श्री संत तुकाराम महाराज अभंग – काय ते वानावे वाचेचे पालवे ! Sant Tukaram Maharaj Abhang

श्री संत तुकाराम महाराज अभंग -Sant Tukaram Maharaj Abhang

“संत तुकारामांचा जीवनविचार’ हे प्रा. डॉ.निर्मलकुमार फडकुले लिखित पुस्तक १९९९ साली “सुविद्या प्रकाशन’ यांनी प्रकाशित केले. त्या पुस्तकाचे सर्वाधिकार लेखकाचे चिरंजीव व वारस श्री अजित फडकुले यांच्याकडे आहेत.

थोडेसे मनातले …..

तुकयाची अभगंवाणी हे महाराष्ट्राचं अमूल्य असं वैचारिक घन आहे. सामान्यापासून विद्वानापर्यंत तुकारामांचे अभंग सर्वांनाच आकृष्ट करु न घेतात. लोकमानसात इतका दृढपणे रुजलेला दुसरा संतकवी नाही असं म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही. तुकारामांच्या प्रत्येक अभंगात त्यांचा जीवनविषवक विचार प्रकट झाला आहे. प्रत्येक अभंगात त्यांचं व्यक्तित्व स्पष्टपणानं उमटलं आहे.

 ‘तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपुल्यासी ।’ स्वसंवाद करणारे तुकोबा

समाजाशीही सतत बोलत होते. लोकजीवन त्यांनी न्याहाळलं. भलेबुरे अनुभव घेतले. आपल्या अनुभवांची कहाणी त्यांनी अभंगांतून सांगितली आहे. ही कहाणी सांगतानाच हा तुकोबा नावाचा मेघ जनतेच्या मनोभूमीवर आपल्या विचाररूपी अमृतधारांची बरसात करीत राहिला. तुकोबा केवळ संत आणि केवळ कवी नव्हते.

ते जीवनाचा सूक्ष्म दृष्टीनं शोध घेणारे तत्वचिंतक होते. म्हणूनच त्यांनी आपल्या कवितांतून जीवनविचार उत्कटतेनं मांडला आहे. या समाजनिष्ठ संतकवीचं त्याच्या अभंगांतून जे दर्शन होतं. ते जितकं प्रसत्ञ तितकंच उद्बोधक आणि प्रेरक असतं.या पुस्तकात डॉ.निर्मलकुमार फडकुले  ह्यांनी तुकोबांचे सुमारे ७८ अभंग निवडून त्यावर त्यांच्या दृष्टिकोनातून भाष्य केलं आहे. आधारासाठी अभंग घेऊन त्यातील जीवनविचार विवरून सांगताना त्यांच्या कल्पना आणि विचार या भाष्यांत मिसळलेले आहेत.

  • सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ॥
  • घरी घरी आठवण । मानी संतांचे वखन ।॥
  • ।नेले रात्रीने ते अर्थे । बाळपण ते जराव्वाथे ॥
  • तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ।।

संत म्हणजे केवळ देवाचे भजन करणारा एक भक्त असतो अशी कल्पना करणं चुकीचं आहे. संतांच्या हृदयात ईश्वरभक्ती असतेच. पण जीवनाची चिकित्सा करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. हे जग काय आहे, या जीवनाचा नेमका अर्थ काय असू शकेल इत्यादी गूढ प्रश्नांची ते आपल्या अनुभवाच्या संदर्भात साधक बाधक चर्चा करतात.

संत तुकारामांनी जीवनविषयक प्रश्नांची खोल चर्चा आपल्या अभंगांतून केली आहे. ते जीवनाचे आणि समाजाचे अभ्यासक होते.

या तत्त्वचिंतक संतानं आपल्या अनुभवांचं सार स्पष्टपणानं मांडलं आहे. तुकोबांच्या डोळ्यांदेखत त्यांची पहिली पत्नी आणि मूल दुष्काळात मरण पावले. वडील भाऊ परागंदा झाला. आईवडिलांचा वियोग झाला होता.

See also  Entrepreneurship म्हणजे काय?  Entrepreneur Meaning In Marathi

एकेकाळी चांगली चालणारी दुकानदारी दुष्काळामुळं उध्वस्त झाली होती. गावातली माणसं उपासमारीनं गांजून गेली होती.

