Mahavir Jayanti 2023 Wishes In Marathi
दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. यावर्षी ४ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे. महावीर जयंती हा जैन धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. भगवान महावीर यांना वर्धमान या नावानेही ओळखले जाते. भगवान महावीर हे २४ वे आणि शेवटचे जैन ऋषी मानले जातात. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस जैन धर्मियांसाठी हा एक शुभ दिवस असतो. जैन धर्माचे शेवटचे आध्यात्मिक गुरु (महावीर) यांच्या स्मरणार्थ जगभरातील जैन समुदाय हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.
जैन समुदाय आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. या आनंदाच्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक एकमेकांना शुभेच्छाही देतात. जैन धर्माच्या सर्वात महत्त्वाच्या सणाच्या निमित्ताने, तुम्ही मित्र आणि कुटुंबीयांना आकर्षक महावीर जयंतीच्या शुभेच्छा खास मराठीतून शुभेच्छा द्या.
Mahavir Jayanti 2023 Wishes In Marathi
तुमच्या आत्म्यापलीकडे कोणीही शत्रू नाही.
खरे शत्रू तुमच्या आत राहतात.
ते शत्रू म्हणजे क्रोध, अभिमान, लोभ, आसक्ती आणि द्वेष.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
सिद्धांचे सार, आचार्यांचा सहवास,
ऋषींचा सहवास, अहिंसेचा प्रचार,
हे भगवान महावीरांचे सार आहे.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
ज्याचे मन निरंतर धर्मरत असते
त्याला देव देखील नमस्कार करतो.”
असा महान संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!!
हिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा
आत्मा एकटा येतो
आणि एकटा जातो,
ना त्याला कोणी आधार देत
ना कोणी मित्र बनतो.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!