विश्व मृदा दिवस ५ डिसेंबर- मृदा आरोग्य पत्रिका – SOIL HEALTH CARD

विश्व मृदा दिवस ५ डिसेंबर- मृदा आरोग्य पत्रिका

जागतिक मृदा दिवस दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक मृदा दिवस लोकसंख्या विस्तारामुळे येणार्‍या समस्या आपल्या समोर उघडकीस आणत असते . यात मातीची धूप कमी करणे , मातीच संवर्धन करमे आणि या दिशेने कार्य करणे किती आवश्यक आहे या भर दिला जातो , जेणेकरून सर्वा करता अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्या करता प्रयत्न केले जातात.

SOIL HEALTH CARD-

  • मृदा आरोग्य पत्रिका (SHC) च महत्व – दर्जेदार पीक वाढण्याकरता शेतजमीन,माती ही दर्जेदार  असायला हवी,अन्नद्रव्यांनि भरपूर हवी॰ परंतु हायब्रिड बियाने,अती रयायनिक खते, असंतुलित प्रमाणापेक्षा जास्त वापरामुळे मुख्यत्वे करून सूक्ष्म व दुय्यमअन्नद्रव्यांची कमतरता झपाट्याने वाढत आहे.
  • खतांचा वापर ह्यामुळे जमीनि सुपीकता टिकवणे म्हत्वच असून तितकच आव्हानात्मक आहे .
  • NPK सोबत बर्‍याच सूक्ष्म-द्रव्य पिकाकरीता आवश्यक असतात, ही अन्नद्रव्य जमिनी आणि पाणीतून पीक शोषून घेत असतात. मातीची तितकीशी काळजी न घेतल्यामुळे , जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्नात जमिनीचा सुपीकता कमी होत  आहे.
  • जमिनीच्या आवश्यकता नुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे हे अतिशय म्हत्वाच पाऊल असून,अनावश्यक खतांचा पुरवठा टाळून योग्य आणि आवश्यक त्याच अन्नद्रव्य पिकांना देण्यावर भर दिला जातो
  • ह्या बाबींच महत्व वेळेवर समजून भारत सरकारने 2015 मध्ये मृदा आरोग्य पत्रिका ह्या शेतोयोजेने  ला चालना दिली आहे , ही आता काळाची गरज असून ह्या पत्रिकेनुसार शेतीकरणे ही पुढे फायदेशीर ठरणार  आहे

 

 

मृदा आरोग्य पत्रिका -SOIL HEALTH CARD-SHC

 

 

ह्यात शेतकर्‍यांना त्यांच्या  जमिनीचे , माती(मृदा) परीक्षण करून ही पत्रिका शेतकार्‍यांना देण्यात येते, ज्यात 12 निरीक्षणांचा उल्लेख असतो , जसे N,P,K (Macro-nutrients) ; S (Secondary-nutrient) ; Zn, Fe, Cu, Mn, Bo (Micro-nutrients) ; and pH, EC, OC आणि ह्या पत्रिकेतील माहिती नुसार खत व्यवस्थानबाबत शेतकर्‍यांना सल्ला दिला जातो

See also  इन्व्हेस्टमेंट बॅकर कसे बनायचे? how to become investment banker

  • मातीची परीक्षण करून जमिनीचा PH, तसेच मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण माहीत करून घेवून त्यानुसार खतांचा वापर करण्यात येतो

मृदा आरोग्य पत्रिका नुसार खतांचा योग्य वापर केल्यास मातीचे सर्व गुणधर्म लक्षात घेवून योग्य त्या मुख्य,

सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढता येईल व

रासायनिक गुणधर्मात सुधारणा होऊन जमिनीचे आरोग्य दीर्घ काळ ठिकवून पीक उत्पादंनांचा दर्जा ठिकवून ठेवता येईल.

फायदे-SOIL HEALTH CARD

  • पिकांची अन्नद्रव्ये घेण्याची क्षमता ब मातीचा प्रकार पाहून योग्य प्रमाणात खत दिले जातात.
  • उत्पन्नात वाढ होते
  • ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीने खते दिल्याने पाण्याच्या बचतीसोबत खतांची कार्य क्षमता वाढून पाणी व खतांची बचत होते. म
  • मृदा चाचणी वरून जमिनीत अन्नद्रव्यांचा पिकांना उपलब्ध पुरवठा किती आहे आणि त्यानुसार किती अन्नद्रव्यांचा पुरवठा जमिनीस अथवा पिकास करायला ह्वा याचा अंदाज येतो.
  • जमिनीच्या सुपीकतेची पूर्ण माहिती आपल्याकडे असते
  • पिक्रे व जमिनीच्या सुपीकते नुसार खत देण्यात येवून क्षारयुक्त, आम्ल मृदाची माहिती घेवून हवी ती  सुधारणा करता येते
  • दर तीन वर्षानी मृदा परीक्षण कारण आवश्यक असून उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती ठेवता येते
  • आवश्यकतेनुसार व पिकांच्या गरजेनुसारच खतांचा योग्य वापर करता येतो .

मृदा आरोग्य पत्रिका-SOIL HEALTH CARD ह्या शेती योजेने चालना देण्या करता तसेच ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच  भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.

  • केंद्रीय कृषी मंत्रालयानं मृदा आरोग्य कार्ड योजना जाहीर केली आहे .
  • ह्यात शेतकर्‍यां पर्यन्त मृदा आरोग्य कार्ड पोहचवण्या करता  ग्रामीण भागातील तरुण शेतकर्‍यांनी ग्रामीण स्तरावर मृदा परीक्षण  प्रयोगशाळा स्थापित करण्यासाठी योजना जाहीर केली आहे॰
  • मृदा परीक्षण  प्रयोगशाळा स्थापन करण्याकरता एकूण 5 लाख रुपये खर्च येतो,
  • ह्यातील 75% टक्के म्हणजे 3.75 लाख खर्च रुपये भारत सरकार देणार आहे.
  • या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील तरुण शेतकरी ज्यांचं 18-40 व (शेतकरी गट) आहे, ते ग्रामीण स्तरावर मृदा परीक्षण योजनेतर्गत स्वयं प्रयोगशाळे स्थापन करू शकतात
See also  १२ वी आयटीया उत्तीर्ण उमेदवारांची भरती- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये सुरू- NPCIL RECRUITMENT 2023 IN MARATHI

 कृषी संचालक किंवा त्यांच्या कार्यालयाला योजेने संबधि अधिक माहिती घेता येईल