त्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आणि मरण्यालाही अर्थ नव्हता. सब्त तुकाराम उघड्या डोळ्यांनी मानवी दु:खदैऱ्याचं हे विचित्र स्वरूप पाहात होते. त्यांना स्वतःलाही आयुष्याबरोबर सतत झगडावं लागलं. त्यात त्यांना अनेक जखमा झाल्या.

माणसाच्या आयुष्यातली ही प्रचंड उलथापालथ पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या अभंगांतून एक निष्कर्ष काढला. या जगात सुख जवाइतकं थोडं आहे. दु:ख मात्र पर्वतासारखं प्रचंड आहे. यासाठी संतांचं वचन मान्य करून ते

नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे असं ते म्हणतात. तुकोबा काही निराशावादी नव्हते. पण जवाइतकं सुख असतं आणि पर्वंतप्राय दु:ख असतं.

  • जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । खालविसी हाती धरूनिया ॥
  • खालो वाटे आम्ही तुझाचि आधार । खालविसी भार सवे माझा ॥।
  • जोळे जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ॥
  • अवघे जन मज झाले लोकपाळ । सोडेरे सकळ प्राणसखे ॥
  • तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाळे तुज सुख अंतर्बाही ॥

आपल्याला या जीवनात सर्वस्वी आधार जर कोणाचा असेल तर तो केवळ परपेश्रराचा आहे. आपल्या भक्ताची चिंता तोच वाहातो. जिथं जावं तिथं तोच संगतीला असतो. जे जे आपण करतो ते सारं कार्य पार पाडण्यासाठी तो साहाय्यभूत होतो.

संत तुकोबांचा देवाच्या ठायी असा अभंग विश्वास आहे. आपल्या साऱ्या जीविताचं नियमन देवच करीत असतो ही तुकोबांची भूमिका आहे नव्हे तो त्यांचा अनुभव आहे. आपल्या प्रत्येक श्वास नि:धासाच्या मागे ईश्वर आहे. ईश्वर केवळ आपल्या बाह्य जीवनाचं नव्हे तर आपल्या आंतरिक जीविताचं, आपल्या शक्तीचं, बुध्दीचं, सुखदु:खाचं नियमन आणि नियंत्रण करीत आहे.

ही भक्ताची भावना असते. भक्तीचं हे उदात्त आणि उत्कट रूप आहे. आपण जावं तिकडं आपल्या साथीला परमेश्वर आहे ही जाणीव असल्यावर माणसाच्या हातून अनैतिक किंवा अभद्र असं काही घडणंच शक्य नाही. भक्त जणूदेवाच्या दृष्टीने पाहातो. प्रत्येक पाऊल टाकताऱा देव भक्ताचा हात धरून त्याला वात्सल्यानं

चालवतो.

