पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजना – GRAM SURAKSHA YOJANA
मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला आपली आर्थिक सुरक्षा हवी असते.ज्यासाठी आपण सेव्हिंग अणि गुंतवणुकीवर विशेष भर देत असतो.
अणि आज मार्केटमध्ये अशा अनेक गुंतवणुकीच्या स्कीम आलेल्या आहेत ज्यातुन हाय रिटर्न मिळण्याची शक्यता असते.पण गुंतवणुक म्हटली तर रिस्क ही आपणास घ्यावीच लागत असते.पण आपण सर्वसामान्य व्यक्ती रिस्क घ्यायला खुप घाबरत असतो.
अशावेळी आपण मार्केटमधील जोखिम असलेल्या ठिकाणी पैसे न गुंतवता अशा ठिकाणी पैसे गुंतवण्याचा विचार करत असतो जिथे पैसे गुंतवल्यावर आपले पैसे चांगल्या परताव्यासोबत रिटर्न मिळण्याची गँरंटी असते.अणि इथे कुठली पैसे बुडण्याची वगैरे रिस्क देखील नसते.
म्हणजे आपण जास्तीत जास्त पोस्ट आँफिसच्या,बँकेच्या एल आयसीच्या विविध स्कीममध्ये आपले पैसे गुंतवत असतो जसे की एफडी,आरडी,एल आयसी इत्यादी.कारण ह्या स्कीम मार्केट मधील रिस्क पासुन विभक्त असतात.आज आपण पोस्टाच्या एका अशा स्कीम विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
जिथे फार कमी गुंतवणुक करून देखील आपणास चांगले रिटर्न मिळु शकतात.ह्या स्कीमचे नाव आहे ग्राम सुरक्षा योजना.
पोस्टल ग्राम सुरक्षा योजना काय आहे?
पोस्टल ग्राम सुरक्षा योजना ही पोस्टाच्या ग्रामीण पोस्टल विमा योजनेअंतर्गत चालवली जात असलेली एक महत्वाची स्कीम आहे.
कुठलाही ग्रामीण भागात राहत असलेला सर्वसामान्य गरीब व्यक्ती देखील यात गुंतवणुक करून चांगले रिटर्न प्राप्त करू शकतो.
इथे आपणास दररोज फक्त 50 रूपये गुंतवायचे आहे म्हणजेच महिन्याला 1500 रूपये गुंतवुन आपणास मंँच्युरीटीवर 35 लाखापर्यतचा निधी,परतावा प्राप्त करता येणार आहे.
पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजना मध्ये किती वयोमर्यादेपर्यत गुंतवणुक करता येते?
पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजना मध्ये आपण 19 वयापासुन गुंतवणुकीस प्रारंभ करू शकतो अणि यात आपणास आपले वय 55 होईपर्यत गुंतवणुक करता येते.
पोस्टल ग्राम सुरक्षा योजना मध्ये कोणास गुंतवणुक करता येईल?
पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजना मध्ये भारतातील अशी प्रत्येक व्यक्ती गुंतवणुक करू शकते जिचे वय 19 ते 55 च्या दरम्यान आहे.
पोस्टल ग्राम सुरक्षा योजनेचे फायदे –
● पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजना अंतर्गत आपणास कर्ज देखील प्राप्त होत असते.फक्त ही सुविधा आपणास चार ते पाच वर्षे ह्या योजनेत गुंतवणुक केल्यानंतर दिली जात असते.
● यात आपण आपल्याला पाहिजे तो पाहीजे तसा प्रिमियम सिलेक्ट करू शकतो.इथे आपणास प्रिमियम भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जातात.
उदा, वार्षिक,मासिक,तीन महिन्याचा म्हणजे त्रैमासिक,सहा महिन्यांचा यात प्रिमियम भरायला आपल्याला तीस दिवसांचा वाढीव कालावधी देखील दिला जात असतो.
● यात गुंतवणुकदारांना आपली पाँलिसी तीन वर्ष झाल्यानंतर आपल्या मर्जीनुसार सरेंडर करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.फक्त यात एक अट आहे पाँलिसी घेतल्या घेतल्या पाच वर्षाच्या आत जर आपण ती सरेंडर केली तर आपणास बोनसचा लाभ दिला जात नसतो.
● पोस्टल ग्राम सुरक्षा योजना मध्ये आपणास किमान दहा हजार अणि कमाल दहा लाख इतकी विम्याची रक्कम दिली जात असते.
● ह्या योजनेअंतर्गत गूंतवणुक करणारया व्यक्तीचा समजा पाँलिसीची मुदत संपण्याआधी मृत्यु झाला तर त्याच्या कुटुंबाला किंवा त्याने लावलेल्या त्याच्या वारसदाराला डेथ बेनिफिट मिळत असतो.एवढेच नव्हे तर त्या नाँमिनीला त्या पाँलिसीवर क्लेम देखील दाखल करता येतो.पाँलिसीचा बोनस अणि इतर ठेव रक्कम सुदधा त्याला प्राप्त करता येत असते.
● यात आपण म्हणजे सर्वसामान्य ग्रामीण भागात राहत असलेले गरीब नोकरदार व्यक्ती देखील कमी गुंतवणुक करून चांगले रिटर्न प्राप्त करू शकतो.
● ह्या योजनेत गुंतवणुकदारांना कमी रिस्कसोबत चांगले रिटर्न मिळत असतात.
● यात बाजारातील चढ उताराची भीती नसते.
पोस्टल ग्राम सुरक्षा योजना विषयी लक्षात घ्यायचे काही महत्वपूर्ण मुददे –
● समजा 19 वय असलेल्या व्यक्तीने ह्या योजनेत 10 लाख रूपये इतक्या विम्याच्या रक्कमेसोबत गुंतवणुक सुरु केली तर 55 वय झाल्यानंतर 31.60 लाख प्राप्त करण्यासाठी त्याला दरमहा 1515 रूपयांची गुंतवणुक करावी लागु शकते.
● वयाच्या 58 व्या वर्षी 33.40 लाख मिळवायला त्यास दरमहा 1463 रूपयांची गुंतवणक करावी लागते.
● अणि वयोवर्ष साठ झाल्यावर 34.60 लाख मिळवायला आपणास दरमहिन्याला 1411 रूपये गुंतवावे लागू शकतात.