ऑपरेशन त्रिनेत्र काय आहे? Operation Trinetra in Marathi
५ मे रोजी शुक्रवारच्या दिवशी जम्मु काश्मीर मधील राजोरी येथे दहशतवादींनी अचानक भारतीय सैन्याच्या वाहनावर अचानक हल्ला केला.
दहशतवाद्यांकडुन करण्यात आलेल्या ह्या हल्ल्यात चकमकीत भारतीय सैन्यातील पाच सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
तेव्हापासून जम्मु काश्मीर मध्ये भारतीय सैन्याकडुन दहशतवादयांचा नायनाट करण्यासाठी शहीद झालेल्या पाच भारतीय सैनिकांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन त्रिनेत्र सुरू करण्यात आले आहे.
आतापर्यंत ऑपरेशन त्रिनेत्र मध्ये राजौरी अणि बारामुल्ला परिसर येथील दोन आतंकवादींचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश देखील प्राप्त झाले आहे.
ज्या दोन आतंकवादींचा खात्मा भारतीय सैन्याला केला आहे त्यांच्याकडुन अनेक घातक शस्त्रास्त्रांचा साठा देखील प्राप्त झाला असल्याचे सांगितले जात आहे.
जम्मु काश्मीर मधील आतंकवादींचा खात्मा करण्यासाठी त्रिनेत्र हे आॅपरेशन हे जम्मु काश्मीर पोलिस अणि भारतीय लष्कर या दोघांनी मिळून संयुक्त रीत्या राबविले आहे.
ह्या ऑपरेशन त्रिनेत्र मध्ये राजौरी तसेच बारामुल्ला इत्यादी परिसरात सुरक्षा दलाकडुन आतंकवादींना शोधण्यासाठी शोध मोहीम देखील जारी करण्यात आली आहे.
त्रिनेद ह्या शब्दाचा अर्थ काय होतो?
त्रि म्हणजे तीन अणि नेत्र म्हणजे नयन डोळा दोघांचा मिळुन तीन डोळे असा संयुक्त अर्थ होतो.
आपल्या हिंदु धर्मात देवीच्या रूपाला दर्शवण्याचे कार्य हा त्रिनेत्र शब्द करतो.तसेच महादेवाने रौद्र अवतार धारण केल्यावर ते आपला तिसरा डोळा उघडल्यानंतर आपल्या तिसरया डोळयाने पापी राक्षसांना भस्म करून टाकत असत अशी देखील हिंदु धर्मात मान्यता आहे.
थोडक्यात एक वाईटाचा पापाचा नाश करण्यासाठी घेतलेले धारण केलेले देवी देवतांचे रौद्र भयानक रूप हा शब्द दर्शवतो.
त्रिनेद ऑपरेशन चे स्वरूप कसे आहे?
जम्मु काश्मीर मध्ये भारतीय लष्कर जम्मु काश्मीर मधील पोलिस ह्या दोघांच्या वतीने हे ऑपरेशन त्रिनेत्र संयुक्तपणे लाॅच करण्यात आले आहे.
ह्या ऑपरेशन मध्ये सर्व परिसरात आतंकवादींचा शोध घेतला जातो आहे.जिथे आतंकवादींचे टोळके लपुन बसलेले असेल असे वाटत असेल अशा सर्व ठिकाणी ह्या आॅपरेशन अंतर्गत भारतीय लष्कर जम्मु काश्मीर पोलिस अणि सुरक्षा दलाकडुन छापे मारले जात आहेत.
ह्या ऑपरेशन त्रिनेत्र अंतर्गत कोणकोणत्या ठिकाणी आतंकवादींचा विशेष शोध घेतला जातो आहे?
भारतीय लष्कर जम्मु काश्मीर पोलिस यांच्याकडून राबविण्यात आलेल्या ह्या ऑपरेशन त्रिनेत्र अंतर्गत राजौरी बारामुल्ला इत्यादी आतंकवादी लपलेले असु शकतात अशा संशयित परिसरात आतंकवादींचा शोध घेतला जातो आहे.
राजौरी परिसरातील केसरी हिल हा परिसर एक अत्यंत धोकादायक परिसर आहे.इथे जागोजागी काटेरी झुडुपे अणि मोठमोठे दगड आहेत ज्यांच्या आड दहशतवादयांना सहजरीत्या लपता येऊ शकते.
इथे जवळपास दहा ते बारा गुहा सुदधा आहेत ज्यात हे आतंकवादी लपुन बसु शकतात.जम्मु काश्मीर मधील हया आतंकवादी लपुन बसु शकतात अशा सर्व ठिकाणी भारतीय सुरक्षा दलाकडून टप्याटप्याने छापे टाकले जाता आहेत.