SWOT- स्वॉट विश्लेषण – Swot Analysis Full Form In Marathi
स्वाँटचा फुलफाँर्म Strength,Weakness,Opportunities अणि Threats असा होत असतो.स्वॉट अँनँलिसेस म्हणजे काय?Swot Analysis Meaning In Marathi
स्वाँट अँनँलिसेस मध्ये स्ट्रेंथ म्हणजे बळ,शक्ती,सामर्थ्य भक्कमपणा.
विकनेस म्हणजे दुर्बलता,कमजोरी,दोष.आँपरच्युनिटी म्हणजे संधी.थ्रेट म्हणजे खतरा धोका अडथळा होय.
स्वाँट अँनँलिसेस म्हणजे एखाद्या कंपनीची ताकद,दुर्बलता,त्यात असलेली गुंतवणुकीची संधी अणि त्या कंपनीत गुंतवणुक करताना आपणास उदभवणारा धोका जाणुन घेण्यासाठी केलेले विश्लेषण होय.
स्वाँट अँनँलिसेस ही एक पदधत आहे.जिचा वापर करून आपण एखाद्या व्यक्तीचे,संस्था,कंपनीचे सामर्थ्य स्थळ तसेच कमजोरी जाणुन घेऊ शकतो.
त्या कंपनीत गुंतवणुक केल्यावर आपणास काय फायदा होईल तसेच काय धोका होऊ शकतो काय अडचण येऊ शकते हे ह्या पदधतीने जाणुन घेता येते.
स्वॉट अँनँलिसेस का केले जात असते?
जेव्हा आपण एखाद्या कंपनीत गुंतवणुक करत असतो तेव्हा त्या कंपनीत आपले पैसे गुंतवण्यापुर्वी आपण स्वाँट अँनँलिसेस करत असतो.
त्या कंपनीची स्ट्रेंथ काय आहे?त्या कंपनीचा विकनेस काय आहे?त्यात गुंतवणुकीची असलेली संधी.त्या कंपनीत गुंतवणुक केल्यावर उदभवणारा धोका हे सर्व जाणुन घेण्यासाठी गुंतवणुकदार स्वाँट अँनँलिसेस करीत असतात.
स्वॉटअँनँलिसेस कशासाठी अधिक महत्वाचे आहे?
स्वाँट अँनेलिसेस करणे स्टार्ट अप बिझनेस साठी तसेच गुंतवणुकीसाठी खुप महत्वाचे असते.
कारण जेव्हा आपण एखादा स्टार्ट अप बिझनेस सुरू करत असतो.तेव्हा त्या व्यवसायात गुंतवणुक करण्यात किती संधी आहे?किती फायदा आहे?त्यात गुंतवणुक केल्यावर कोणकोणत्या अडचणी अडथळे येऊ शकतात.कोणता धोका उदभवू शकतो.हे जाणुन घेणे आपल्यासाठी खुप महत्वाचे असते.
स्वाँट अँनँलिसेस केल्याने भविष्यात कुठली कंपनी फायद्यात राहील कुठल्या कंपनीत गुंतवणुक करण्याची आपणास संधी आहे.अणि कुठली कंपनी तोटयात जाऊ शकते.कुठे गुंतवणुक केल्यावर आपणास धोका उदभवेल कोणत्या कंपनीचा काय विकनेस आहे हे समजत असते.
म्हणजेच स्वाँट अँनँलिसेसचा वापर करून आपण कुठल्याही संस्था संघटना कंपनीच्या भविष्याचा अंदाज लावू शकतो.
स्वॉटअँनँलिसेसचा उपयोग –
- स्वाँट अँनँलिसेसचा उपयोग आपणास आपल्या उद्योग व्यवसायामधील प्रतिस्पर्धी व्यक्तींना जाणून घेण्यासाठी त्यांचे सामर्थ्य अणि कमजोरी जाणुन घेण्यासाठी करता येईल.
- म्हणजे आपणास जर आपल्या प्रतिस्पर्धी व्यापारी व्यवसायिकांचे सामर्थ्य अणि कमजोरी समजली तर आपण त्यानूसार आपल्या प्रोडक्ट सर्विसला आपल्या प्रतिस्पर्धी व्यक्तींपेक्षा अधिक चांगले बनवू शकतो.त्यात आवश्यक त्या सुधारणा घडवून आणु शकतो.
- कुठलाही बिझनेस सुरू करण्यापुर्वी मार्केटचा अभ्यास करण्यासाठी त्या बिझनेस मध्ये असलेली व्यवसायाची संधी करिअर संधी अणि आव्हाणे जाणुन घेण्यासाठी देखील आपण स्वाँट अँनँलिसेसचा वापर करू शकतो.
- जेव्हा एखादी व्यक्ती कंपनीत नोकरी मिळण्यासाठी इंटरव्यू देण्यासाठी जाते तेव्हा तिथे देखील त्या उमेदवाराची पात्रता तपासण्यासाठी मुलाखत घेणारा त्याला त्याचे सामर्थ्य अणि कमजोरी विचारत असतो.
- अणि नोकरदार व्यक्ती देखील कुठल्याही कंपनीत जाँबसाठी अँप्लाय करताना त्यात आपणास असलेली करिअरची संधी अणि करिअरमध्ये येणारया अडचणी त्यात असलेली आव्हाणे संधी बघत असतो मगच तो कुठल्याही कंपनीत जाँबसाठी अँप्लाय करत असतो.
- म्हणजेच जाँब इंटरव्यू मध्ये देखील स्वाँट अँनँलिसेसचा वापर केला जातो.हे यावरून सिदध होते.
- स्वाँट अँनँलिसेसचा हेतु –
कुठल्याही व्यवसाय तसेच गुंतवणुकीचे सविस्तर विश्लेषण करून त्यात भरघोस यश नफा प्राप्त करणे.
स्वॉटअँनँलिसेसचा फायदा –
● स्वाँट अँनँलिसेस केल्याने आपल्या उद्योग व्यवसायामधील कमजोरी कमकुवतता काय आहे?प्लस पाँईट कोणते मायनस पाँईट कोणते आहेत हे आपल्या लक्षात येते.
● आपल्या प्रतिस्पर्धी व्यापारी व्यवसयिकाला जाणुन घेण्यास मदत होते.त्याचे सामर्थ्य अणि कमजोरी आपल्या लक्षात येते.
● आपल्या व्यवसायातील विक्री वाढते.
● आपल्या व्यवसायात नफा वाढत जातो.
● आपल्या व्यवसायाला बळकटी येते.
● उद्योग व्यवसायात असलेल्या संधी अणि त्यात असलेली आव्हाणे लक्षात येतात.