ज्येष्ठ नागरीक बचत योजना SCSS माहीती – Senior Citizen Saving Scheme Details In Marathi
वृदधाल्पकाळ ही अशी वेळ असते ज्यात आपले शरीर अधिक वय झाल्याने एकदम निष्क्रीय झालेले असते त्यामुळे ते कुठलेही कष्टाचे मेहनतीचे काम करू शकत नसते.
पण जगायचे असेल तर आपल्याला आपल्या सर्व गरजा पुर्ण करणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी खिशात पैसे असणे गरजेचे आहे.म्हणुन भारतातील अशाच ज्येष्ठ नागरीकांना निवृतीनंतर देखील आपला उदरनिवार्ह करता यावा,आपला रोजचा दैनंदिन खर्च भागवता यावा.
म्हतारपणात आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी आपल्या पाल्यांवर अवलंबुन राहण्याची आवश्यकता पडु नये याकरीता सेवानिवृत कर्मचारींसाठी शासनाच्या समर्थनाने एक स्कीम सुरू करण्यात आली आहे.जिचे नाव ज्येष्ठ नागरीक बचत योजना असे आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच ज्येष्ठ नागरीक बचत योजनेविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
जेणेकरून आपल्यातील 60 पेक्षा जास्त वय असलेल्या सेवा निवृत कर्मचारींना ह्या योजनेविषयी जाणुन घेऊन ह्या योजनेचा पुरेपूर लाभ उठवता येईल.
एस-सी-एस एस चा फुलफाँर्म काय होतो?- SCSS Full Form In Marathi
एससी एस एसचा फुलफाँर्म हा Senior Citizen Saving Scheme असा होतो.
ज्येष्ठ नागरीक बचत योजना काय आहे? -What Is SCSS In Marathi
ज्येष्ठ नागरीक बचत योजना ही एक योजना आहे जी विशेषत 60 पेक्षा अधिक वय असलेल्या भारतामधील वयोवृदध तसेच ज्येष्ठ नागरीकांकरीता विशेषकरून भारत सरकारच्या समर्थनाने सुरू करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरीक बचत योजनेचे मुख्य उददिष्ट काय आहे?
- ज्येष्ठ नागरीक बचत योजनेचे मुख्य उददिष्ट आहे असे नागरीक जे आपल्या नोकरीवरून 60 वय झाल्यानंतर निवृत्त होत असतात.
- अशा वयोवृदध ज्येष्ठ व्यक्तींना निवृतीनंतर देखील त्यांच्या उदरनिर्वाहासाठी,दैनंदिन जीवणातील महत्वपुर्ण गरजा पुर्ण करण्यासाठी,दैनंदिन खर्चा करीता रेग्युलर इन्कम प्राप्त व्हावे हे आहे.
- ही स्कीम सर्व वरिष्ठ नागरीकांना भारतातील सर्व बँकेतुन मग ती खासगी असो किंवा सरकारी उपलब्ध करून दिली गेली आहे.याचसोबत आपण ह्या स्कीममध्ये पोस्टादवारे देखील सहभाग घेऊ शकतो.
- आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या स्कीमला भारत सरकारचे पुर्णपणे समर्थन प्राप्त असल्यामुळे नागरीकांना इथे गुंतवलेल्या आपल्या रक्कमेतुन चांगले रिटर्न्स प्राप्त होण्याची हमी देखील मिळत असते.
ज्येष्ठ नागरीक बचत योजनेतुन प्राप्त होणारे व्याजदर किती असते? – SCSS Interest Rate In Marathi
- ज्येष्ठ नागरीक बचत योजनेच्या आर्थिक वर्ष 2022-2023 यातुन प्राप्त होणारे पहिल्या तिमाहीतील( एप्रिल/जुन) व्याजदर हे 7.4% इतके आहे.
- आणि ह्या व्याजदरात दर तीन महिन्यांच्या कालावधीने पुनरावलोकन करून बदल घडवून आणले जातात.यात व्याजाची मोजणी देखील तीन महिन्यांनीच केली जात असते.
ज्येष्ठ नागरीक बचत योजनेचा परिपक्वता कालावधी Maturity Period) किती आहे?
ज्येष्ठ नागरीक बचत योजना ह्या स्कीममध्ये आपण आपले अकाऊंट ओपन केल्यानंतर जमा केलेली रक्कम ही तब्बल पाच वर्षाच्या अवधीने म्हणजेच पाच वर्ष इतक्या कालांतराने परीपक्व(Mature) होत असते.मग ती रक्कम आपणास काढता येत असते.