कृपया पूर्ण पुस्तक  वाचण्या करता इथ भेट द्यावी

“संत तुकारामांचा जीवनविचार' हे प्रा. डॉ.निर्मलकुमार फडकुले लिखित पुस्तक १९९९ साली “सुविद्या प्रकाशन' यांनी प्रकाशित केले. त्या पुस्तकाचे सर्वाधिकार लेखकाचे चिरंजीव व वारस श्री अजित फडकुले यांच्याकडे आहेत. थोडेसे मनातले ..... तुकयाची अभगंवाणी हे महाराष्ट्राचं अमूल्य असं वैचारिक घन आहे. सामान्यापासून विद्वानापर्यंत तुकारामांचे अभंग सर्वांनाच आकृष्ट करु न घेतात. लोकमानसात इतका दृढपणे रुजलेला दुसरा संतकवी नाही असं म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही. तुकारामांच्या प्रत्येक अभंगात त्यांचा जीवनविषवक विचार प्रकट झाला आहे. प्रत्येक अभंगात त्यांचं व्यक्तित्व स्पष्टपणानं उमटलं आहे. 'तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपुल्यासी ।' स्वसंवाद करणारे तुकोबा समाजाशीही सतत बोलत होते. लोकजीवन त्यांनी न्याहाळलं. भलेबुरे अनुभव घेतले. आपल्या अनुभवांची कहाणी त्यांनी अभंगांतून सांगितली आहे. ही कहाणी सांगतानाच हा तुकोबा नावाचा मेघ जनतेच्या मनोभूमीवर आपल्या विचाररूपी अमृतधारांची बरसात करीत राहिला. तुकोबा केवळ संत आणि केवळ कवी नव्हते. ते जीवनाचा सूक्ष्म दृष्टीनं शोध घेणारे तत्वचिंतक होते. म्हणूनच त्यांनी आपल्या कवितांतून जीवनविचार उत्कटतेनं मांडला आहे. या समाजनिष्ठ संतकवीचं त्याच्या अभंगांतून जे दर्शन होतं. ते जितकं प्रसत्ञ तितकंच उद्बोधक आणि प्रेरक असतं.या पुस्तकात डॉ.निर्मलकुमार फडकुले ह्यांनी तुकोबांचे सुमारे ७८ अभंग निवडून त्यावर त्यांच्या दृष्टिकोनातून भाष्य केलं आहे. आधारासाठी अभंग घेऊन त्यातील जीवनविचार विवरून सांगताना त्यांच्या कल्पना आणि विचार या भाष्यांत मिसळलेले आहेत. सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ॥ घरी घरी आठवण । मानी संतांचे वखन ।॥। नेले रात्रीने ते अर्थे । बाळपण ते जराव्वाथे ॥ तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ।। संत म्हणजे केवळ देवाचे भजन करणारा एक भक्त असतो अशी कल्पना करणं चुकीचं आहे. संतांच्या हृदयात ईश्वरभक्ती असतेच. पण जीवनाची चिकित्सा करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. हे जग काय आहे, या जीवनाचा नेमका अर्थ काय असू शकेल इत्यादी गूढ प्रश्नांची ते आपल्या अनुभवाच्या संदर्भात साधक बाधक चर्चा करतात. संत तुकारामांनी जीवनविषयक प्रश्नांची खोल चर्चा आपल्या अभंगांतून केली आहे. ते जीवनाचे आणि समाजाचे अभ्यासक होते. या तत्त्वचिंतक संतानं आपल्या अनुभवांचं सार स्पष्टपणानं मांडलं आहे. तुकोबांच्या डोळ्यांदेखत त्यांची पहिली पत्नी आणि मूल दुष्काळात मरण पावले. वडील भाऊ परागंदा झाला. आईवडिलांचा वियोग झाला होता. एकेकाळी चांगली चालणारी दुकानदारी दुष्काळामुळं उध्वस्त झाली होती. गावातली माणसं उपासमारीनं गांजून गेली होती. त्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आणि मरण्यालाही अर्थ नव्हता. सब्त तुकाराम उघड्या डोळ्यांनी मानवी दु:खदैऱ्याचं हे विचित्र स्वरूप पाहात होते. त्यांना स्वतःलाही आयुष्याबरोबर सतत झगडावं लागलं. त्यात त्यांना अनेक जखमा झाल्या. माणसाच्या आयुष्यातली ही प्रचंड उलथापालथ पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या अभंगांतून एक निष्कर्ष काढला. या जगात सुख जवाइतकं थोडं आहे. दु:ख मात्र पर्वतासारखं प्रचंड आहे. यासाठी संतांचं वचन मान्य करून ते नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे असं ते म्हणतात. तुकोबा काही निराशावादी नव्हते. पण जवाइतकं सुख असतं आणि पर्वंतप्राय दु:ख असतं. कृपया पूर्ण पुस्तक वाचण्या करता इथ भेट द्यावी

श्री संत तुकाराम महाराज सुविचार Sant Tukaram Maharaj Abhang

  1. जो साधक कायेने वाचेने मनाने विष्णुभक्त झाला आहे त्यास इतर काम-क्रोध विचाराची बाधा होत नाही.धन्याच्या विश्वासाला पात्र झालेल्यासेवकाची मालकावर सत्ता गाजविण्याची स्थिती असते.धन्याचे ऐश्वर्य भोगणारा होतो.संत भेटीत पापे पळून जातात,संसार दुःख दूर होते.

 

  1. काही ज्ञानी,पंडीत मनात एक भाव ठेवतात व कृती दुसरी करतात त्यांना मी मानत नाही.मनात शुध्द भाव नाही तर प्रतिमा पूजन करून काय उपयोग मनात विषयाचा जप चालला तेथे गळ्यातील माळा काय करतील?भाव नसताना सेवा करुन काय उपयोग, देव हा भाव आणि श्रध्देचा विषय आहे.श्री रामाच्याउपाधीमुळे दगड पाण्यावर तरले.सर्व आवे तुझ्या चरणी मस्तक ठेवणे हीच माझी सेवा आहे.
See also  नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार किती? Definition And Types Of Nouns In Marathi

 

  1. देवा आम्हाला उपदेश देऊन (गीता-वेद) आमच्या सन्मार्गास लावावे.जिवात्म्याची परमार्थाची भेट झाल्यास जीव परत संसाराकडे जात नाही.प्रेम असेल तर आकाशालाही मिठी मारता येते.आपल्या मनास आपले पाप माहीत असते.दहा जणात एकाला चांगले म्हणले की उरलेल्यांची निंदा सहज होते.सहज पाप घडते दिवसांतील आठ प्रहर नाम जपा.संताचे संगतीत प्रेमसुखाचा सुकाळ आहे.

 

  1. डोळ्यांनी पहावे, कानाने ऐकावे.सुख दु:खाचे आव कळत असतात.ईश्ववराने एकाच देहाच्या ठायी भिन्न इंद्रियांना भिन्न ज्ञान होण्याची क्षमता ठेवली आहे व तो स्वत: सर्वाचे सूत्र हातात धरुन देहाचा पुतळा व्यवहारामध्ये नाचवत राहतो.जीव मुद्दाम द्यावयाला नको.वेळ आल्यावर तो जाणारच आहे.समजून घ्या देवापाशी मरण मागतो तो गाढव,चांडाळ आहे तूच माझा आकार आणि मी म्हणतो तो आत्माही तूच आहेस.तू आणि मी एकच आहोत.

 

  1. देवा ज्यामुळे तुमची अपकीर्ती होइल असे वर्तन मी प्राण गेला तरी करणार नाही.परस्त्री मला मातेसमान व परधन मला ओकलेल्या अन्नासमान तिरस्करणीय आहे.विठ्ठलाचे नाम वेळोवेळी घेतले असता शरीरातील नाडया शांत होऊन विषय नाहीसे होतात जो कोणी अधर्माने वागत असेल त्याला विरोध करावा.

 

  1. आडमार्गीने जाणाऱ्या आंधळ्यास योग्य मार्गी आणावे चोरी करण्यास निघालेल्या चोरास अनुकूल चंद्रबल सांगू नये.

 

  1. सर्वज्ञानी पणाच्या कल ‘मी पणाचा अभिमान तोडून टाका.आकाशापेक्षा व्यापक आणि अणूचा गाभा होऊन तू सर्वत्र भरुन रहावे.सर्वाच्या पोटात विष असते त्याच्या धाकाने लोक त्याला भितात तसे पाहिले तर सर्वजीवाची शरीरे पंचमहाभूताची बनलेली आहेत.त्यात भिन्नता नाही.परंतु उत्तम गुणांनी सुख,वाईट गुणानी दुःख होते.चंदनाचा सुवास सर्वांना आवडतो.सर्वत्र देवआहे असे आपण म्हणतो.एकास नमस्कार आणि दुसऱ्याची निंदा करतो.ज्या पुरुषाचे चित्त स्वाधीन नाही सर्व कांही व्यर्थ जाते.

 

  1. कृपासागर विठ्ठलाने पुंडलिकास वर दिला आहे.जे पंढरीची वारी करणारे मुक्त होतील.अमृताच्या वेलीला अमृताचीच फळे लागावयाची.आणि पुढे सुध्दा अमृताच्या बीजाचीच वाढ व्हावयाची हे निश्चित.उत्तम रसाचे सेवन केल्याने घसा थंड होतो,आणि शरीरकांती पुष्ट व तेजोमय होते.चंदनाचे सहवासाने सामान्य वृक्षालाही चंदनाचा वास लागतो.संताच्या संगतीने मनुष्य संतवृत्तीचा होतो.

 

  1. कीर्तन करावे तेथे अन्नग्रहण करु नये.कीर्तनासाठी जे द्रव्य घेतात आणि जे देतात ते दोघेही नरकात जातात. रावणाची सोन्याची लंका होती तो मेला तेव्हा त्याच्याबरोबर एक कवडीसुध्दा गेली नाही.संत रागवले तरी ते संतच राहणार शब्दप्रहाराने संत दुर्जनाला शिक्षा करतात.दुष्टाचा दुष्टभाव नष्ट व्हावा अशी विधायक दुष्टी असते.
See also  दारिद्रय म्हणजे काय? -Meaning of Poverty , Concept Definition And Cause Of Poverty

 

  1. देवा तुमच्या निर्गुणाच्या मार्गाकडे आम्ही अजिबात येणार नाही.कारण तेथे ब्रम्हजञानाच्या खोट्या आभिमानाचा ताबा आहे.अहंकार जो ‘मी’ तू पणाचा भेदभाव निर्माण करतो तो नष्ट करा.हा अभिमान आत्महत्येचे पाप घडवितो.तो आप्राप्तीची (संत, देव) भेट होऊ देत नाही.ज्याचे पूर्वकर्म वाईट असते ते त्याला दीन करते.भूमात्रावर दया करणे हाच खरा धर्म आहे. याविषयी संत प्रमाण आहेत.

