Pesa act Information in Marathi
पेसा म्हणजे काय? Pesa meaning in Marathi
नुकत्याच प्राप्त झालेल्या तलाठी भरतीच्या अपडेट मध्ये आपणास पेसा प्रकरणामुळे यंदाची तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे असे सांगितले आहे.
आपल्यातील खुप जणांना हा प्रश्न पडला असेल की हे पेसा मुददा काय आहे यामुळे तलाठी भरती लांबणीवर का पडत आहे?
म्हणुन आजच्या लेखात आपण पेसा म्हणजे काय?पेसा अंतर्गत कोणकोणते उमेदवारांना अर्ज करता येतो ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
पेसा क्षेत्र म्हणजे काय?
पेसा हे क्षेत्र अनुसुचित क्षेत्र तसेच अनुसूचित विभागामध्ये वास्तव्यास असणारे जे अनुसुचित जमाती मधील लोक असतात त्यांच्यासाठी हे पेसा क्षेत्र असते.
पेसा क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजे काय?
पेसा क्षेत्रातील तलाठी पदे याचा अर्थ अनुसुचित क्षेत्र विभागातील भरली जात असलेली तलाठी पदे.
ज्या जिल्ह्यात आदिवासी लोकांची/अनुसुचित जमातीच्या लोकांची संख्या खुप जास्त प्रमाणात असते.अशा क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून संबोधले जाते.
पेसा अंतर्गत कोणते उमेदवार भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात?
जे अनुसुचित जमाती मधील उमेदवार अनुसुचित क्षेत्र तसेच विभागामध्ये वास्तव्यास आहेत अशाच उमेदवारांना कुठल्याही भरतीमध्ये पेसा अंतर्गत निघालेल्या जागांसाठी अर्ज देखील दाखल करता येत असतो.
म्हणजे पेसा अंतर्गत त्याच क्षेत्रातील राहत असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येतो ज्या क्षेत्रात आदिवासी लोकांची संख्या खुप जास्त आहे.
म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हटले तर पेसा अंतर्गत भरली जाणारी पदे ही अनुसुचित क्षेत्रात राहत असलेल्या अनुसुचित जमाती मधील उमेदवारांसाठी राखीव असतात.
यात इतर कुठल्याही दुसरया उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा नसते.
जर अनुसूचित जमातीचा उमेदवार स्वता किंवा त्याचे आईवडील आजी आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसुचित क्षेत्रात २६ जानेवारी १०५० पासुन सातत्याने वास्तव्यास असतील अशाच अनुसूचित जमाती मधील उमेदवारांनाच पेसा अंतर्गत तलाठी किंवा इतर कुठल्याही भरतीसाठी निघणारया जागांसाठी अर्ज दाखल करता येत असतो.
याचसोबत पेसा अंतर्गत भरतीसाठी फाॅम भरण्यासाठी अनुसुचित क्षेत्रात वास्तव्य करीत असलेल्या अनुसुचित जमाती मधील उमेदवारांना आपण २६ जानेवारी १९५० पासुन येथील क्षेत्रात मुळ रहिवासी आहोत असा पुरावा देखील द्यावा लागत असतो.
हा पुरावा तहसिल कार्यालयात तसेच तलाठी कार्यालयातुन देखील उपलब्ध होऊन जात असतो.
पेसा अंतर्गत तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची तलाठी पदावर नियुक्ती करण्याआधी ते खरच अनुसूचित क्षेत्रातील अनुसुचित जमाती मधील वास्तव्य करणारे उमेदवार आहेत का याची पडताळणी करण्यासाठी उमेदवारांची चौकशी केली जाते.
त्यांनी सादर केलेला रहिवासी पुरावा खरा आहे किंवा खोटा याची देखील चाचपणी केली जाते.
मग सर्व पडताळणी मध्ये उमेदवार अनुसूचित क्षेत्रातील मुळ रहिवासी आहे अणि तो अनुसुचित जमाती मधीलच आहे हे सिदध झाल्यावर त्याची अखेरीस पदनियुक्ती करण्यात येत असते.
ज्या जिल्ह्यात पेसा अंतर्गत पदभरती केली जात आहे त्या जिल्ह्यातील अनुसुचित क्षेत्रात मुळ वास्तव्य करत असलेल्या अनुसुचित जमाती मधील उमेदवारालाच पेसा अंतर्गत अर्ज करता येत असतो.
उदा, म्हणजे समजा नाशिक जिल्ह्यातील अनुसुचित क्षेत्रातील मुळ रहिवासी अनुसूचित जमाती मधील उमेदवार आहे तो उमेदवार पुणे तसेच इतर जिल्ह्यातील पेसा अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही.
स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार कोणाला म्हटले जाईल?
जे अनुसुचित जमाती मधील उमेदवार किंवा त्यांचे आईवडील/आजी आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसुचित क्षेत्रात २६ जानेवारी १९५० पासुन वास्तव्यास आहेत अशा उमेदवारांना स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार म्हटले जाते.
पेसा कायद्याअंतर्गत भारत देशातील एकुण किती अणि कोणत्या राज्यांचा समावेश होतो?
पेसा कायदा अनुसूचित जमाती मधील लोकांशी संबंधित कायदा असतो हा कायदा अनुसुचित जमाती मधील लोकांच्या प्रथा परंपरा संस्कृती यांचे जतन संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आला होता.
पेसा कायदा हा १९९६ मध्ये २४ डिसेंबर रोजी सर्वप्रथम अस्तित्वात आला होता.
पेसा कायद्याअंतर्गत भारत देशातील एकूण १० राज्यांचा समावेश होतो ज्यात महाराष्ट्र राज्य, आंध्र प्रदेश,गुजरात,मध्य प्रदेश, झारखंड,उडिसा, छत्तीसगड,हिमाचल प्रदेश,राजस्थान, तेलंगणा ही राज्ये समाविष्ट आहेत.
पेसा अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची नावे –
महाराष्ट्र राज्यातील एकुण १३ जिल्हे ही पेसाअंतर्गत येतात.
- नाशिक
- पुणे
- अहमदनगर
- ठाणे
- पालघर
- नंदुरबार
- धुळे
- जळगाव
- यवतमाळ
- अमरावती
- नांदेड
- चंद्रपूर
- गडचिरोली