आणि यात देखील एक अट असते ज्यात आपणास ह्या कालावधीत एकाचवेळी फक्त तीन वर्षाकरीता अधिकतम वाढ घडवुन आणता येत असते.म्हणुन जर आपणास मुदतवाढ करायची असेल तर आपण अकाऊंट मँच्युअर होण्याच्या एक वर्ष आधी मुदतवाढीसाठी विनंती करून ठेवायला हवी.
ज्येष्ठ नागरीक बचत योजनेतील किमान आणि कमाल गुंतवणुक रक्कम मर्यादा किती आहे?
ज्येष्ठ नागरीक बचत योजनेतील किमान गुंतवणुक रक्कमेची मर्यादा(कमीत कमी गुंतवणुक रक्कम) 1000 ठेवण्यात आली आहे.
आणि कमाल गुंतवणुकीची रक्कम मर्यादा(जास्तीत जास्त गुंतवणुक रक्कम) 15 लाख इतकी ठेवण्यात आली आहे.(ज्येष्ठ नागरीक बचत योजना खात्यांमध्ये आपणास ठेवी ह्या रोखीने करता येतात.परंतु फक्त 1 लाखापर्यंत.
या ठरलेल्या एक लाखाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी आपण चेक किंवा डिमांड ड्राफ्टचा वापर करणे बंधनकारक आहे.
ज्येष्ठ नागरीक बचत योजनेकरीता पात्रतेच्या अटी काय आहेत?
भारत सरकारच्या समर्थनाने सुरू करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरीक बचत योजनेत सहभागी होण्या करीता पात्रतेच्या पुढीलप्रमाणे काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत.ज्या आपण पाळणे फार गरजेचे आहे.
● ह्या योजनेसाठी 60 पेक्षा अधिक वय असलेली व्यक्तीच सहभागी होऊ शकते.
● ह्य योजनेत 55 ते 60 वयोगटातील असे व्यक्ती सहभागी होऊ शकतात स्वताच्या ईच्छेने व्हीआर एस घेऊन रिटायर झाले आहेत.
● ह्या योजनेत असे ज्येष्ठ नागरीक देखील सहभागी होऊ शकतात जे सेवानिवृत्त झालेले संरक्षण कर्मचारी आहे आणि त्यांचे वय किमान 60 वर्षे आहे.
ज्येष्ठ नागरीक बचत योजनेत पैसे गुंतवल्याने आपणास कोणकोणते लाभ प्राप्त होत असतात?
ज्येष्ठ नागरीक बचत योजनेत पैसे गुंतवल्याने आपणास पुढील काही महत्वपुर्ण लाभ प्राप्त होत असतात-
● कुठेही पैशांची गुंतवणुक करत असताना आपणास त्यावर किती रिटर्न्स प्राप्त होतील हे आपण आधी पाहत असतो.तसेच ते रिटर्न प्राप्त होण्याची गँरंटी किती आहे हे देखील आपण चेक करत असतो.आणि जसे की आपण वर पाहिले की ज्येष्ठ नागरीक बचत योजना ही एक सरकारचे पुर्णपणे समर्थन प्राप्त असलेली बचत योजना आहे.त्यामुळे इथे रिटर्नसची फिक्स गँरंटी आपणास प्राप्त होत असते.
● ज्येष्ठ नागरीक बचत योजनेत गुंतवणुक करण्याचा दुसरा फायदा हा आहे की यातुन आपणास एफ डी आणि आरडी पेक्षा अधिक व्याजदर प्राप्त होत असते.
● ज्येष्ठ नागरीक बचत योजनेत आपल्या पैशांची गुंतवणुक केल्याने आपणास टँक्स बेनिफिट देखील मिळत असतो.(दर वर्षाला किमान दीड लाखापर्यतचे आयकर टँक्स सुट क्लेम करून आपण वाचवू शकतो.)
● ज्येष्ठ नागरीक बचत योजनेत गुंतवणुक करण्याची प्रक्रिया देखील सहज सोपी आणि सरळ आहे ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी आपण भारतातील कुठल्याही बँकेत(सार्वजनिक/खासगी) किंवा पोस्ट आँफिसमध्ये यापैकी कुठल्याही एका ठिकाणी जाऊन देखील आपले अकाऊंट ओपन करू शकतो.
● ज्येष्ठ नागरीक बचत योजनेअंतर्गत,आपल्या गुंतवणुकीच्या रक्कमेतील पेआउट सुनिश्चित केला जातो आणि व्याजाची ठाराविक रक्कम तिमाही (दर तीन महिन्यांनी) दिली जात असते.प्रत्येक एप्रिल,जुलै,ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी व्याज(Interest) जमा केले जात असते.
