२ एप्रिल रोजी घेण्यात येणार असलेली पोलिस भरती लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता?

२ एप्रिल रोजी घेण्यात येणार असलेली पोलिस भरती लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार

NoPolice bharti exam latest update in Marathi

2 एप्रिल २०२३ रोजी एसपी आॅफिसची जी पोलिस भरती परीक्षा घेतली जाणार आहे ती रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की महाराष्ट्र राज्याचे जे राज्य उच्च न्यायालय आहे तिथे २ एप्रिल रोजी घेण्यात येणार असलेली पोलिस भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.

ही परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्याचे कारण काय आहे?

२ एप्रिल २०२३ रोजी घेतली जात असलेली पोलिस भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात यावी कारण पोलिस भरती लेखी परीक्षेसाठी अनेक परीक्षार्थी उमेदवारांनी एकाच कॅटॅगरी मध्ये एका पेक्षा जास्त फाॅम भरले असल्याचे निदर्शनास आले आहे.

काही उमेदवारांनी एसपी आॅफिसमध्ये फाॅम भरताना अमरावती मध्ये फाॅम भरण्यासोबत पुणे येथे देखील फाॅम भरला आहे.

परीक्षेसाठी डबल फाॅम भरणारया अशा उमेदवारांचे फाॅम रदद करण्यात यावे कारण ह्या उमेदवारांनी एकाच कॅटॅगरी मध्ये दोन तीन ठिकाणी राऊंड दिले आहे त्यांना एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी परीक्षेला बसायला मिळाले आहे.

ज्यामुळे एका कॅटॅगरी मध्ये एकच फाॅम भरत असलेल्या इतर प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे असे ह्या याचिकेत सांगितले आहे.

म्हणुन पोलिस भरती लेखी परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी एकाच कॅटॅगरी मधून डबल फाॅम भरले आहेत त्यांना बाद करण्यात यावे अशी विनंती ह्या याचिकेत करण्यात आली आहे.

काय दिले आहे वर्तमानपत्रात?

वर्तमानपत्रात असे सांगितले आहे की पोलिस शिपाई पदासाठी कागदपत्रांची तपासणी झालेल्या तसेच मैदानी चाचणी मधील देखील पात्र ठरलेल्या उमेदवारांची २ एप्रिल २०२३ रोजी संपूर्ण राज्यात मुंबई शहर वगळता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

See also  रिक्रूटमेंट अणि सिलेक्शन मधील फरक - Difference between recruitment and selection in Marathi

या परीक्षेसाठी एका जिल्ह्यात एकच अर्ज करण्याची परवानगी दिली असताना देखील अनेक उमेदवारांनी नियम मोडला आहे त्यांनी एकाच कॅटॅगरी मध्ये अनेक जिल्ह्यांत अर्ज केले आहेत.यासाठी वेगवेगळे मोबाईल नंबर अणि ईमेल आयडीचा देखील वापर केला आहे.

विविध जिल्ह्यांत मैदानी चाचणी वेगवेगळ्या दिवशी असल्याने हे उमेदवार वेगवेगळ्या जिल्ह्यातील मैदानी चाचणी मध्ये सुद्धा सहभागी झाले.याचे परिणाम स्वरुप एकच उमेदवार अनेक जिल्ह्यांत लेखी परीक्षेसाठी पात्र ठरला आहे.

मात्र ह्या उमेदवाराला एकाच ठिकाणी लेखी परीक्षा देता येणार आहे.याचा फटका इतर उमेदवारांना बसला आहे ज्या उमेदवारांना एक ते दोन गुण कमी आहे असे विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले नाही.

त्यामुळे ही नियोजित लेखी परीक्षा रद्द करण्यात यावी किंवा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी असलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.