योजनांचा कार्यक्रम –


देशातील जास्तीत जास्त महिलांना सरकारच्या योजनांचा लाभ व्हावा ,हे याचे प्रमुख उदेश्य आहे.४० लाख पेक्षा जास्त महिलांना शक्ती समुहासोबत जोडणे,२० लाख पेक्षा जास्त महिलांचे सशक्तीकरन करणे ,पाच लाख पेक्षा जास्त महिलांना रोजगार ,तसेच टेक्नॉलॉजी चे ज्ञान देणे ,याच सोबत पाच लाख पेक्षा जास्त महिलांना आर्थिक मदत करणे ,हे देखील या योजनांचे उदेश्य आहे.

माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी महाराष्ट्रात राज्य सरकारने कोणत्या ११ योजना चालू केल्या आहेत ?

  1. ४० लाख पेक्षा जास्त महिलांना शक्ती समुहासोबत जोडणे,२० लाख पेक्षा जास्त महिलांचे सशक्तीकरन करणे ,पाच लाख पेक्षा जास्त महिलांना रोजगार ,तसेच टेक्नॉलॉजी चे ज्ञान देणे ,याच सोबत पाच लाख पेक्षा जास्त महिलांना आर्थिक मदत करणे ,हे देखील या योजनांचे उदेश्य आहे.
  2. नमो कामगार कल्याण अभियान – भारतात तयार होत असणाऱ्या नवनवीन प्रोजेक्ट मध्ये योगदान देणाऱ्या ७३,००० पेक्षा जास्त कामगारांना राज्य सरकारने सुरक्षा किट देण्याची घोषणा केली आहे.
  3. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे.देशातील जास्तकरून शेतकरी आपल्या शेती मध्ये जास्तकरून पाण्याच्या समस्यांशी लढतात ,यावर तोडगा म्हणून राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना जल उपलब्ध करून देणे ,मत्स्य पालन सारखे शेती विषयक व्यवसायांना प्राधान्य देणे ,इत्यादी कामे करणे ,हे देखील या योजनांचे मुख्य उद्देश्य आहे.
  4. या योजना अंतर्गत राज्य सरकार राज्यातील बेघर घरांना ,त्यांचे हक्काचे घर देणार आहे ,घरा सोबत राज्य सरकार गरजू लोकांना शौचालय बांधून देखील देणार आहे.याचसोबत सरकार राज्यातील ग्रामीण भागात डांबरी रस्ता बांधणे,नेटवर्क ची सुविधा गावा गावामध्ये पोहोचवणे ,राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना 100 टक्के आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सशक्त बनवणे ,हे देखील या योजनांचे उदेश्य आहे.
  5. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ७३ ग्राम पंचायती निर्माण करणे ,आणि त्या ७३ गावांमध्ये ग्राम सचिवांनी ची नेमणूक करणे ,आणि त्या प्रत्येक जिल्ह्यातील ७३ गावांमध्ये आधुनिक सुविधा आणणे,आणि गावामध्ये सौर ऊर्जे संबंधी प्रोजेक्ट आणणे ,इत्यादी कामे करणे, हे देखील या योजनांचे उदेश्य आहेत.
  6. ७३ आदिवासी स्मार्ट शाळांची निर्मिती करणे ,७३ विज्ञान केंद्रांची स्थापना करणे ,आधुनिक टेक्नॉलॉजी असणाऱ्या स्मार्ट शाळांची निर्मिती करणे ,शाळेतील मुलांना आधुनिक टेक्नॉलॉजी आणि डिजिटल शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणे, विज्ञान विषयावर मार्गदर्शन करणे ,इत्यादी कामे देखील राज्य सरकार त्या योजना द्वारे करणार आहे.
  7. ७३ दिव्यांग पुनर्वसन केंद्रांची स्थापना करणे ,राज्यात जे कोणी विकलांग लोक आहेत, त्यांना विकलांगता प्रमाणपत्र सोबत परिवहन आणि रेल्वे पास ची सुविधा उपलब्ध करून देणे , दीव्यांग लोकांना हवे ते साहित्य उपलब्ध करून देणे , दीव्यांग लोकांसाठी नवनवीन योजना आणणे , दीव्यांग लोकांना टेक्नॉलॉजी चे आणि व्यवसायाचे प्रशिक्षण देणे,विकलांग लोकांना व्यवसाय टाकण्यासाठी त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करणे ,इत्यादी कामे देखील राज्य सरकार या योजनां मार्फत करणार आहेत.
  8. ७३ खेळ केंद्रांची निर्मिती करणे ,खेळासाठी पार्क्स ची निर्मिती करणे,आऊट डोअर खेळासाठी आवश्यक अशा सुविधा उपलब्ध करून देणे ,राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना अंतर राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी त्यांना अंतर राष्ट्रीय ट्रेनर कडून ट्रेनिंग देणे ,राज्यातील खेळाडूचे सशक्तीकरन करणे ,इत्यादी कामे राज्य सरकार या योजना मार्फत करणार आहे.
  9. राज्यातील ७३ शहरांचे सौंदर्यीकरण करणे ,शहरात लोकांना जीवन सोपे जावे यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणे ,इत्यादी कामे देखील राज्य सरकार या योजनां मार्फत करणार आहेत.
  10. राज्यातील ७३ धार्मिक स्थळांना आणि पवित्र तीर्थ क्षेत्र ज्यांना डागडुजीचे आवश्यकता आहे ,अशा तीर्थ क्षेत्रांचा आणि किल्ल्यांचा जीर्णोद्धार करणे ,ऐतिहासिक व प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करणे ,आणि त्या मंदिरा ठिकाणी आवश्यक सुविधांची सोय करणे ,त्या मंदिर परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ,इत्यादी कामे देखील राज्य सरकार या योजनां मार्फत करणार आहे.
  11. राज्यातील ७३ मागासलेल्या गावांचा विकास करणे ,प्रधानमंत्री आवास योजना द्वारे राज्यातील ग्रामीण भागात ज्यांना घरे नाहीत ,त्यांना घरांची सुविधा उपलब्ध करून देणे , गावात रस्ते बांधणे ,गावातील घरा घरांमध्ये लाईट ची सुविधा पोहोचवणे ,गावामध्ये सामुदायिक मंदिरांची स्थापना करणे ,इत्यादी कामे राज्य सरकार या योजनां मार्फत करणार आहे.
See also  CTET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा | CTET Previous Year Question Papers Download PDF
NAMO 11 KALAMI KARYKRAM -जाणून घ्या कोणकोणत्या लोकांना या योजनांचा लाभ होणार आहे-
NAMO 11 KALAMI KARYKRAM -जाणून घ्या कोणकोणत्या लोकांना या योजनांचा लाभ होणार आहे-
NAMO 11 KALAMI KARYKRAM -जाणून घ्या कोणकोणत्या लोकांना या योजनांचा लाभ होणार आहे-
NAMO 11 KALAMI KARYKRAM -जाणून घ्या कोणकोणत्या लोकांना या योजनांचा लाभ होणार आहे-