ज्येष्ठ नागरीक बचत योजनेविषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न-
1)वरिष्ठ नागरीक बचत खाते आपण कोठे कोठे जाऊन ओपन करू शकतो?
● ज्येष्ठ नागरीक बचत योजनेत गुंतवणुक करण्याची प्रक्रिया देखील सहज सोपी आणि सरळ आहे ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी आपण भारतातील कुठल्याही बँकेत(सार्वजनिक/खासगी) किंवा पोस्ट आँफिसमध्ये यापैकी कुठल्याही एका ठिकाणी जाऊन देखील आपले अकाऊंट ओपन करू शकतो.
● पोस्टामध्ये हे खाते ओपन करण्यासाठी आपणास सर्वात प्रथम अकाऊंट ओपन करण्यासाठी एक फाँर्म दिला जो आपण न चुकता व्यवस्थित भरायचा असतो.मग त्या भरलेल्या फाँर्मला केवायसी डाँक्युमेंटची प्रत जोडुन तो पोस्ट आँफिसमध्ये जमा करायचा असतो.केवायसी डाँक्युमेंटमध्ये आपणास (Identity Proof,Address Proof,Pass Port Size Photo) इत्यादी डाँक्युमेंटची आवश्यकता भासत असते.
2)जर आपण बँकेदवारे ज्येष्ठ नागरीक बचत योजनेचे खाते ओपन केले तर आपणास कोणता लाभ होत असतो?
जर आपण बँकेदवारे ज्येष्ठ नागरीक बचत योजनेचे खाते ओपन केले तर आपणास पुढील लाभ प्राप्त होत असतात-
● जर आपण बँकेदवारे ज्येष्ठ नागरीक बचत योजनेचे खाते ओपन केले तर आपल्या ठेवीवरील व्याज थेट आपल्या बँक शाखेतील बचत बँक खात्यात जमा केले जात असते.
● आपल्या खात्याविषयीचे विवरण,सर्व तपशील पोस्ट किंवा ईमेलद्वारे आपणास बँकेकडून पाठवला जातो.
● आणि सगळयात महत्वाचे म्हणजे फोन बँकिंग सेवेद्वारे 24×7 आपणास बँकेकडून कस्टमर सर्विस उपलब्ध होत असते.
3) कोणकोणत्या बँक आहे ज्या आपणास ज्येष्ठ नागरीक बचत खाते उघडण्याची सेवा प्रदान करतात?
भारतातील अशा अनेक बँक आहे ज्या आपणास ज्येष्ठ नागरीक बचत खाते उघडण्याची सेवा प्रदान करतात.त्यातीलच काही प्रमुख बँकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-
● बँक आँफ बडोदा
● युनियन बँक आँफ इंडिया
● पंजाब नँशनल बँक
● बँक आँफ इंडिया
● स्टेट बँक आँफ इंडिया
● आयसी आयसीआय बँक
इत्यादी.
4) मुदतपुर्तीच्या आधी(Before Maturity Period) पैसे काढायचे असल्यास आपणास काय दंड भरावा लागतो?
2 वर्षे पूर्ण होण्याच्या आधी पैसे काढायला ठेव रकमेच्या 5% टक्के इतके दंड आकारले जाते.तसेच तो दंड आपल्या रक्केमुन वजा केला जातो.आणि खाते उघडुन झाल्यानंतर आपण 2 वर्षांनी पैसे काढल्यास आपणास ठेव रक्कमेच्या मधुन 1% इतके दंड आकारले जात असते.
5) खाते परिपक्व होण्याआधी जर यात एखाद्या खातेधारकाचा अचानक मृत्यु झाला तर काय होते?
जर खाते परिपक्व होण्याआधी यात एखाद्या खातेधारकाचा अचानक मृत्यु झाला तर अशावेळी त्याचे खाते बंद केले जाते.आणि त्याची सर्व परिपक्व रक्कम त्याने लावलेल्या त्याच्या वारसदाराला सुपुर्त केली जात असते.
6) वरिष्ठ नागरीक बचत खाते आपण आपल्या कुटुंबातीलच एखाद्या सदस्यासोबत Jointly ओपन करू शकतो का?
वरिष्ठ नागरीक बचत खाते आपण फक्त आपल्या लाईफ पार्टनर सोबत ओपन करू शकतो.म्हणजेच पती पत्नी सोबत आणि पत्नी पतीसोबत हे अकाऊंट Jointly ओपन करू शकते.
Comments are closed.