राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजे काय?हा पुरस्कार कोणाला अणि का दिला जातो? National Film award meaning in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजे काय? – National Film award meaning in Marathi

काल नुकतेच ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.हया पुरस्काराच्या विजेत्यांची नावे देखील लाईव्ह घोषित करताना आपण काल टिव्ही तसेच न्यूज चॅनल वर पाहीली.

अशा वेळी आपल्यातील खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजे काय अणि हा पुरस्कार चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना का दिला जातो आहे आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सुरूवात १९५४ मध्ये करण्यात आली होती.

दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन माहीती अणि प्रसारण मंत्रालयाकडुन केले जाते.यात सर्व कार्य चित्रपट महोत्सव संचालनालयाकडुन पार पाडले जाते.यात पुरस्कारांची घोषणा करण्यापासून पुरस्कार वितरित करण्याचे काम चित्रपट महोत्सव संचालनालय करते.

हा पुरस्कार मागील काही वर्षांपासून राष्ट्रपतींच्या तसेच माहीती आणि प्रसारण मंत्री यांच्या हस्ते दिला जातो आहे.

चित्रपट क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व अभिनेते तसेच कलाकारांना हा विशेष पुरस्कार त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी दिला जातो.

हा पुरस्कार देण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे चित्रपट क्षेत्रातील काम करत असलेल्या अभिनेता अभिनेत्री तसेच इतर सर्व कलाकारांना अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.

National Film award meaning in Marathi
National Film award meaning in Marathi

यात पुरस्कार देण्यात आलेल्या व्यक्तीला पदक बक्षिसाची रक्कम अणि एक मेरीट सर्टिफिकेट दिले जाते.

सर्वप्रथम हा पुरस्कार १९५४ मध्ये देण्यात आला होता.हयावेळी ह्या पुरस्काराला राज्य पुरस्कार असे म्हटले जात असे कारण ह्या पुरस्कारात राज्यातील काही निवडकच क्षेत्र भाषांचा समावेश करण्यात येत होता.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वप्रथम श्यामची आई ह्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देण्यात आला होता.

अणि बेस्ट डाॅकयुमेंटरी हा पुरस्कार सर्वप्रथम मलाबलीपुरमला देण्यात आला होता.

फिचर फिल्म विभागामधील सहा श्रेणीमध्ये अणि नाॅन फिचर फिल्म ह्या श्रेणीत सोनेरी कमळ देण्यात येत असते.अणि इतर श्रेणीत चांदीचे कमळ देण्यात येत असते.

See also  5201314 meaning in Marathi - ५२०१३१४ चा गहन अर्थ

शबाना आझमी यांना आतापर्यंत सर्वात जास्त राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाले आहे.बाॅलीवुड अभिनेता शाहरूख खान यांच्या एकुण सात चित्रपटांना आतापर्यंत हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त केलेल्या सर्व सेलिब्रिटींना वेगवेगळ्या कॅटॅगरी मध्ये ठेवले जाते.हया कॅटॅगरी नुसारच त्यांना पुरस्कारांची रक्कम वितरीत केली जाते.

यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना दोन प्रकारचे पुरस्कार दिले जातात –

१)सोनेरी कमळ

२)चांदीचे कमळ

कुठल्या पुरस्कारासाठी किती रक्कम दिली जाते?

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये सर्वश्रेष्ठ फिचर फिल्मला अडीच लाख रुपये इतके बक्षिस दिले जाते.इंदिरा गांधी पुरस्कार एक लाख २५ हजार रूपये, सर्वश्रेष्ठ बाल चित्रपटाला दीड लाख रुपये इतके बक्षिस दिले जाते.

दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त विजेत्यास १० लाख रुपये शाल अणि प्रशस्तीपत्र दिले जाते.

चांदीचे कमळ देण्यात येणारया नर्गिस दत्त पुरस्कार विजेत्याला दीड लाख रुपये इतके बक्षिस दिले जाते.सामाजिक मुद्द्यांवर आधारित चित्रपटांना दीड लाख रुपये दिले जातात.

सर्वश्रेष्ठ चित्रपटाला एक लाख रुपये, सर्वश्रेष्ठ अभिनेताला ५० हजार रुपये दिले जातात. नाॅन फिचर चित्रपटास चांदीच्या कमळासोबत ५० हजार रुपये रोख दिले जातात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा