राष्ट्रीय विज्ञान दिवस | National science day information 2023 in Marathi
राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो?
दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जात असतो.
राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो?
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी फिजिक्स क्षेत्रात रमण इफेक्टचा शोध लावला होता त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील ह्याच अमुल्य कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात देखील आले होते.
चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या ह्याच अतुलनीय कामगिरी तसेच वैज्ञानिक शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
सर व्यंकट रमण यांनी फिजिक्स तसेच विज्ञान क्षेत्रात केलेल्या अतुलनीय अणि अमुल्य कामगिरीचे कौतुक करण्यासाठी भारत सरकारने हा दिवस साजरा करायला मंजुरी दिली होती.
राष्ट्रीय विज्ञान अणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषदेकडुन १९८६ मध्ये हा दिवस साजरा करायचा प्रस्ताव मांडण्यात आला होता मग भारत सरकारने १९८७ मध्ये हा प्रस्ताव मंजूर केला होता.
तेव्हा पासून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस संपुर्ण भारत देशात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
कलौजी म्हणजे काय? – कलौजीचे फायदे – Kalonji meaning in Marathi
राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतु कोणता आहे?
जनतेला विज्ञानाची महती पटवून देणे देशासाठी संपूर्ण जगासाठी शोध लावणारया सर्व थोर महान शास्त्रज्ञांची आठवण करणे यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
याचसोबत विद्यार्थी वर्गामध्ये विज्ञानाविषयी गोडी रूची निर्माण करण्यासाठी त्यांना विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी देखील दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जेणेकरून येणारी भावी तरूण पिढी देखील विज्ञान क्षेत्रात आपले अमुल्य योगदान देईल.अणि देशाच्या विज्ञान क्षेत्रातील विकासात अधिक हातभार लावेल.
सर चंद्रशेखर व्यंकट रमण कोण आहेत?
भारत देशात आतापर्यंत अनेक थोर शास्त्रज्ञ जन्मले आहेत अशाच काही थोर विद्वान शासत्रज्ञांमध्ये सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांचा देखील समावेश होतो.
चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी फिजिक्स क्षेत्रात २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रमन इफेक्टचा शोध लावला होता.म्हणुन त्यांच्या ह्या महान कार्यासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित देखील करण्यात आले होते.
याचसोबत सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना भारतरत्न हा भारत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील देण्यात आला आहे.
विज्ञानाचे महत्त्व –
आज विज्ञानामुळे मोबाईल इंटरनेटचा वापर करून आपण एकाजागी बसुन दुर देशात बसलेल्या आपल्या मित्र मैत्रिणींशी संपर्क साधु शकतो त्यांना व्हिडिओ काॅल करून प्रत्यक्ष पाहु शकतो.मनोरंजनाच्या विविध साधनांचा उपभोग घेऊ शकतो.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर आज विज्ञानामुळे आपले सर्वांचे जीवन अत्यंत सुलभ अणि सोप्पे झाले आहे.
दरवर्षी भारतात वेगवेगळ्या थीमदवारे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
Nice and useful information
Thanks Mam