एनपीसीआयने केला सर्वात मोठा खुलासा सर्वसामान्य ग्राहकांना युपीआय व्यवहाराकरीता कुठलीही शुल्क आकारणी केली जाणार नाही -UPI payment charges latest update in Marathi

UPI payment charges latest update

एनपीसीआयने केला सर्वात मोठा खुलासा सर्वसामान्य ग्राहकांना युपीआय व्यवहाराकरीता कुठलीही शुल्क आकारणी केली जाणार नाही upi payment charges latest update in Marathi

एनपीसीआय कडुन म्हणजेच नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन कडुन युपीआय पेमेंट बाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले होते.

UPI payment charges latest update
UPI payment charges latest update

या परिपत्रकात असे नमुद केले होते की एक एप्रिल २०२३ पासून युपीआय पेमेंट ट्रान्झॅक्शनवर पीपीआय चार्ज आकारले जाणार आहे.

यात असे देखील दिले होते की पीपीआयकडून‌ युपीआयदवारे केल्या जाणाऱ्या मर्चंट पेमेंट ट्रान्झॅक्शनवर इंटरचेंज चार्ज देखील आकारले जाणार आहे.

यामुळे सर्वसामान्य मोबाईल वापरकर्ते जे युपीआयचा वापर करून पैसे ट्रान्स्फर करत असतात.पैशांची देवाणघेवाण करीत असतात त्यांना हीच चिंता सतावत होती की युपीआय पेमेंट वर आपणास देखील शुल्क भरावे लागणार आहे की काय?

पण याबाबत एक मोठा खुलासा एनपीसीआयने केला आहे ज्यात एनपीसीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की सर्वसामान्य ग्राहकांना युपीआय पेमेंट सेवा आधीप्रमाणे निःशुल्क अणि फ्री मध्ये दिली जाणार आहे.

बॅक खात्याशी संबंधित युपीआयदवारे केल्या जाणाऱ्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारावर देखील कुठलेही शुल्क आकारले जाणार नाहीये.

फक्त पीपीआय(prepaid payment instrument) वाॅलेट दवारे जे ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे त्यावर काही शुल्क आकारणी केली जाणार आहे.

एनपीसीआयने हे देखील स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही आमच्या परिपत्रकात असे सांगितले नमुद केले आहे की 1 एप्रिल 2023 या कालावधीपासून युपीआय दवारे केल्या जात असलेल्या मर्चंट पेमेंट ट्रान्झॅक्शनवर शुल्क आकारले जाणार आहे.सर्वसामान्य ग्राहकांना हे शुल्क लागु केले जाणार नाही.

आम्ही फक्त पीपीआय दवारे केल्या जात असलेल्या 2000 रूपयांपेक्षाच्या अधिक ट्रान्झॅक्शनवर इंटरचेंज चार्ज लावणार आहे.

हे चार्ज किमान 0.1 ते1.1 टक्के इतके लावले जाऊ शकतात.तेही मर्चंट पेमेंट ट्रान्झॅक्शनवर हे चार्ज आम्ही घेणार आहोत.

See also  फायनान्शिअल फ्रिडम म्हणजे काय? - Financial freedom meaning in Marathi