PM-KMY – PM-KISAN
योजनेची वैशिष्ट्ये- PM-KMY आणि PM-KISAN योजना बद्दल थोडक्यात माहिती –
- लघु व मध्यम जमीन धारक शेतकर्यांना आर्थिक सुरक्षितता देण्याकरता PM-KMY आणि PM-KISAN या योजनाचा आरंभ करण्यात आला आहे.
- शेतकर्यांनाकडे बर्याचदा काहीही आर्थिक बचत नसते आणि वयस्कर झाल्यानंतर जगण्याकरता जीवन निर्वाहाचे साधन ही राहत नाही.
- ह्या योजनेनुसार 60 वर्ष वयानंतर शेतकर्यांना सुखी आणि आरोग्यदायक जीवन जागता यावे हा उद्देश्य आहे.
- या योजनेनुसार शेतकर्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा फिक्स 3000 रु. पेन्शन मिळेल अशी तरतूद आहे.
- ही ऐच्छिक योजना असून शेतकर्यांना ह्यात योगदान करावे लागणार आहे ,साधारण 55-200 रुपये शेतकर्यांना (विमा हफ्ता सारखं) दर महा जमा करावे लागणार आहे.
- केंद्र सरकार तर्फे तितकीच रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
- 18-40 वर्ष वयोगटातील सर्व शेतकरी ह्या योजनेस पात्र असून , आधार कार्ड, बँक खाते आणि PM KISAN खाते असणे सुद्धा आवश्यक आहे.
- जवळच्या आपले सरकार केंद्रात जावून (CSC) नोंदी करता येते.
- PM-KMY योजनेत LIC तर्फे पेन्शन फंड च शेतकर्यांना वितरण होणार आहे.
- शेतकर्यांचे जोडीदार( पती पत्नी) दोन्ही सुद्धा ह्या योजनेत सहभागी होवू शकतात व त्यांना त्याप्रमाणे (60 वर्षा नंतर ) वेगळे 3000 रुपये पेन्शन मिळेल.
- काही कारणास्तव PM-KMY योजना सुरू ठेवता येत नसेल तर शेतकर्यांना योजना बंद करता येवून , जमा झालेली रक्कम व्याजा सहित परत करण्यात येते.
- जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सहभागी असतील त्यांचा विमा हप्ता त्या योजनेतून परस्पर कपात केला जातो व शेतकरयास पुन्हा विमा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही.
- दुर्दवाने योजेंनेतील शेतकर्यांच पेन्शन सुरू झालयांनंतर मृत्य झाल्यास , पत्नीस दरमहा रुपये 1500 पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. तसेच पेन्शन आधी मृत्य झाल्यास योजना सुरू ठेवता येते किंवा बंद करून जमा झालेल पैसे व्याजा सहित परत मिळण्याची ही तरतूद आहे
PM-KMY बद्दल अधिक माहिती करता क्लिक करा – https://pmkmy.gov.in/
Pradhan Mantri KIsan Samman Nidhi (PM-KISAN)
केंद्र सरकारकडून ही योजना अमलात आणली गेली असून
योजनेची वैशिष्ट्ये
शेतकर्यांना शेती खर्चा करता, पीक लागवडी करता मदत व्हावी , आर्थिक हात भार मिळावा हा ह्या योजनेचा उद्देश्य आहे. शेती करता लागणारे बी बियाणे , पीक संरक्षक कीटक नाशके, खते खरेदी करण्यास मदत व्हावी.
या योजनेतून केंद्र सरकार् कडून शेतकर्यांना दर वर्षी 6000 रुपये मिळण्याची तरतूद असून ते पैसे शेतकर्यांच्या खात्यात जमा होतात.
2 हेक्टर पर्यन्त शेतजमीन धारक ह्या योजनेस पात्र असून , खलील वर्गात मोडणार्याु व्यक्तीना ही योजनेचा लाभ घेता येणार नाही
योजनेचा लाभ कुणाला घेता येईल
खलील पैकी आपल्या कुटुंबात कुणी असेल तर ह्या योजनेचे लाभ घेता येणार नाही.
- आजी/माजी संवैधानीक पदावर असणारे.
- मंत्री पदावर असलेले, भूषवलेले, केंद्रात किंवा राज्यात आमदार किंवा खासदार पदावर असलेले , तसेच महापौर किंवा झेडपी सदस्य वगरे॰
- सरकरी कर्मचारी वर्ग॰
- पेन्शन 10000 रूपये / महिना असल्यास , टॅक्स भरत असल्यास , वकील डॉक्टर एंजिनियर असल्यास.
काही महत्वाच्या बाबी –
- 2 हेक्टर पेक्षा जास्त शेतजमीन असल्यास ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- चुकीची माहिती देवून लाभ घेतल्यास लाभच्या राक्क्म वसूल केली जाते तसे कायद्यानुसार शासन दंड करू शकते.
- काही कारणास्तव जमीन मालकी हक्क बदल झाल्यास, नवीन शेतजमीन मालकस ह्या योजनेचा लाभ घेता येईल (2 हेक्टर जास्त नसल्यास ).
- आधार कार्ड नंबर असणे आवश्यक असून , नसल्यास आधार कार्ड करता नोंदणी केलेला नंबर असणे गरजेचे आहे.
आपल्याला रक्कम झाली किंवा नाही ह्याचा तपशील पाहण्याकरता क्लिक करा – https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx