मणिपूर येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय जवान रंजित यादव झाले शहीद
मणिपूर राज्यातील हिंसाचाराच्या घटना आता दिवसेंदिवस वाढताना दिसुन येत आहे.
५ जुन रोजी मणिपूर मधील सेरो येथे सुरक्षा दलाचे जवान अणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली ज्यात सीमा सुरक्षा दलाचे जवान रंजित यादव हे शहीद झाले आहे.
याचसोबत दहशतवादयांसोबत झालेल्या ह्या गोळीबारात दोन जवान गंभीर जखमी देखील झाले आहेत.अशी माहीती लष्करी अधिकारींकडुन देण्यात आली आहे.
याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना भारतीय लष्करी दलाचे स्पीकर काॅरप्स यांनी असे सांगितले आहे की ५ जुन २०२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षक अणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली.
चकमकीत करण्यात आलेल्या गोळीबारात सेरो येथे बीएस एफचा एक जवान अणि आसाम रायफलचे दोन जवान गंभीररीत्या जखमी देखील झाले आहेत.
दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गोळी लागुन गंभीर जखमी झालेले जवान रंजित यादव यांना जीवन ह्या रूग्णालयात उपचारासाठी त्वरीत दाखल करण्यात आले होते पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
मणिपूर मधील वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी सुरक्षा दलाकडून येथील भागात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.तरी देखील येथील हिंसाचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ ही होतच आहे.
मणिपूर मधील वाढत्या हिंसाचाराला लक्षात घेता येथील इंटरनेट सेवा १० जुनपर्यत बंद ठेवली जाणार आहे.मणिपुर राज्यातील अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मणिपूर राज्यातील सेराऊ ह्या क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली असताना देखील हा हिंसाचार घडुन आला आहे.सुरक्षा रक्षकांकडुन ह्या भागात शोध मोहीम सुरू होती सुरक्षा रक्षकांवर शोध मोहीमेदरम्यान हा गंभीर हल्ला काही आदिवासी समुहादवारे करण्यात आला आहे.
मणिपूर येथे बंडखोरांकडुन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोळीबार हल्ला केला जातो आहे.दहशतवादयांकडुन जिथे जिथे हल्ले केले गेले आहे तिथे सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केले जाते आहे.