PMFBY ची उद्दिष्टे–
- शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे.
- नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
- पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थीतीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
- कृषि पतपुरवठवात सातत्य राखणे.
PMFBY ची वैशिष्टये :-
- कर्जदार शेतक-यांना बंधनकारक, बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक.
- कुळांसाठी सुध्दा योजना लागू.
- विमा संरक्षित रक्कम पिकनिहाय निर्धारित केल्यानुसार॰
- विमा हप्ता खरीप हंगाम २.० %, नगदी पिकांसाठी ५.० %
- जोखीमस्तर :- ७० % देय.
- उंबरठा उत्पन्न मागील ७ वर्षातील सरासरी -(नैसर्गिक आपत्तीची २ वर्षे वगळून )
योजनेत (PMFBY) सहभागी शेतकरी :-
- अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित पिके घेणारे शेतकरी.
- कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी.
- कर्जदार शेतकरी यांना बंधनकारक.
- बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक.
अधिसुचित पीके :-
- अत्रधान्य पीके- भात, ज्वारी, बाजरी, नागली, मका, तुर, मुग,उडीद
- गळीतधान्य पीके- भुईमूग, सोयाबीन, सुर्यफूल, तीळ, कारळा.
- वार्षिक व्यापारी पिके – कापूस, कांदा.
विमा संरक्षणाच्या बाबी :-
उभे पिक (पेरणी ते काढणी पर्यंत) उत्पादनात येणारी घट
- नैसर्गिक आग, वीज कोसळणे
- गारपीट, चक्रीवादळ
- पूर, भु-स्खलन, दुष्काळ, पावसातील खंड
- किड व रोग इत्यादी
पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान
* अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी /लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी
* पेरणी /लावणी न झालेले क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ %पेक्षा जास्त असावे
हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई :-
पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी मुळे अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर
- अपेक्षित नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के नुकसानीची रक्कम आगाऊ देय्य॰
- दिलेली भरपाई अंतिम नुकसान भरपाईतून समायोजन करण्यात येईल.
- या करीता हवामान घटकांची आकडेवारी, उपग्रह छायाचित्र,बाधीत क्षेत्राचा अहवाल, पर्जन्याची आकडेवारी, इतर हवामान विषयक आकडेवारी, प्रसार माध्यमांचे अहवाल इत्यादीचा आधार घेऊन नुकसान ठरविणे.
काढणीपश्चात नुकसान :-
- चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास.
- वैयक्तीक पंचनामे यांच्या आधारे नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येईल.
- काढणी/कापणीनंतर जास्तीत जास्त ९४ दिवस नुकसान भरपाईस पात्र.
- वैयक्तीक नुकसान झाल्यास संबंधित वित्तीय संस्थेस ४८ तासाच्या आंत कळविणे आवश्यक
- अधिसुचित पिक , नुकसानीचे कारण व प्रमाण इत्यादी कळविणे.
- विमा कंपनी महसूल व कृषि यंत्रणांच्या मदतीने नुकसानीचे प्रमाण निश्चित.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती :-
- पूर,भु-स्खलन, गारपीट इत्यादी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास.
- वैयक्तीक पंचनामे करुन नुकसान निश्चिती.
- ४८ तासाच्या आंत वित्तीय संस्थेस कळविणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
- 7/12, आधार कार्ड,
- बँक पासबूक प्रत,
- पिकाची पेरणी बाबत स्वयंघोषना पत्र,
- भाडेपट्टा करार असल्यास करारनामा / सहमतिपत्र.
योजनेचा हप्ता कुठे भरावा-
- आपले सरकार सेवा केंद्र (csc), बँक,
- ऑनलाइन- https://pmfby.gov.in/farmerLogin या वेब साईट वर
विमा कंपनी -जिल्हा
अहमदनगर,नाशिक, जळगाव, सोलापुर,सातारा, चंद्रपुर | भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लि. |
परभणी, जालना, वर्धा, नागपुर, गोंदिया, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार | रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. |
नांदेड, ठाणे,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली | इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. |
औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे | एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लि. |
उस्मानाबाद | बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स क.लि. |
लातूर | भारतीय कृषी विमा कंपनी. |
अधिक माहिती साठी शासन नियम योजनेची सविस्तर माहिती – https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions