पॅन कार्डचा फुलफाॅम काय होतो – Pan card Full form in Marathi

पॅन कार्डचा फुलफाॅम काय होतो Pan card Full form in Marathi

पॅन कार्डचा फुलफाॅम permanent account number असा होतो.यालाच आपण मराठी भाषेत कायमस्वरूपी तसेच स्थायी खाते क्रमांक असे देखील म्हणतो.

पॅन कार्ड म्हणजे काय?Pan card meaning in Marathi

पॅन कार्ड हा भारतातील प्रत्येक कर भरत असलेल्या व्यक्तीला देण्यात येत असलेला एक अत्यंत महत्त्वाचा अणि कायमस्वरूपी खाते क्रमांक असतो.

पॅन कार्ड मध्ये एक दहा अंकी नंबर दिलेला असतो ह्या नंबरचा उपयोग आपण आर्थिक व्यवहार तसेच कामकाजाकरीता करीत असतो.

आपल्याला आपला दैनंदिन जीवनात कुठलाही व्यवहार करण्यासाठी आवश्यकता भासत असणारे पॅन कार्ड हे आधार कार्ड प्रमाणेच एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र मानले जाते.

ज्या प्रमाणे आपण भारत देशातील नागरिक आहोत याचे प्रमाण देण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे आधार कार्ड नसल्यास मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी ओळख सिदध करणारे कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.

याने आपण देशातील नागरिक आहोत किंवा दहशतवादी आहोत, परदेशातील व्यक्ती आहोत याची भारत सरकारला पोलिसांना ओळख पटवता येते.

त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडले जावेत,त्यात कुठलीही अडीअडचण येऊ नये कुठलीही फसवेगिरी होऊ नये यासाठी सरकारने आपण करत असलेल्या आर्थिक व्यवहार कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पॅन कार्ड हे डाॅक्युमेंट तयार केले आहे.

See also  मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२३ विषयी माहिती - CM Fellowship Programme Information In Marathi

पॅन कार्डचा वापर आपण आर्थिक व्यवहाराकरीता मुख्यत्वे करत असतो.पॅन कार्ड हे भारत देशातील नागरिकांसोबत परदेशातील नागरीकांना देखील आर्थिक व्यवहारासाठी
लागणारे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे.

फक्त भारत देशातील नागरिकांची पॅन कार्ड नोंदणी प्रक्रिया वेगळी असते आणि दुसरया देशातुन परदेशातून भारतात आलेल्या परदेशी नागरीकांसाठी म्हणजे एन आर आय साठी ही नोंदणी प्रक्रिया थोडी वेगळी असते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर पॅन कार्ड हे एक आपले आर्थिक ओळखपत्र असलेले कागदपत्र आहे.ज्याचा उपयोग आपण आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो.

पॅन कार्ड कोणाला अणि कुठे कुठे लागत असते?

ज्या व्यक्तीचा आयटी रिटर्न ५० हजार पेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना आय टी रिटर्न फाईल करण्यासाठी पॅन कार्ड हे डाॅक्युमेंट लागत असते.

बॅकेत खाते ओपन करत असताना तसेच एखाद्या जाॅब साठी तसेच लोन वगैरे साठी अर्ज करताना गॅस कनेक्शन घेत असताना देखील आपणास पॅन कार्ड लागत असते.

पॅन कार्ड मध्ये पॅन कार्ड धारकाची कोणकोणती माहीती दिलेली असते?

पॅन कार्ड मध्ये पॅन कार्ड धारकाची वैयक्तिक माहिती जसे की पॅन कार्ड धारकाचे नाव त्याची जन्मतारीख, फोटो सही असते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याचा पॅन नंबर permanent account number दिलेला असतो.हया नंबर मध्ये आपली सर्व आर्थिक करविषयक महत्वाची माहीती दिलेली असते.

हा पॅन कार्ड नंबर एका कोपरयात अल्फाबेट अणि नंबरच्या स्वरूपात देण्यात आलेला असतो.

याचसोबत पॅन कार्ड मध्ये पॅन कार्ड धारकाच्या पालकांचे नाव पण असते.

पॅन कार्ड काढण्यासाठी काय करावे लागते?

तसे पाहायला गेले तर मित्रांनो पॅन कार्ड बनवण्यासाठी खुप मोठी प्रकिया पार पाडावी लागत नसते.आज आपण भारतातील कुठल्याही शहरात जिल्ह्यात असु तरी देखील
आपले पॅन कार्ड एकदम सोप्या अणि सहज पद्धतीने तयार करून घेऊ शकतो.

पॅन कार्ड आपण आॅनलाईन तसेच आॅफलाईन या दोन्ही पद्धतीने बनवु शकतो.दोघांची प्रकिया जवळजवळ सारखीच असते.

See also  गणेश चतुर्थीसाठी घरगुती डेकोरेशन आयडीया Ganesh chaturthi decoration idea at home

फक्त फरक एवढाच आहे की आॅनलाईन पदधतीने पॅन कार्ड बनविण्यासाठी आपणास एन एस डी एल ह्या आॅनलाईन वेबसाईटवर जावे लागते.अणि आॅफलाईन पद्धतीने पॅन कार्ड बनविण्यासाठी आपणास सायबर कॅफे वगैरे मध्ये जावे लागते.

