राष्ट्रीय युवा दिन महत्व अणि इतिहास national youth day history and importance in Marathi
12 जानेवारी २०२३ रोजी काय आहे?
१२ जानेवारी ह्या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस आहे.ज्याला आपण विवेकानंद जयंती,राष्ट्रीय युवा दिन म्हणून देखील दरवर्षी साजरा करत असतो.
स्वामी विवेकानंद कोण होते?
भारतात आजवर अनेक थोर विद्वान महापुरुष होऊन गेले स्वामी विवेकानंद त्यांच्या मधीलच एक थोर अध्यात्मिक विद्वान व्यक्ती तसेच सामाजिक नेता होते.
स्वामी विवेकानंद यांचे विचार अणि जीवन चरित्र आजच्या तरूण पिढीला जीवन जगण्याची प्रेरणा देते.स्वामी विवेकानंद हे त्यांच्या तर्कनिष्ठ विचार अणि आवेशपुर्ण भाषण या दोन गोष्टींमुळे आजही अत्यंत प्रसिद्ध आहेत.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी जीवनाचा विचारांचा थोडक्यात परिचय-
● स्वामी विवेकानंद हे भारतातील तरूण पिढीसाठी एक आदर्श नेता होते अमेरिका ह्या देशात शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्व धर्म परिषदेत आपल्या भारत देशाचे अणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व पार पाडले होते.
● स्वामी विवेकानंद हे फक्त ३९ वय होईपर्यंत जगले म्हणजे फार अल्प जीवन त्यांना लाभले होते पण ह्या अल्पकालीन जीवनात त्यांनी जे अनमोल कार्य केले जे अमुल्य विचार समाजाला दिले ते देशातील तरूणांना पिढयान पिढया मार्गदर्शन करेल युवा पिढीला प्रेरित करण्याचे काम करतील.
● स्वामी विवेकानंद यांचा संपुर्ण जीवनप्रवास आपणा सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.वयाच्या अवघ्या २५ ते २६ व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी भगवे कपडे परिधान करत संन्यास स्वीकारला अणि संपूर्ण भारतात भ्रमंतीचा पायी प्रवास केला.या पायी प्रवासात विवेकानंद यांनी अनेक देशांना भेट दिली.भारतातील संस्कृती तत्त्वज्ञान हिंदू धर्माचा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार प्रसार केला.
● स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनकाळात विविध धर्मातील महत्वाचे पवित्र धर्मग्रंथ वाचले त्यांचे ज्ञान ग्रहण केले.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी अणि कोठे झाला होता?
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ मध्ये कोलकता येथे झाला होता.
राष्ट्रीय युवा दिन कधी अणि केव्हापासून साजरा केला जाऊ लागला?
स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस हा १९८४ मध्ये भारत सरकारकडुन राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर १९८५ पासुन दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जाऊ लागला.
राष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो?
स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रापासून तसेच त्यांच्या थोर अणि प्रेरणादायी विचारांपासून देशाचे उद्याचे उज्वल भविष्य ठरणारया तरूण पिढीला प्रेरणा प्राप्त व्हावी याकरीता स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस हा राष्ट्रीय युवा म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
राष्ट्रीय युवा दिन कसा साजरा केला जातो?
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिवस निमित्त दरवर्षी भारत देशात सर्व शाळा काॅलेज मध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
स्वामी विवेकानंद यांचे अमुल्य अणि प्रेरणादायी विचार असलेले साहित्य तसेच ग्रंथ प्रदर्शनासाठी ठेवले जात असते.विवेकानंद यांच्या जीवनावर भाषण व्याख्यान आयोजित केले जाते.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवना विषयी सर्व तरूण पिढीला कळावे यासाठी जागोजागी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले जाते.जागोजागी योगासने केली जातात.
स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय होते?
स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते.
स्वामी विवेकानंद यांच्या गुरूचे नाव काय होते?
स्वामी विवेकानंद यांच्या गुरूचे नाव स्वामी रामकृष्ण परमहंस असे होते.स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या गुरूंच्या नावावरच सामाजिक कार्य करण्यासाठी रामकृष्ण मिशन स्थापित केले होते.
राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व काय आहे?
● स्वामी विवेकानंद यांचे अमुल्य विचार समाजाला अणि देशातील तरूण युवा पिढीला योग्य दिशा दाखवण्याचे मार्गदर्शन करण्याचे काम करतात.म्हणून त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
● राष्ट्रीय युवा दिन आपणास स्वामी विवेकानंद यांनी देशासाठी केलेल्या अमुल्य कार्याचे दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून देतो.
स्वामी विवेकानंद यांचे काही प्रेरणादायी विचार –
● स्वताच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञान प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.
● अनुभव आपला सर्वोत्तम शिक्षक आहे म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपण नेहमी शिकत राहायला हवे.
● जे इतरांसाठी जगतात तेच खरया अर्थाने जिवंत आहेत बाकी सर्व व्यक्ती जिवंतपणी मृत असलेल्या प्रमाणे आहेत.
● आपण जसा विचार करतो तसे आपण बनत असतो.
● जोपर्यंत आपल्या अंगात तरूणाईचा जोम आहे तोपर्यंतच कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकते म्हणून आपण आपण लगेच कार्याला लागावे कारण हीच कार्य करण्याची खरी योग्य वेळ आहे.
● उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबु नका.