आत्ताची सर्वात मोठी बातमी! सातारा जिल्ह्यात सगळीकडे आता मास्क सक्ती होणार महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता – satara corona update today

आत्ताची सर्वात मोठी बातमी!

सातारा जिल्ह्यात सगळीकडे आता मास्क सक्ती होणार महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता

कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसुन येत आहे.सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयात आजपासून मास्क सक्ती केली गेली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांच्या केसेस मध्ये होत असलेली वाढ बघुन प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांच्या केसेस मध्ये वाढ होताना दिसुन येत असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी दिल्या आहेत त्यानुसार

सातारा येथील जिल्हाधिकारी यांनी हा सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे.

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ५० पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळुन आले आहेत ज्यातील दोन जणांचा मृत्यू देखील झाल्याचे दिसून आले आहे.

म्हणुन इथल्या जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनेनुसार सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा लक्षात घेऊन येथील शाळा महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालय अशा सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे केले आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.सर्व सातारा जिल्ह्यातील नागरिकांना सॅनीटायझरचा वापर करण्यास देखील प्रशासनाने सांगितले आहे.

सातारा जिल्ह्यातील नागरिकांना कोणकोणत्या सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे?

शासकीय निमशासकीय कार्यालये संस्था,शाळा महाविद्यालय,बाजार,मार्केट,बसस्थानक,यात्रा,मेळावे, सार्वजनिक समारंभ,विवाह सोहळा अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी जिथे अधिक गर्दीचे प्रमाण असते अशा ठिकाणी मास्क घालण्याचे याचसोबत नागरीकांनी सुरक्षित अंतर राखावे असा आदेश नागरीकांना देण्यात आला आहे.

परिस्थिती अशीच बिघडत गेली तर राज्यात विविध ठिकाणी देखील सातारा जिल्ह्यया प्रमाणे मास्क सक्ती केली जाऊ शकते अणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात लाॅकडाडाऊन‌ देखील लागु शकतो अशी शक्यता सर्वत्र वर्तवली जात आहे

See also  पंतप्रधान मोदींनी भोपाळ - नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला