NRI,PIO आणि OCI म्हणजे काय? नागरिकत्वात काय फरक आहे ? – NRI,PIO,OCI Nationality difference in Marathi

NRI,PIO आणि OCI नागरिकत्व म्हणजे काय ? – NRI,PIO,OCI Nationality difference in Marathi

एन आर आय,पी आय ओ,ओसी हे शब्द आपण प्रत्येक जणाने ऐकलेले आहे.कधी वर्तमानपत्र वाचत असताना तर कधी टिव्हीवर बातम्या ऐकत असताना तर कधी एखाद्याशी बोलत असताना,संभाषण करत असताना त्याच्या तोंडुन आपणास तो एन आर आय आहे,ती एन आर आय आहे असे शब्द नेहमी ऐकायला मिळत असतात.

पण हे NRI,PIO,OCI म्हणजे काय असते?कोणाला म्हटले जाते?हे व्यक्ती कोण असतात?हेच आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत नसते.

पण काळजी करू नका मित्रांनो कारण आजच्या लेखात आपण NRI कोण असतो?PIO आणि OCI कोणाला म्हटले जाते?इत्यादी विषयी सविस्तर माहीती आपण जाणुन घेणार आहोत.

NRI चा फुल फाँर्म काय असतो?

NRI चा फुलफाँर्म Non Resident Indian असा होतो.

NRI कोणाला म्हणतात?तसेच NRI कोण असतो?

  • NRI म्हणजे असा व्यक्ती जो भारतात जन्मला आहे पण आपल्या उच्च शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी,बिझनेससाठी तो सध्या एका दुसरया देशात तिथला नागरिक म्हणुन वास्तव्यास आहे.
  • भारतातील असे खुप तरूण युवक युवती, प्रौढ व्यक्ती आहेत जे आज परदेशात शिक्षणासाठी,नोकरीसाठी,बिझनेससाठी गेले आहेत आणि तिथेच वास्तव्य करीत आहेत.
  • अशा व्यक्तींची गणना आपण भारतातील नागरीक म्हणुन न करता NRI(Non Resident Indian) भारताचा निवासी नसलेला व्यक्ती म्हणून करत असतो.कारण त्यांनी दुसरया देशाचे नागरीकत्व स्वीकारलेले असते.
  • पण असे लोक बाह्य देशात वास्तव्यास असुन देखील आपल्या देशाची संस्कृती परंपरा आपली मातृभाषा परदेशात देखील जपतात.आपल्या देशात साजरे केले जाणारे सण उत्सव ते परदेशात देखील आपापल्या पदधतीने साजरे करतात.
  • आपल्या मातृभाषेचा विकास करण्यासाठी परदेशात देखील वेगवेगळे अभियान राबवत असतात.म्हणुन अशा भारताचे निवासी नसलेल्या (NRI) ला भारतात अधिक सम्मानपुर्वक नजरेने बघितले जात असते.
  • कारण असे व्यक्ती परदेशात उच्च शिक्षण करून,नोकरी करून,बिझनेस करून आपल्या देशाचे नाव मोठे करत असतात.जी एक अभिमानास्पद बाब आहे.
See also  15 आँगस्टसाठी देशभक्तीपर कोटस अणि शायरी,स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा Independence Day Quotes,Shayri And Wishes In Marathi And Hindi

कँनडा,अमेरिका,इंग्लंड,न्युझीलंड,हाँगकाँग,इत्यादी अशा विविध देशात आज भारतातील अनेक नागरीक परदेशात राहणारे भारताची रहिवासी म्हणुन आज वास्तव्य करीत आहेत.एन आर आयकडे स्वताचा पासपोर्ट असणे फार महत्वाचे असते.

NRI कोणाला म्हटले जात नसते?

अशी व्यक्ती जी आपल्या उच्च शिक्षणासाठी,नोकरीसाठी,बिझनेससाठी परदेशात गेली आहे पण तिने तेथील नागरीकत्व स्वीकारलेले नाही अशी व्यक्ती NRI म्हटली जात नसते.

PIO चा फुल फाँर्म काय आहे?

PIO चा फुल फाँर्म Person Of Indian Origin असा होतो.

PIO म्हणजे काय?

  • PIO म्हणजे एक अशी व्यक्ती जी भारताशी संबंधित असते.पण आता परदेशातील नागरीकत्व प्राप्त करून तिथेच स्थायिक झाली आहे.अशा व्यक्तीला भारतात पुन्हा येण्यासाठी PIO card आवश्यक असते.
  • पाकिस्तान,बांग्लादेश,ईराण,चीन,अफगाणिस्तान,भुतान,श्रीलंका,नेपाळ हे काही असे देश आहेत ज्यातील PIO नागरीकांना भारतात येण्यासाठी PIO card दिले जात नसते.हे देश सोडुन इतर देशातील व्यक्तींना PIO card ची सुविधा दिली जात असते.
  • PIO card ची सुरूवात 19 सप्टेंबर 2002 पासून करण्यात आली होती.

PIO card कोणाला दिले जाते?

● अशी व्यक्ती ज्याच्याकडे भारतात येण्यासाठी पासपोर्ट आहे.

● अशी व्यक्ती जिचे आई वडील 1935 पुर्वी भारतात नागरीक म्हणुन वास्तव्य करीत होते.

PIO card चे चार्ज किती असतात?

असे व्यक्ती ज्यांचे वय 18 वय आहे त्यांच्याकडून PIO card साठी 7500 रूपये एवढा चार्ज आकारला जात असतो.आणि अठरा वर्षापुढील लोकांकडुन प्रत्येकी 15 हजाराच्या चार्जची आकारणी केली जात असते.

