सर्व काही आता महिलांसाठी एसटी प्रवासात सर्व महिलांना मिळणार ५० टक्के इतकी सुट – Sarv Kahi mahilansathi Maharashtra Budget 2023

सर्व काही आता महिलांसाठी एसटी प्रवासात सर्व महिलांना मिळणार ५० टक्के इतकी सुट

महिलांसाठी एसटी प्रवासात सर्व महिलांना मिळणार ५० टक्के इतकी सुट

९ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या आपल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काही विशेष घोषणा केल्या आहेत.

ह्या जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतले आहे.

ज्यात शासनाकडून पहिला निर्णय असा घेण्यात आला आहे की आता सर्व महिला उमेदवारांना एसटी प्रवासामध्ये आता सरसकट ५० टक्के इतकी सुट दिली जाणार आहे.

सर्व काही आता महिलांसाठी एसटी प्रवासात सर्व महिलांना मिळणार ५० टक्के इतकी सुट
  1. महिला सक्षमीकरण करण्यासाठी चौथे सर्वसमावेशक महिला धोरण देखील जाहीर केले जाणार आहे.
  2. महिला बचत गटाच्या माध्यमातून लातुर जिल्ह्या मध्ये बांबु क्लस्टर,कोल्हापूर जिल्हा मध्ये कोल्हापूरी चप्पल क्लस्टर अधिक विकसित करण्यात येणार आहे.
  3. मुंबई मध्ये महिला वर्गासाठी महिला युनिटी माॅलची स्थापणा करण्यात येणार आहे अणि यात बचत गटाला देखील जागा दिली जाणार आहे.
  4. अणि महिला सुरक्षा सुविधा जनक प्रवासाकरीता महिला केंद्रीत पर्यटन धोरणाची आखणी देखील केली जाणार आहे.
  5. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियाना द्वारे चार कोटी महिला तसेच मुलींचा मोफत औषधोपचार अणि मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
  6. मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर बनविण्यासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली जात आहे.हया योजनेअंतर्गत मुलींना ९८ हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाणार आहे.
  7. महिला खरेदी दाराला निवासी घटकाच्या खरेदीत मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्के इतकी सुट देण्यात आली आहे.सध्याच्या अटीनुसार पंधरा वर्षे पर्यंत महिलेस पुरूष खरेदी दाराच्या निवासी घटकाची विक्री करता येत नाही.ही अट शिथिल केली जाणार आहे.
  8. आशा स्वयंसेविका अणि गटप्रवर्तक यांच्या मासिक मानधनामध्ये दीड हजार रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे.
  9. अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये देखील ८३२५ वरुन १० हजार करण्यात आले आहे.मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन देखील ५९९५ वरून ७२०० इतके करण्यात येणार आहे.अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन ४४२५ वरून ५५०० करण्यात येणार आहे.
  10. अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका अणि मदतनीस यांच्या एकुण एकुण २० हजार पदांची भरती केली जाणार आहे.
  11. अंगणवाडी मार्फत घरपोच आहार पुरवठया करीता साखळी व्यवस्थापन प्रणाली आखली जाणार आहे.
  12. शहरात नोकरी करीता गेलेल्या महिलांकरीता ५० वसतीगृहांची स्थापना करण्यात येणार आहे.तसेच अडीअडचणी मध्ये असलेल्या महिलांकरीता लैंगिक शोषणा पासुन मुक्त करण्यात आलेल्या स्त्रियांकरीता अणि पारीवारीक समस्याने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी स्वाधार अणि उज्वला ह्या दोघे योजनांच्या एकत्रिकरणातुन शक्ती सदन ही योजना सुरू केली जाणार आहे.
  13. ह्या योजनेअंतर्गत एकुण ५० नवीन शक्ती सदनांची निर्मिती केली जाणार आहे.
See also  कोण आहेत महादेवी वर्मा? । चरित्र, कार्य, पुरस्कार, मनोरंजक तथ्ये