मुदतपूर्व मुदत ठेव काढण्याचे शुल्क अणि त्याचे नियम – Premature fixed deposit withdrawal charges and rule in Marathi
जेव्हा आपल्या कमावलेल्या कष्टाच्या पैशांची गुंतवणूक तसेच बचत करण्यासाठी आपण सर्वसामान्य नोकरदार व्यक्ती पर्याय शोधत असतो.
तेव्हा सर्वात पहिला अणि उत्तम असा गुंतवणूक करण्याचा पर्याय आपणास बॅक एफडी हाच दिसत असतो.आज देखील कित्येक लोक बॅक एफडी म्हणजे फिक्स डिपाॅझिट मध्ये आपले पैसे गुंतवणे अधिक पसंद करत असतात.
जेव्हा आपण आपल्या पैशांची बॅके मध्ये एफडी करायला जात असतो.तेव्हा आपणास आपल्या पैशांची गुंतवणूक किती कालावधी करीता करायची आहे तो कालावधी म्हणजेच पिरीअड निवडावा लागत असतो.
म्हणजेच आपण जो गुंतवणक पिरीअड निवडतो तेवढ्या कालावधी करीता आपले गुंतवणूक केलेले पैसे बॅकेमध्ये लाॅक होऊन जात असतात.ते आपल्याला निवडलेला पिरीअड संपेपर्यंत अजिबात काढता येत नसतात.
अणि मग हेच पैसे मॅच्योरीटी नंतर आपल्याला त्याच्या एका निश्चित इंटरेस्ट रिटर्नसोबत बॅकेकडुन दिले जात असतात.
पण काही वेळेला अचानक एखादी घरगुती फायनान्शिअल एमरजन्सी येते अणि ती अडचण दुर करण्यासाठी आपल्याला आपले बॅकेतील ठेवलेले एफडीचे पैसे एफडी मॅच्योरीटी होण्या अगोदर मध्येच एफडी मोडावी लागत असते अणि काढावे लागत असतात.ज्याला मुदतपूर्व एफडी काढणे premature fd withdrawal असे म्हटले जाते.
पण ठरलेल्या कालावधीच्या अगोदर आपण एफडीची रक्कम काढत असतो म्हणून आपणास गुंतवणूक केलेल्या एफ डी रक्कम मधुन आतापर्यंत जे काही व्याज मिळणार असते त्यातील किमान १ टक्के व्याजाची रक्कम दंड म्हणून बॅकेला द्यावी लागत असते.
प्रत्येक बॅक मुदतीपूर्वी काढलेल्या व्याजाच्या रक्कमेवर काही विशिष्ट दंड शुल्क आकारत असते.
म्हणजे समजा आपण एक लाखाची एफडी पाच वर्षे इतक्या कालावधीकरीता केली आहे.
अणि ह्या पाच वर्षांसाठी केल्या जात असलेल्या एफडीच्या रक्कमेच्या गुंतवणुकीवर आपणास व्याज ७ टक्के इतके दिले जाणार आहे.
पण अचानक आपण ही एफडी मध्येच मोडली तर आपणास एक वर्षाचे फक्त सहा टक्के इतकेच व्याज दिले जात असते.अणि एक टक्का व्याजाची रक्कम ही बॅक पेनल्टी म्हणुन काढुन घेत असते.
अणि समजा आपल्याला भरावा लागत असलेला पेनल्टी चार्ज एक टक्का इतका आहे.अणि आपण आपली एफडी एका वर्षानंतर मोडली ज्यावर आपणास ६ टक्के व्याज दिले जाणार आहे तर अशा वेळी आपणास पेनल्टीचा एक टक्का कपात करून ५ टक्के व्याजाची रक्कम दिली जात असते.
आपणास आम्ही दिलेली ही माहिती आवडली तर आपल्या मित्र मैत्रिणी सहकारी यांच्यासोबत तसेच ही माहिती जास्तीत जास्त व्हाटस अप गृपवर सुद्धा नक्की शेअर करा