PIO card चे फायदे कोणकोणते असतात?

● ज्याच्याकडे पीआयओ कार्ड आहे अशा व्यक्तींना भारताचा प्रवास करण्यासाठी भारतात येण्यासाठी व्हिजाची आवश्यकता नसते.

● ज्याच्याकडे पीआय ओ कार्ड आहे असा व्यक्ती भारतात 180 दिवस म्हणजे सहा महिने वास्तव्य करू शकतो.

● असा व्यक्ती काही ठाराविक क्षेत्र वगळता इतर सर्व विविध कार्ये भारतात करू शकतो.

PIO card प्राप्त व्यक्ती भारतात पाहिजे तितके फिरू शकता पाहिजे ते करू शकता पण अशा व्यक्तींना दर सहा महिन्यांनी त्यांचे लोकेशन(FRRO) foreigner regional registration office मध्ये जाऊन सांगणे आवश्यक असायचे.

See also  FIFA विश्वचषक २०२६ साठी अधिकृत ब्रँडचे अनावरण करण्यात आले

तसेच अशा व्यक्तींना भारतात वोटिंग करायची परवानगी नव्हती,भारतात कुठलीही निवडणुक लढवण्याची परवानगी नव्हती.भारतात मोठे राष्टपती,पंतप्रधान सारखे सरकारी पद हे अशा व्यक्तींना प्राप्त करता येत नव्हते.

2015 मध्ये याजागी एक नवीन नियम लागु करण्यात आला.ज्यात सहा महिन्याचे लागु केलेले restriction काढुन टाकण्यात आले.आणि 2005 मध्ये हे Overseas citizenship of India मध्ये merge करण्यात आले.

OCI चा फुल फाँर्म काय होतो?

OCI चा फुल फाँर्म Overseas Citizenship Of India असा होतो.

OCI म्हणजे काय?

  • Overseas म्हणजेच भारताचे दुहेरी नागरीकत्व (citizenship)असलेल्या व्यक्तीकडे देखील एक पासपोर्ट सारखे कार्ड असते.
  • पण हे कार्ड जे पाकिस्तान,बांग्लादेश,ईराण,चीन,अफगाणिस्तान,भुतान,श्रीलंका,नेपाळ हे काही असे देश आहेत ज्यातील नागरीकांना भारतात येण्यासाठी दिले जात नसते.
  • हे कार्ड देखील पीआय ओ सारखेच असते यात देखील आपल्याला पीआय ओ प्रमाणे भारतात येण्यासाठी व्हिजा लागत नसतो.आणि अशा नागरीकांना FRRO मध्ये नोंदणी करण्याची देखील गरज पडत नसते.
  • यात देखील अशाच व्यक्तींना नागरीकता दिली जाते ज्यांचे आईवडील आजी आजोबा इत्यादी भारताचे नागरीक म्हणुन वास्तव्यास होते.

Overseas citizenship प्राप्त करण्यासाठी शासनाने तयार केलेले धोरण तसेच नियम –

आपण काही असे नियम जाणुन घेणार आहोत ज्याचे पालन करून परदेशात राहणारे भारताचे नागरीक भारतातील परदेशी नागरीकत्वासाठी अर्ज करू शकतात.

● अशा व्यक्तीचा भारतात भारत प्रजासत्ताक झाल्यानंतरचा जन्म असणे आवश्यक आहे.किंवा तो भारत प्रजासत्ताक झाल्यानंतरच्या काळातील भारताचा नागरीक असणे गरजेचे आहे.

● ती व्यक्ती किंवा तिचे वडील तसेच आजोबा अशा भारतीय प्रदेशाचे रहिवासी असावे जो प्रदेश स्वातंत्र्यकाळात भारतात भाग म्हणुन ओळखला जातो.

● तो व्यक्ती पाकिस्तान तसेच बांग्लादेशातील नसावा.आणि त्याचे काही क्रिमिनल रेकाँर्ड नाहीये.

● सध्या ज्या देशाचा रहिवासी म्हणुन तो व्यक्ती परदेशात आहे त्या देशाचा कायदा त्याला दुहेरी नागरिकत्व धारण करण्यास परवानगी देत असावा.

See also  इन्कम टँक्स कसा वाचवायचा? - How you can save income tax legally

OCI card चे फायदे कोणकोणते असतात?

● Oci card असलेली व्यक्ती भारतात प्रवेश प्राप्त करू शकतो एवढेच नाहीतर अशी व्यक्ती भारताचा multipurpose life long visa देखील प्राप्त करू शकतो.

● जर ओसीआई कार्ड धारक व्यक्तीची पाच वर्षापर्यत नोंदणी असेल तर त्यानंतर त्याला भारताचे नागरीकत्व प्राप्त करण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो.

● ओसीआई कार्ड धारक व्यक्ती भारतातील बँकेत स्वताचे एक स्पेशल खाते ओपन करू शकतो.याचसोबत त्याला भारतातील ड्राईव्हींग लायसन तसेच पँन कार्डसाठी अँप्लाय करता येतो.

फक्त ओसीआई कार्ड धारकांना भारतात मतदान करण्याचा, निवडणुक लढवण्याचा तसेच सरकारी नोकरी तसेच उच्च पद प्राप्त करण्याचा,शेती तसेच जमीन खरेदी करण्याचा देखील कुठलाही अधिकार नसतो.

 

 

 

 

NRI,PIO,OCI Nationality difference in Marathi अधिक माहिती करता इंग्रजी त

 

Comments are closed.