फक्त पॅन कार्ड बनविण्यासाठी आपणास 49A ह्या नावाचा एक फाॅम घेणे व हा फाॅम भरणे आवश्यक असते.हा फाॅम आपणास आपल्या घराजवळील सायबर कॅफे मध्ये तसेच झेरॉक्स शाॅपीवर देखील अत्यंत सहजपणे उपलब्ध होऊन जात असतो.

आॅनलाईन तसेच आॅफलाईन दोन्ही पद्धतीने पॅन कार्ड बनविण्यासाठी भरलेला फाॅम सबमिट करताना आपणास काही प्रक्रिया शुल्क देखील भरावे लागत असते.

यानंतर आपले पॅन कार्ड ४० ते ४५ दिवसात आपल्या दिलेल्या पत्यावर आपणास घरपोच पोस्टाने प्राप्त होत असते.

याचसोबत पॅन कार्ड बनविण्यासाठी आपणास काही महत्त्वाच्या कागदपत्रांची देखील आवश्यकता असते ते आपल्याकडे असायला हवेत.ही सर्व कागदपत्रे आपणास ह्या फाॅमसोबत जोडावी लागत असतात.

पॅन कार्ड बनविण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे-

आपल्या ओळखीच्या प्रमाणासाठी आपणास आधार कार्ड राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट इत्यादी पैकी कुठलेही एक कागदपत्र लागत असते.आधार कार्डचा पॅन कार्डचा उपयोग आपण अॅडरेस प्रुफ म्हणून देखील करू शकतो.

पॅन कार्ड बनविण्यासाठी आपणास आपल्या जन्माचे प्रमाण देणे आवश्यक असते त्यासाठी आपण आपले दहावी (ssc marksheet) किंवा (hsc marksheet) एच एससी प्रमाणपत्र जोडु शकतो किंवा आपण आपला जन्म दाखला सुदधा यासाठी देऊ शकतो.

  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • पॅन कार्ड बनविण्यासाठी वयोमर्यादा अट-
  • पॅन कार्ड बनविण्यासाठी कुठलीही खास वयोमर्यादा अट घातली गेली नाहीये अठरा वर्षे पुर्ण असलेली कुठलीही व्यक्ती आपले पॅन कार्ड बनविण्यासाठी पात्र आहे.
  • याचसोबत विविध संस्था कंपन्या फर्म सोसायटी देखील आर्थिक व्यवहारासाठी आपले पॅन कार्ड बनवु शकतात.

पॅन कार्डचे महत्व –

टॅक्स भरत असलेल्या व्यक्तीला ओळखण्यासाठी त्याची आर्थिक ओळख पटवुन घेण्यासाठी पॅन कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेले महत्वाचे कागदपत्रे आहे.

See also  मराठी सुविचार - marathi suvichar

आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन अनिवार्य आहे याशिवाय आपण आयकर रिटर्न भरू शकत नाही.याचसोबत पाच लाखापेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता खरेदी करताना देखील पॅन कार्ड लागत असते.

पॅन कार्ड बनविण्यासाठी किती पैसे लागतात?

पॅन कार्ड बनविण्यासाठी आपणास १०० ते १५० रूपये इतकी किंमत मोजावी लागत असते.पण हे पॅन कार्ड बनवुन भारत देशाच्या बाहेर मागविण्यासाठी आपणास किमान साधारणत १००० ते १५००० इतका खर्च येऊ शकतो.

जर आपण एकापेक्षा जास्त पॅन वापरताना आढळुन आलो तर आपल्याकडुन दंड देखील वसुल केले जाऊ शकते.ही दंडाची रक्कम १० हजार ते १५ हजार इतकी असते.

आपले पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी आपणास काय करावे लागते?

आपण एन एस डी एल ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पॅन डेटा मध्ये सुधार हा पर्याय निवडुन घरबसल्या आॅनलाईन पदधतीने आपले पॅन कार्ड अपडेट करू शकतो.

पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी आपणास आपले ओळख प्रमाण तसेच आपल्या पत्याचा पुरावा लागत असतो.

अणि समजा आपले पॅन कार्ड हरवले असेल तर आपण आॅनलाईन तसेच आॅफलाईन दोन्ही पैकी कुठल्याही एका पद्धतीने डुप्लीकेट पॅन कार्ड साठी आपला अर्ज दाखल करु शकतो.

फक्त डुप्लीकेट पॅन कार्ड प्राप्त करण्यासाठी आपणास काही चार्ज भरावा लागतो.यानंतर ही डुपलीकेट काॅपी आपणास आपल्या राहत्या पत्यावर पोस्टाने मिळुन जात असते.

पॅन कार्ड विषयी जाणून घ्यायच्या इतर महत्त्वाच्या बाबी-

१ जानेवारी २००५ पासून सर्व चलनाकरीता पॅन कार्ड जारी करण्यात आले आहे.पॅन कार्ड ची प्रोसेस ही सीबीडीटी (central board of direct tax) अंतर्गत येत असते.

ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली म्हणजेच सिस्टम आहे ज्यात आपली म्हणजेच कर भरत असलेल्या व्यक्तीची सर्व करविषयक सर्व महत्वाची माहिती ही एका नंबर मध्ये रेकाॅड करण्यात येत असते हा नंबर आपला पॅन कार्ड वर दिलेला पॅन नंबर असतो.

जे व्यक्ती भारतात निवास करत नाही अशा व्यक्तींना पॅन कार्ड बनविण्यासाठी 49Aहा फाॅम भरावा लागत नसतो अशा परदेशात राहत असलेल्या व्यक्तींना 49AA.हा अर्ज भरावा लागतो.