Sky star named as Dr Babasaheb Ambedkar Marathi
नुकतेच काल आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकाशातील एका तारयाची रेजिस्ट्री करण्यात आली आहे.
म्हणजे आकाशातील एका तारयाला डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने रेजिस्टर करण्यात आले आहे त्याची नोंदणी बाबासाहेब यांच्या नावाने करण्यात आली आहे.
म्हणुन यंदाची भीमजयंती अत्यंत खास झाली असे देखील म्हटले जाते आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच विषयावर सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
छत्रपती संभाजी नगर येथील राजु शिंदे यांनी आकाशातील तारयाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केला अणि त्यांच्या ह्या प्रयत्नाला यश देखील प्राप्त झाले आहे.
अमेरिकेत आकाशातील तारयांची नाव नोंदणी करणारी एक संस्था आहे जिचे नाव आहे इंटरनॅशनल स्टार अॅण्ड स्पेस रेजिस्ट्री आहे
ही संस्था व्यक्तींच्या नावाने तारयांची रेजिस्ट्री करण्याचे काम करते.इथे व्यक्तीच्या नावावर तारयांचे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी १०० डाॅलर इतकी किंमत मोजावी लागते.
इथे एखाद्या व्यक्तीच्या नावाने तारयाची रेजिस्ट्री करण्यासाठी दोन ते तीन वर्षे इतका कालावधी लागत असतो.
ह्या संस्थेकडे राजु शिंदे नावाच्या एका व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक तारयाची नोंदणी केली आहे.
यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची यंदाची साजरी करण्यात आलेली १३२ जयंती खुप खास अणि ऐतिहासिक अणि अभिमानास्पद ठरली आहे.
कारण चक्क आकाशातील तारयाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे.हया तारयाचे नामकरण १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती निमित्त केले जाणार होते.
असे सांगितले जाते की राजु शिंदे यांनी ९ फेब्रुवारी रोजी आंबेडकर यांच्या नावाने तारयांची रेजिस्ट्री करण्यासाठी अर्ज दाखल केला होता ज्याचे त्यांना ईमेलने सर्टिफिकेट देखील देण्यात आले आहे.फक्त कुरियरने सर्टिफिकेट येणे बाकी आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव आंबेडकर कसे पडले?
आता १४ एप्रिल रोजी ह्या तारयाचे लाॅचिंग करण्यात येणार होते.हा तारा पाहण्यासाठी आपणास स्पेस रेजिस्ट्री अॅपच्या संकेतस्थळावर जावे लागणार आहे.
तारा पाहण्यासाठी खालील संकेतस्थळावर जायचे आहे-
सर्वसामान्य नागरिकांना हा तारा आपापल्या मोबाईल लॅपटॉप संगणक टॅब इत्यादी दवारे बघता येणार आहे.
असे सांगितले जाते की ह्या संस्थेद्वारे आकाशातील तारयाला व्यक्तीचे नाव देण्यासाठी अशा व्यक्तींचे नाव देणे आवश्यक आहे ज्या व्यक्तींने समाजासाठी मोठे व्यापक कार्य केलेले आहे.
याचसोबत रेजिस्ट्रेशन करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता देखील करणे आवश्यक मानले जाते.राजु शिंदे यांना देखील दीड महिना इतका कालावधी ह्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लागला असल्याचे राजु शिंदे म्हणाले आहेत.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नोंदणी केलेला तारा कसा बघायचा?
साधारणत ह्या कार्यासाठी दोन वर्षे लागुन जातात पण आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वामुळे हे काम दीड महिन्यात पुर्ण झाले असे राजु शिंदे यांनी सांगितले आहे.
यात त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यावर त्यांना ह्या तारयाची नोंदणी करता आली आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आगळ्या वेगळ्या तसेच ऐतिहासिक पद्धतीने साजरी करण्यासाठी राजु यांनी ह्या तारयाची रेजिस्ट्री केली होती.
Bhimraw