प्रधानमंत्री स्वनिधी योजना २०२२ विषयी माहीती -PM Swanidhi Yojna
प्रधानमंत्री स्वनिधी योजना काय आहे?
प्रधानमंत्री स्वनिधी योजना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना आहे.ह्या योजनेअंतर्गत गरजु उद्योजकांस कर्ज दिले जाते अणि अर्थसाहाय्य प्रदान करण्यात येते.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना का सुरु करण्यात आली होती?
ही योजना कोरोनाच्या कालावधीत व्यवसाय ठप्प झालेल्या पथविक्रेत्यांना आर्थिक मदत करण्यासाठी म्हणजेच त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली होती.
ह्या योजनेच्या माध्यमातुन पथविक्रेत्यांना सुरूवातीस दहा ते बारा हजार पर्यतचे कर्ज देण्यात आले होते.
ह्या योजनेस मिळणारा जनतेचा भरघोस पाठिंबा बघुन आता ह्या योजनेअंतर्गत आपणास शासनाकडून २० हजार पर्यतचे कर्ज दिले जात आहे.
अणि जो पथविक्रेता घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करेल त्याला ५० हजारापर्यतचे कर्ज दिले जाणार आहे.ह्या योजनेसाठी अर्ज करायला देखील प्रारंभ झाला आहे.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची सुरूवात कधी करण्यात आली होती?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची सुरूवात नरेंद्र मोदी यांनी १ जुन २०२० रोजी केली होती.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ सर्व नोंदणीकृत पथविक्रेते म्हणजे रस्त्याच्या कडेस उभे राहुन फळ भाज्या वगैरे विकणारे दुकानदार घेऊ शकणार आहे.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनाअंतर्गत आपणास किती कर्ज दिले जाते?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनांतर्गत पथविक्रेत्यांना प्रारंभी दहा हजार रूपये कर्ज दिले जाते.ह्या कर्जाची मुदत एक वर्ष इतकी असते.
एक वर्षाच्या आत आपणास घेतलेल्या कर्जाची हपत्यांच्या स्वरूपात म्हणजे महिना टु महिना इन्स्टाँलमेंट मध्ये परतफेड देखील करावी लागते.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत २० हजाराचे कर्ज कोणाला दिले जाते?
जो पथविक्रेता आधी घेतलेल्या दहा हजार रूपये कर्जाची वेळेवर परतफेड करेल त्यालाच पुढे २० हजाराचे अजुन एक कर्ज दिले जाणार आहे.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत ५० हजाराचे कर्ज कोणाला दिले जाते?
जो पथविक्रेता त्याच्या आधी घेतलेल्या २० हजार रूपये कर्जाची वेळेवर परतफेड करेल त्यालाच पुढे ५० हजाराचे कर्ज प्राप्त करण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
योजनेचे प्रमुख लाभार्थी कोण असतील?
अणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या योजनेचे सर्वेक्षण केल्यानंतर ज्या पथविक्रेत्यांना ह्या योजनेतुन वगळले गेले होते.तसेच सर्वेक्षण करून झाल्यानंतर ज्या पथविक्रेत्यांनी विक्रीस आरंभ केला होता.अशा पथविक्रेत्यांना देखील ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
जे पथविक्रेते रेजिस्टर्ड आहेत ज्यांची नाव नोंदणी झालेली आहे तसेच ज्यांची शिफारस मनपा कडुन करण्यात आली आहे अशा पथविक्रेत्यांना ह्याचा मुख्यत्वे लाभ प्राप्त होईल.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत आपणास किती टक्के अनुदान प्राप्त होते?
प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत आपणास सात ते आठ टक्के व्याज अनुदान म्हणुन प्राप्त होते.पण तेव्हाच जेव्हा आपण घेतलेल्या कर्जाची दिलेल्या वेळेच्या आत परतफेड करू.
या योजनेत जो लाभार्थी कर्जाची नियमित परतफेड करेल त्याला प्रोत्साहन म्हणुन अजुन जास्त कर्ज दिले जाते.ह्या योजनेत प्राप्त केलेले कर्ज आपण डिजीटल पदधतीचा वापर करून परत फेडु शकतो.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे फायदे –
● डिजीटल ट्रान्झँक्शनला अधिक प्रोत्साहन प्राप्त व्हावे म्हणुन दरवर्षी 1 हजार दोनशे इतका कँशबँक देखील यात दिला जातो.
● कर्जाची रक्कम जर पथविक्रेत्याने डिजीटल पदधतीचा वापर करून वेळेवर फेडली तर त्याला व्याज आकारले जात नही.अणि डिजीटल ट्रान्झँक्शनचा वापर करून कर्ज फेडल्याने आपल्या क्रेडिट स्कोर मध्ये सुदधा वाढ होते.ज्याचा फायदा आपणास भविष्यात अजुन कर्ज प्राप्त करण्यासाठी होतो.
● ह्या योजनेच्या मार्फत 50 लाखापेक्षा जास्त पथविक्रेत्यांना कर्ज दिले जात आहे.
● फेरीवाले तसेच छोटे पथविक्रेते दुकानदार ह्या योजनेचा विशेष लाभ घेऊ शकणार आहे.
● कर्ज घेण्यासाठी कुठलीही हमी द्यावी लागत नही.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा साठी लागणारे महत्वाचे डाँक्युमेंटस कोणते आहेत?
● पथविक्रेता असल्याचे प्रमाण
● आधार कार्ड
● बँक खाते पासबुक
● वोटर आयडी कार्ड
● दोन पासपोर्ट साईज फोटो
● संपर्कासाठी मोबाइल नंबर
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा अणि कोठे करायचा?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी आपण आँनलाईन पदधतीने अर्ज करू शकतो.
● नोंदणीकृत पथविक्रेत्यांनी ह्या योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी योजनेच्या आँफिशिअल वेबसाइटला सर्वप्रथम व्हिझिट करायचे आहे.https://pmsvanidhi.mohua.gov.in/
● योजनेच्या आँफीशिअल साईटवर गेल्यावर आपण अँप्लायचे आँप्शन सिलेक्ट करायचे.आपण जर पहिल्यांदा कर्ज घेत असाल तर अँप्लाय फाँर 10 हजार हे आँप्शन निवडायचे.अणि दुसरयांदा ह्या योजनेतुन कर्ज घेत असाल तर 20 हजार हे आँप्शन निवडायचे.
● आपला मोबाइल नंबर इंटर करून आय अँम नाँट रोबोट वर टीक करायचे.अणि रिक्वेस्ट फाँर ओटीपी वर क्लीक करायचे.
● मग आपल्या मोबाइल वर एक ओटीपी येईल तो इंटर करून व्हेरीफाय आँप्शनवर क्लीक करायचे.
● यानंतर आपल्यासमोर योजनेचा फाँर्म येईल फाँर्ममध्ये विचारलेली सर्व माहीती व्यवस्थित भरून घ्यायची.पथविक्रेता प्रमाण तसेच इतर आवश्यक ती कागदपत्रे देखील अपलोड करायची.अणि सेव्ह करून शेवटी अर्ज सबमीट करायचा आहे.