बोलण्याच्या शैलीवरुन व्यक्तीचा स्वभाव व्यक्तीमत्व – How to know the personality of a person from the style of speaking?
आपल्या दैनंदिन जीवनात जेवढेही लोक आपल्याशी संवाद साधत असतात आपल्या संपर्कात येत असतात.ते आपल्या सोबत कसे वागायचे हे आपल्या बोलण्यावरून नेहमी ठरवत असतात.
जर आपण एखाद्या व्यक्ती सोबत उद्धट उर्मट पणे बोलतो तेव्हा ती समोरची व्यक्ती देखील आपल्या सोबत त्याच भाषेत रागात अणि ताठरतेने बोलत असते.
पण जर आपण त्या व्यक्तीसोबत आदराने बोललो तर बदल्यात ती व्यक्ती देखील आपल्या सोबत आदराने नम्रतेने बोलत वागत असते.हा आपला मानवी स्वभाव आहे.
आज आपण हे जाणुन घेणार आहोत की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तसेच मुळ व्यक्तीमत्व कसे आहे हे आपण त्याच्या बोलण्यावरून कसे ओळखायचे?
सामुद्रीक शास्त्रात असे सांगितले गेले आहे की एखाद्याचे व्यक्तीमत्व कसे आहे हे त्याच्या शरीराचे अवयव, देहबोली खाणाखुणा,बोलण्याची वागण्याची पद्धत यावरून देखील आपणास चटकन ओळखता येते.
चला तर मग समजुन घेऊया फक्त बोलण्यावरून आपण एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे जाणुन घेऊ शकतो.
बोलण्याच्या शैलीवरून एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे जाणुन घ्यायचे?
मित्रांनो आपल्या प्रत्येकाचीच बोलण्याची पदधत शैली एकसारखी नसते.आपल्यामध्ये कोणी कमी आवाजात बोलते तर कोणाला खुप मोठयाने बोलण्याची सवय असते.काही जण अडखळत किंवा तोतरे देखील बोलत असतात.
आपण ह्या सर्व वेगवेगळ्या शैलीमध्ये बोलणारया व्यक्तींच्या व्यक्तीमत्व अणि स्वभावाचा सविस्तरपणे आढावा घेणार आहोत.
१) जलदगतीने वेगाने बोलणारी व्यक्ती –
- सामुद्रिक शास्त्रात असे दिले आहे की एखादी व्यक्ती जर न थांबता जलदगतीने पण एकदम स्पष्टरीत्या बोलत असेल तर अशी व्यक्ती कुठलाही रोग नसणारी व्यक्ती असते अशी व्यक्ती नेहमी आरोग्य दायी असते.अणि शरीराने देखील निरोगी अणि स्वस्थ असते.
- हया व्यक्ती वेगाने जरी बोलत असल्या तरी देखील बोलताना सावधगिरी संयम बाळगताना दिसुन येतात.यांचा स्वभाव देखील हसमुख अणि प्रसन्न स्वरूपाचा असतो.हया व्यक्ती व्यवहार कौशल्यात देखील खुप पारंगत अणि निष्णात असलेल्या दिसुन येतात.
२) बोलताना अडखळणारे तसेच तोतरे बोलणारे व्यक्ती –
जे व्यक्ती बोलताना नेहमी अडखळत असतात,नेहमी तोतरे बोलत असतात किंवा एकच शब्द पुन्हा पुन्हा बोलत असतात अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असलेली आपणास दिसुन येते.
हे व्यक्ती छोटछोटया गोष्टींवरून दुखी तसेच निराश होऊन बसतात.मनाने हे फार निर्मळ अणि चांगले असतात.
म्हणून काहीही झाल्यावर हया व्यक्तींच्या मनात नेहमी हेच चालले असते की समोरच्या व्यक्तीला आपल्या विषयी काय वाटत असेल तो आपल्या विषयी काय विचार करत असेल. त्याला काही वाईट तर वाटले नसेल ना.पण त्यांच्या ह्याच चांगल्या स्वभावाचा कधी कधी काही लोक गैरफायदा देखील उठवत असतात.
३) भारदस्त आवाजाचे व्यक्ती –
ज्या व्यक्तींचा आवाज भारदस्त किंवा जड असतो.असे व्यक्ती इतरांवर हुकुम सोडणारे आदेश सोडणारे असतात.
असे व्यक्ती इतरा़ंवर आपले वर्चस्व प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.यांना बोलत असताना जर कोणी मध्येच टोकले तर ह्यांना खुप राग येतो.
४)समोरची व्यक्ती बोलत असताना तिला मध्येच टोकणारे अडवणारे व्यक्ती –
जे व्यक्ती समोरची व्यक्ती बोलत असताना त्याचे बोलणे मध्येच अडवून बोलतात समोरच्या व्यक्तीला त्याचे बोलणे पुर्ण करू देत नाही अणि त्याला मध्येच अडवून स्वता बोलायला सुरुवात करतात असे व्यक्ती हे स्वभावाने हटटी अणि जिददी स्वरूपाचे असतात.फक्त मेरी सुनो असा यांचा स्वभाव असतो.
अशा व्यक्तींकडे बोलण्यासाठी खुप काही असते.पण यांना जर समोरच्या व्यक्तीने बोलु दिले नाहीतर किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिले त्यांच्या बोलण्याला महत्व नाही दिले तर अशा वेळी हे नाराज होऊन रूसुन बसत असतात.
५) अति वेगाने बोलणारे व्यक्ती –
जे लोक अतिवेगाने बोलतात असे व्यक्ती स्वभावाने फार उत्साही असतात.हे लोक कधीही कुठल्याही ताणतणावाखाली न राहणारे मनमौजी स्वभावाचे असतात.
हे कोणाशीही स्वताहुन भांडण करत नाही पण कोणी यांच्यासोबत भांडण करायला लागले तर हे माघार देखील घेत नाही.