महाराष्ट्रातील दोन शहरांना मिळाला स्मार्ट सिटी पुरस्कार national smart City award winner in Marathi
नुकतेच केंद्र सरकारच्या वतीने स्मार्ट सिटी पुरस्कार विजेत्या शहरांची नावे घोषित करण्यात आली आहेत.यात मध्य प्रदेश मधील स्थित इंदोर ह्या शहराला पुन्हा एकदा स्मार्ट सिटी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी पुरस्कारात पुन्हा एकदा इंदौर ह्या शहराने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारण्यात यश प्राप्त केले आहे.
इंदोरच्या पाठोपाठ सुरत अणि आग्रा इत्यादी शहरांना देखील हा स्मार्ट सिटी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ह्या स्मार्ट सिटी पुरस्कारासाठी पात्रता असलेल्या ८० शहरांमधुन ८४५ नामांकने पाठविण्यात आली होती यात ६६ अंतिम विजेता ठरलेल्या शहरांची नावे घोषित करण्यात आली आहे.
अणि महत्वाची गोष्ट म्हणजे यात आपल्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर अणि पिंपरी चिंचवड अशी दोन शहरांची नावे समाविष्ट आहेत.
यात पिंपरी चिंचवड ह्या शहरास प्रशासन श्रेणीत सारथी अॅप करीता सम्मानित केले गेले आहे.पिंपरी चिंचवडने यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
अणि सोलापुर शहराला पश्चिम विभागातील विभागीय स्मार्ट शहर म्हणून सन्मानित करण्यात आले
आहे.
सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून मध्य प्रदेश ह्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.सर्वोत्कृष्ठ राज्यांमध्ये तामिळनाडू हे राज्य दुसरया क्रमांकावर अणि राजस्थान उत्तर प्रदेश हे दोघे राज्य त्रितीय क्रमांकावर आहेत.
याचसोबत चंदीगढ ह्या राज्याने देखील केंद्रशासित प्रदेश ह्या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
भारतातील स्मार्ट सिटी पुरस्काराचे वितरण कधी केले जाईल –
भारतातील स्मार्ट सिटी ह्या पुरस्काराचे वितरण २७ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी मिशन म्हणजे काय?
२५ जुन २०१५ रोजी गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार मंत्रालय भारत सरकारच्या वतीने स्मार्ट सिटी ह्या मिशनचा आरंभ करण्यात आला होता.
आपल्या भारत देशातील सर्व शहरी भागात विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी सरकारने हे मिशन सुरू केले होते.
ह्या मिशन मध्ये देशातील शंभर शहराचा कायापालट घडवून तेथील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणने हे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते.
ह्या योजनेत सर्वप्रथम शहराची गरज काय आहे ते जाणुन घेतले जाते.ती गरज भागविण्यासाठी नियोजन करण्यात येते.तसेच त्या शहरातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नवीन उपाययोजना केल्या जाता