Direct Benefit Scheme मुख्य उद्देश्य
Direct Benefit Scheme मुख्य उद्देश्य हा लाभार्थी न मिळणारी मदत सरळ त्यांच्या खात्याता जमा व्हावी, भ्रष्टाचार कमी व्हावा असा आहे. आपण जर डीबीटी पोर्टल पाहिलं तर लक्षात येत की त्याचा विस्तार शेती व्यतिरिकत बर्याच योजनां करता झाला असून हा एक यशस्वी प्रयोग झाला आहे.
आज आपण फक्त शेतकर्यांन करता असणार्या योजनाबद्दल नहिती करून घेणार आहोत .
- आपले सरकार DBT -Direct Benefit Scheme हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, शेतकर्यांना, सामान्य नागरिकाना शासन प्रणीत योजनाच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी उभारलेले एक उत्तम माध्यम आहे.
- ह्या योजनेत शेतकरी आपल्या घरून किंवा कुठून ही कोणत्या वेळी कॉम्प्युटर वर आपले सरकार DBT भेटीच्या पोर्टल वर नोंदणी करून राज्य आणि केंद्र संस्कृत पुरस्कृत योजनेसाठी अर्ज करू शकतात॰
- शेतकरी त्यांनी केलेल्या अर्जाची सध्यस्थिती त्यांच्या आयडी वापरून कधी ही पाहू शकतात.
- सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी सातबारा, आठ प्रमाणपत्र, आधार कार्ड शी लिंक असलेल बँक पासबुक इत्यादी सोबत असणे फायदेशीर ठरते.
- आपण अर्ज प्रक्रिया चालू असताना आपल्याला मेसेज द्वारे किंवा ई-मेल द्वारे अलर्ट मिळत असतात की आपन केलेल्या अर्जा च काम कुठ पर्यन्त झालेल आहे॰
- नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यात थेट पैसे जमा होतात अश्या प्रकारे अर्ज मंजुरी ची प्रक्रिया अतिशय उपयोगी आणि फायदेशीर आहे.
आपले सरकार डीबीटी पोर्टल मध्ये -खलील योजनांचा समावेश
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
सारांश
पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते.
तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून ओळखले जाते) हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जाते. ते थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते.
तुषार सिंचन ही पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे. पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह , पाईप्स आणि स्पिंकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी,
औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.
अनुदान
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे असेल:
1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – ५५ %
2) इतर शेतकरी – ४५ %
पात्रता
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
- शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
- शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
- सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/home/index
वरील संकेत अर्ज करताना अडचणी आल्यास खालील लिंक वर माहिती पाहवी
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/PDF/Aaple_Sarkar_DBT_Portal_User_Manual_Marathi.pdf
Comments are closed.