दरवर्षी २३ मार्च रोजी शहीद दिवस का साजरा केला जातो?याचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? -Shahid Divas

दरवर्षी २३ मार्च रोजी शहीद दिवस का साजरा केला जातो?याचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे?

१९३१ सालामध्ये २३ मार्च ह्या तारखेला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि थापर ह्या भारतीय स्वातंत्र्यवीर तसेच क्रांतिकारकांना ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती.

भगतसिंग,सुखदेव, राजगुरू अणि थापर या चारही जणांना २३ मार्च रोजी लाहोर जेलमध्ये संध्याकाळच्या वेळेस सर्वसाधारणत साडेसात वाजेच्या सुमारास ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे फाशीवर चढवले जाणारे देशाचे थोर क्रांतिकारक भगतसिंग हे तेव्हा अवघ्या २३ वर्षाचे होते.

तसे पाहायला गेले तर शहीद दिवस हा भारतात वेगवेगळ्या तारखेला दरवर्षी साजरा केला जात असतो पण २३ तारखेला हा दिवस साजरा करण्यात येण्याचे एक मुख्य कारण आहे.

हाच तो दिवस ज्या दिवशी देशावर नितांत प्रेम करणारे देशासाठी हसत हसत मेरा रंग दे बसंती चोला असे म्हणत फासावर चढणारया आपल्या देशातील थोर क्रांतिकारक देशप्रेमी भगतसिंग सुखदेव राजगुरू आणि थापर यांना फासावर चढवण्यात आले होते.

ज्यामुळे ब्रिटिश सत्तेला उलथवुन लावण्यासाठी केली जात असलेली आपल्या भारत देशातील चळवळ तसेच आंदोलन अधिक तीव्र बनले.

याचसोबत जानेवारी महिन्यात देखील देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आठवणीत शहीद दिवस साजरा केला जातो.

शहीद दिवस इतिहास –

ब्रिटिश सरकारला जागे करण्यासाठी क्रांतिकारक भगतसिंग अणि राजगुरू या दोघांनी मिळून १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर येथील ब्रिटीश अधिकारी सॅडर्स याची हत्या केली.

ब्रिटीश अधिकारी सॅडर्स यांच्या हत्येच्या योजनेमध्ये सुखदेव हे देखील समाविष्ट होते.ही कृती करत असताना चंद्रशेखर आझाद यांनी देखील त्यांना भरपुर साहाय्य केले.

याचसोबत भगतसिंग यांनी बटुकेशवर दत्त यांच्या सोबत मिळुन ब्रिटिश कार्यालयावर ८ एप्रिल १९२९ रोजी पत्रके अणि बाॅम्ब देखील फेकले.ज्यामुळे भगतसिंग अणि बटुकेशवर दत्त या दोघांनाही अटक करण्यात आली होती.

See also  DBMS आणि RDBMS यात काय फरक आहे? Difference Between DBMS And RDBMS

तुरूंगात असताना देखील भगतसिंग यांनी आपल्या क्रांतीकारी चळवळी चालुच ठेवल्या.या काळात त्यांनी भरपुर पुस्तक वाचली ब्रिटीश सरकार विरूद्ध लेखन केले.

भगतसिंग राजगुरू सुखदेव थापर या चारही जणांना २४ मार्च रोजी फासावर चढवण्यात येईल असे ब्रिटीश सरकारने घोषित केले होते.

२४ मार्च रोजी या चौघांना फासावर चढवले जाणार ही बातमी एकदम वारयासारखी सगळीकडे पसरली ज्यामुळे ब्रिटीश सरकार विरूद्ध राग अणि असंतोषाची भावना भारतीय लोकांमध्ये निर्माण झाली.अणि लोक ह्या फाशीसाठी आपला निषेध व्यक्त करू लागले.

जनतेमध्ये उसळत असलेली संतापाची लाट तीव्र असंतोषाची भावना बघुन ब्रिटिश सरकारने भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना एक दिवस आधीच फासावर चढविण्याचा निर्णय घेतला.

मग या तिघांना २३ मार्च रोजी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास लाहोर जेलमध्ये फासावर लटकविण्यात आले.

म्हणुन दरवर्षी भारतात २३ मार्च रोजी शहीद दिवस साजरा केला जातो कारण ह्याच दिवशी अत्यंत कमी वयात देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारया भगतसिंग सुखदेव राजगुरू तीन क्रांतीकारकांना फासावर लटकविण्यात आले होते.

ह्या दिवशी या तिघा शहीद क्रांतिकारकांच्या आठवतीत शहीद दिवस साजरा केला जातो.हा दिवस दरवर्षी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या क्रांतीकारकांच्या बलिदानाची आठवण करून देणारा त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे.

या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध तसेच भाषण वादविवाद इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात येतात.याशिवाय सर्व शासकीय कार्यालये संस्था मध्ये देखील हा दिवस साजरा केला जातो