New pension scheme vs old pension scheme
जुनी पेंशन योजना अणि नवीन पेंशन योजना मध्ये नेमका काय फरक आहे?
महाराष्ट्र राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी आज म्हणजेच १४ मार्च २०२३ पासुन बेमुदत संपावर जाणार आहेत.या संपाचा मुख्य हेतु जुनी पेंशन योजना लागू केली जावी हा आहे.
म्हणुन आजच्या लेखात आपण जुनी पेंशन योजना अणि नवीन पेंशन योजना या दोघांमध्ये काय फरक आहे जुन्या पेंशन योजनेत काय आहे नवीन पेंशन योजनेत काय आहे हे जाणून घेणार आहोत
जेणेकरून सरकारी कर्मचारी नवी पेंशन योजना बंद करून जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी का करता आहे याचे कारण आपणास थोडक्यात समजुन घेता येईल.
जुन्या पेंशन योजना म्हणजे ops अणि नवीन पेंशन योजना म्हणजे nps.
नवी पेंशन योजना सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने २००४ मध्ये घेतला होता.अणि इतर राज्यांना याबाबद निर्णय घेण्याचा विकल्प सुदधा दिला होता.
आपल्या महाराष्ट्र राज्यात २००५ साला पर्यंत जुनी पेंशन योजनाच लागु होती.पण २००५ नंतर जे कर्मचारी रूजु झाले त्यांच्या करीता नवीन पेंशन योजनेची अंमलबजावणी केली गेली.
आतापर्यंत एकूण पाच राज्यांमध्ये कर्मचारी वर्गाने विरोध दर्शविला म्हणून जुनीच पेंशन योजना लागु आहे ज्यात झारखंड, पंजाब,हिमाचल प्रदेश, राजस्थान अणि पश्चिम बंगाल इत्यादी राज्ये समाविष्ट आहेत.
तर महाराष्ट्र,मध्य प्रदेश, गुजरात,हरियाणा, उत्तराखंड ह्या राज्यात नवीन पेंशन योजना लागू करण्यात आली आहे.
जुनी पेंशन योजना अणि नवीन पेंशन योजना फरक ?
पहिला फरक –
जुन्या पेंशन योजना मध्ये कुठलाही कर्मचारी नोकरी वरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला जेवढा पगार दरमहा नोकरी मध्ये भेटायचा त्याची निम्मी रक्कम पेंशन म्हणून दिली जात होती.
म्हणजे समजा एखाद्या कर्मचारी व्यक्तीला निवृत्तीच्या वेळी ३० हजार रूपये इतका महिन्याचा पगार दिला जातो असेल तर त्याला त्याच्या पगाराच्या निम्मी रक्कम ही सेवानिवृत्ती नंतर दरमहा पेंशन म्हणून दिली जायची.
पण नवीन पेंशन योजना लागु झाल्यानंतर त्यानुसार कुठलाही कर्मचारी नोकरी वरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला आपल्या पगाराच्या फक्त आठ टक्के इतकीच रक्कम पेन्शन म्हणून दरमहा दिली जाऊ लागली.
म्हणजे समजा एखाद्या कर्मचारीला निवृत्तीच्या वेळी ३० हजार इतका पगार प्राप्त होत आहे तर त्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर ३० हजार ह्या पगाराच्या रक्कमेच्या दोन टक्के म्हणजे फक्त दोन हजार दोनशे रुपये इतकेच पेंशन दरमहा दिले जाते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनात तीन लाख रुपयांची वाढ : आता 5 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार
दुसरा फरक –
जुन्या पेंशन योजनेत कर्मचारी वर्गाला ठोक रक्कम दिली जात नव्हती.पण नव्या पेंशन योजनेमध्ये काही अपवाद वगळता कर्मचारी वर्गाला ठोक रक्कम दिली जाते.
तिसरा फरक –
जुन्या पेंशन योजनेत कर्मचारी वर्गाच्या वेतनातून कुठलीही कपात केली जात नव्हती.पण नव्या पेंशन योजनेमध्ये कर्मचारी वर्गाच्या वेतनातून विशिष्ट रक्कमेची तसेच वेतन+डीए ची कपात केली जाते.
चौथा फरक-
जुन्या पेंशन योजनेमध्ये महागाई भत्त्यात वाढ केली जात होती जीपीएफ,२० लाख इतकी ग्रॅज्यूएटी रक्कम दिली जात होती अणि कर्मचारी वर्गाच्या मृत्युनंतर त्याच्या वारसदाराला म्हणजेच पत्नी किंवा मुला मुलींना कुटुंबातील सभासदांना ही पेंशन दिली जात होती.
पण नवीन पेंशन योजना लागू झाल्यानंतर वरील सर्व सोयी सुविधा सवलती बंद केल्या गेल्या.
New pension scheme vs old pension scheme
पाचवा फरक –
जुन्या पेंशन योजनेत कर्मचारी वर्गाचा पैसा विविध सरकारी योजनांमध्ये गुंतवला जात होता.
पण नवीन पेंशन योजना लागू झाला कर्मचारी वर्गाचा हाच पैसा शेअर मार्केट मध्ये गुंतवण्यात येऊ लागला.
नवीन पेंशन योजना ही शेअर मार्केट वर आधारित असल्यामुळे यात काही कराच्या तरतुदी केल्या गेल्या आहेत.तसेच ही पेंशन योजना कर्मचारी वर्गासाठी सुरक्षित देखील नाहीये.
नवीन पेंशन योजना मध्ये पेंशन प्राप्त करण्यासाठी एनपीएस फंड मधील ४० टक्के इतक्या रक्कमेची गुंतवणूक कर्मचारी वर्गाला करावी लागत असते.नवीन पेंशन योजनेत आपल्या एनपीएस फंडामधील ६० टक्के रक्कम कर्मचारी वर्गाला काढता येते.
सहावा फरक –
जुन्या पेंशन योजनेमध्ये नोकरदारांना पेंशनवर कुठलीही करसवलत दिली जात नव्हती.जुन्या पेंशन योजनेमध्ये कोणताही कर लागु नव्हता.
जुन्या पेंशन योजनेमध्ये कर्मचारी वर्गाला गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध नव्हते.
New pension scheme vs old pension scheme