 

  1. मी कोणाकडे मंत्राची वंचना केली नाही पांडुरंग जीवाशी धरुन ठेवला व सर्वाना सांगितला निष्ठेने विठ़लचरणी चित्त ठेवले आणि निरंतर त्याच्या समचरणाचे चिंतन केले.पांडुरंगाचे चरणी बळकट भाव, विश्वास ठेवला त्यामुळे प्रपंचातून पार पडलो.माणसाला आत्मज्ञान होणे सोपे आहे.एकाग्रमनी श्रवणदायी साधने करण्यास स्वाधीन नसल्याने ते अवघड झाले आहे.प्रतिबिंब अस्सल समजु नका.दोरीचे ज्ञान झाले नाही तोपर्यंत सापाचे भय असते.परमात्म अजानामुळे जग खरे वाटते.साक्षात्कारानंतर सत्य कळते.

 

  1. जी गोष्ट अंत:करणात असते,व चित्त मनाशी साहारूय झाले म्हणजे पोटांत असलेले ओठांच्या द्वारे बाहेर पडते गर्भाची भूक गर्भवती स्त्रीच्या खाण्या-पिण्यावरुन कळते.कुृत्र्याच्या भूंकण्याकडे हत्ती लक्ष्य देत नाही.मस्त माकड सिंहाची चेष्टा करते त्यात मरण ओढवून घेण्यासारखे आहे.दुष्ट साधू संताला
  2. पीडा देतात त्यामुळेच त्याचेवर वाईट प्रसंग येतात.

 

  1. भगवंताच्या नामामुळे ब्रम्हनंदाच्याही वर आनंदाचे भरते आले आहे.सर्व लोकांना वैकुठांत जाण्याची सुखरुप वाट सांपडली आहे द्रव्याने, कुळाने,पारमार्थिक सत्तेने सर्व बाबतीत वैष्णव श्रेष्ठ असतात.ज्या पदरी लक्ष्मी नारायण आहे.विष्णुभक्ताचे कोणतेही वागणे,बोलणे गोड असते व हरिकृपेमुळे त्याची कोणतीही इच्छा पूर्ण होते.जसा पावसाचा वर्षाव योग्य अयोग्य जागा न पाहतो होतो.त्याप्रमाणे मी सर्वांना उपदेश करीत आहे. ज्याची जशी श्रध्दा असेल तशी फलप्राप्ती होईल.

 

  1. संताच्या संगतीत सर्वकाळ राहू नये,कारण पूर्वसंस्कारामुळे त्याच्या ठिकाणी एखादा दोष असण्याची शक्यता असते व तो दोष साधकाला जडण्याची शक्यता असते.त्या दोषाचा क्षय होतो. संताना दुरुन नमस्कारा करावा व त्याचे गुण फक्त अंतरी साठवावेत.संत ज्ञानभक्तीचे जेवण करीत असतील तेथे याचक म्हणून जावे ते हरिनामाने पोटभर जेवले असतील तर त्या उच्छिटानेच आपली पोटे भरतील.

 

  1. देवा या संसार जंगलात सर्व दिशा ओसाड वाटतात. मला कोणी जिवलग देवभक्त भेटत नाही.काम क्रोधरुपी हिंस्त्र श्वापदांचे कळप पाहून अय वाटते धीर थरवत नाही,अज्ञानाचा अंधार असल्याने वाटा दिसत नाही या
  2. जंगलात अनेक मताच्या अनेक वाटा आहेत.योग्य मार्ग समजत नाही.सद्गुरुनी मला ‘रामकृष्ण हरी’ या नामभक्ती ची वाट दाखविली परंतु पांडुरंग अद्याप दूरच सारे

 

श्री संत तुकाराम महाराजांचे भक्ति सुविचार – Sant Tukaram quotes in Marathi

 

 


Downloadश्री संत तुकाराम महाराज अभंग Sant Tukaram Maharaj Abhang